आजचं मार्केट – २३ June २०२२

आज क्रूड US $ १०९ प्रती बॅरल्सच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७८.३० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.१२ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.१७ आणि VIX २०.८८ होते.

चीनमध्ये वाहनविकी १३ जून ते १९ जून दरम्यान पॅसेंजर कार्स विक्री ३९% वाढून ४.१६लाख झाली तर रिटेल विक्री ५५% ने वाढली.चीनने टॅक्स मध्ये सवलत आणि उत्पादकांना इन्सेंटिव्हज दिल्या होत्या.
FII ने Rs २९२० कोटींची विक्री तर DII ने Rs १८५९ कोटींची खरेदी केली.

नजारा टेकची २४ जूनला EX-बोनस डेट निश्चित केली आहे.

ग्लेनमार्क फार्माच्या बद्दी युनिटच्या तपासणीत ६ त्रुटी दाखवून USFDA ने फॉर्म नो. ४८३ इशू केला.
QUESS कॉर्प आणि ऑल सॅक टेक्नॉलॉजीच्या मर्जरला मंजुरी मिळाली. ऑल सॅक च्या १०० शेअर्सला QUESS कॉर्पचे ७४ शेअर्स मिळतील.
IRB इन्फ्राला NHAI कडून Rs ३१८ कोटी आर्बिट्रेशन अवॉर्ड मिळाले.

मोतीलाल ओस्वालचा Rs ११०० प्रती शेअरचा शेअर बायबॅक २४ जून २०२२ ला ओपन होऊन ७ जूलै २०२२ ला बंद होईल. कंपनी या बायबॅक साठी Rs १६० कोटी खर्च करेल.

BELला इंडियन आर्मिकडू मोठी ऑर्डर मिळाली.
स्पंदन स्फूर्तीने माजी MD पद्मजा यांच्याबरोबर सेटलमेंट केल्यामुळे या शेअरमध्ये तेजी होती.

AURION प्रो या कंपनीने कॅलिफोर्निया ट्रॅव्हल प्रोजेक्टअंतर्गत बरीच डील साइन केली.

आशियाना हौसिंग पुण्यातील रिअल्टी मार्केटमध्ये Rs ३५० कोटी गुंतवून पदार्पण करणार आहे.

रूट मोबाईल २८ जूनला शेअर्स बायबॅकवर विचार करणार आहे.

टायटन चा वूमेन एथनिक ब्रँड ‘TANEIRA’ ची दुप्पट वाढ होईल. यावर्षी Rs ३०० कोटी तर २०२७ पर्यंत Rs १००० कोटी होईल.

आज ऑटो,कॅपिटल गुड्स, टेलिकॉम, बँकिंग आणि फायनान्सियल सेक्टरमधील कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२२६५ NSE निर्देशांक निफ्टी १५५५६ बँक निफ्टी ३३१३५ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.