आज क्रूड US $ ११०.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७८.२० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.४८ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.२७ VIX २१.२३ होते.
आज USA मधील मार्केट्स, युरोपियन मार्केट्स तेजीत होती. सोने आणि चांदी मंदीत होती
उद्या USA चा बँक स्ट्रेस टेस्ट रिपोर्ट येणार आहे.
USA च्या अध्यक्षांनी ७ मोठ्या ऑइल उत्पादन कंपन्यांबरोबर बैठक करून उत्पादन वाढवण्याचे आणि दर कमी करण्याचे आवाहन केले. USA गॅसोलीन वरील कर कमी करण्याची शक्यता आहे. चीनमध्ये कोरोनामुळे क्रूडसाठी मागणी कमी होत आहे.
FII ने Rs २७०१.०० कोटींची विक्री तर DII नी Rs ३०६६ कोटीची खरेदी केली.
जैन इरिगेशन त्यांचा आंतरराष्ट्रीय बिझिनेस ‘RIVULIS’ या सिंगापूरमधील कंपनीला विकणार आहेत. यामुळे जैन इरिगेशनचे कर्ज ४५% कमी होईल. या मर्ज्ड एंटिटीमध्ये जैन इरिगेशनचा २२% आणि TAMASEKचा ७८% स्टेक असेल.
TAMASEK ही RIVULIS ची कंपनी आहे. हे Rs ४२०० कोटीचे डील असून यातून जैन इरिगेशनला Rs २७०० कोटी कॅश मिळेल. याचा उपयोग कर्ज फेडण्यासाठी केला जाईल
HDFC बँक येत्या दोन वर्षात १५०० ते २००० शाखा उघडेल. वेल्थ आणि पेमेंट प्लॅटफॉर्म लाँच करेल.
DR रेड्डीजने सांगितले की त्यांच्या नॉर्थ USA मधील विक्रीमध्ये डबल डिजिट वाढ होईल. त्यांची १७५ उत्पादने पाइपलाइनमध्ये आहेत. ते लवकरच चीनमध्ये उत्पादने लाँच करतील. ब्राझीलमध्ये विक्रीमध्ये ४ पट वाढ झाली आहे. चीनमध्ये येत्या ५ वर्षात दुप्पट ते तिप्पट विक्री मध्ये वाढ होईल. कंपनी कॅन्सर आणि रोगप्रतिबंधक औषधावर लक्ष केंद्रित करणार आहे.कंपनीने ९० उत्पादनांसाठी अर्ज केले.
‘KELLOG’ या कंपनीचे ३ कंपन्यांमध्ये विभाजन होईल.
तुर्कीयेमध्ये हिरो मोटो ३ EURO-S मॉडेल्स लाँच करणार आहे.
M & M च्या रिन्यूएबल एनर्जीमध्ये एक पेंशन फंड गुंतवणूक करेल.
NSDL Rs ४५०० कोटींचा IPO आणणार आहे. NSDL मध्ये IDBI चा २६% तर NSE चा २४% तर स्टेटबँकेचा ५% युनियन बँकेचा २.८१% आणि कॅनरा बँकेचा २.३०% स्टेक आहे.
या खेपेला स्पेक्ट्रमच्या लिलावात ज्या कंपन्यांना स्पेक्ट्रम अलॉट होईल त्यांना स्पेक्ट्रम युसेज चार्जेस लागणार नाहीत. 5G सेवा देण्यासाठी टेलिकॉम ऑपरेटरकडे किमान १०० Mhz स्पेक्ट्रम असणे अनिवार्य आहे.
मॅट्रीमनी.कॉम ही कंपनी Rs ११५० प्रती शेअर या भावाने ६.५२ लाख शेअर्स बायबॅक करण्यासाठी Rs ७५ कोटी खर्च करेल. या बायबॅकमध्ये प्रमोटर्स भाग घेणार नाहीत. या बायबॅक साठी ४ जुलै ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.
TCS ने त्यांचा लेन्डिंग आणि सिक्युटरायझेशन प्लॅटफॉर्म आधार हौसिंग फायनान्सला वापरायला देण्यासाठी करार केला.
मॅक्रोटेक डेव्हलपर्स ‘SKECHER’ बरोबर ११ लाख SQ FT ची गोडाउन तयार करणार. मॅक्रोटेकने ‘SKECHER’ बरोबर लीज डील साइन केले.
JMC प्रोजेक्ट ला Rs ८७४ कोटींची काँट्रॅक्टस मिळाली.
DELHIVERY वेलस्पन बरोबर कोलॅबोरेशनमध्ये ग्रेटर मुंबईमध्ये ७ लाख SQ FT मेगागेटवे आणि बंगलोरमध्ये GMR बरोबर १ मिलियन SQ FT चे मेगागेटवे बनवणार आहे यामध्ये गोडाऊनचा समावेश असेल.
M & M फायनान्सने ‘BIGHAAT’ बरोबर करार केला.
वरूण बिव्हरेजीसने इन्सायडर ट्रेडिंग संबंधीत नियमांचा भंग केल्यामुळे सेबीकडे Rs ५६ लाख सेटलमेंट चार्जेस भरले.
ग्रीन लॅम ‘ब्लूम डेकॉरचा’ लॅमिनेट मॅन्युफॅक्चरिंग प्लांट Rs ३६ कोटींना खरेदी करणार आहे.
इंडिगो डोमेस्टिक हवाई प्रवाशांची ट्राफिक ११% ने वाढून १.२ कोटी झाली. मार्केट शेअर ५८.३वरून ५७.९ झाला. स्पाईस चा पॅसेंजर ट्राफिक ८५.९ %वरून ८९.१% झाला.
गेल ही कंपनी LNG उत्पादनाच्या क्षेत्रात उतरणार आहे.
बायोकॉन बायोलॉजीक्ससंबंधित केसमध्ये सेंट्रल ड्रग कंट्रोलर ऑफ सेंट्रल ड्रग्स स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन आणि एका दिल्लीच्या एजन्सीच्या एक्झिक्युटिव्हजना Rs ४ लाखाची लाच घेताना पकडले. या बातमीनंतर बायोकॉन चा शेअर पडला.
आज मेटल्स, रिअल्टी, फार्मा, IT, FMCG, ऑटो, बँकिंग क्षेत्रात प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ५१८२२ NSE निर्देशांक निफ्टी १५४१३ बँक निफ्टी ३२८४५ वर बंद झाले..
Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!