आजचं मार्केट – २८ June २०२२

आज क्रूड US $ ११६.०० प्रती बॅरल्सच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७८.८० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०३.८६ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.१९ तर VIX २१.२० होते.

USA मध्ये घरांची विक्री चांगली झाली.

G 7देश रशियाच्या ऑइलच्या किमती कॅप करायला भाग पडतील.

नेदरलँड, पोलंड, जर्मनी, बल्गेरिया या देशाना रशियाने नैसर्गिक गॅसचा पुरवठा कमी केला.

US आणि इराणच्या चर्चेत EU मध्यस्थाची भूमिका बजावणार.

इक्वाड़ोर आणि लीबियात राजनैतिक संकट वाढले.

उद्यापासून निफ्टी बँक निफ्टी आणि CPSE यांच्या इंडेक्स मध्ये बदल होणार आहे. ONGC वेटेज ३.२% नी वाढणार NTPC -१.५२% पॉवर ग्रीड – ०.८७% हे बदल CPSE इंडेक्स मध्ये होतील ऍक्सिस बँक +१.०४,% SBI +०.३%इंडसइंड बँक +०.१५% HDFC बँक -०.७९% ICICI बँक – ०.६८% कोटक बँक -०.३४% हे बदल बँक निफ्टी मध्ये होतील.

निफ्टी ५० मध्ये ONGC +.०५%, भारती एअरटेल +०.०५%, सिप्ला +०.०३% आणि SBI लाईफ ०.०१% रिलायन्स -०.०२% इन्फोसिस -०.०१% UPL -०.०१% TCS -०.०१%

या प्रमाणे वेटेज वाढेल /कमी होईल.

ज्या निफ्टीच्या / CPSE/ बँक निफ्टीच्या शेअरच्या वेटेजमध्ये वाढ होणार आहे त्यात गुंतवणूक येण्याची शक्यता आहे.ज्या निफ्टी/ CPSE/बँक निफ्टीच्या शेअरच्या वेटेज मध्ये घट होणार आहे त्यामध्ये गुंतवणूक कमी होईल.

महिंद्राने काल स्कॉर्पिओ-N लाँच केली. पाच प्रकारांमध्ये Rs ११.९९ लाखापासून Rs १९.४९ लाखापर्यंत मिळेल.

१५ कंपन्या व्हाइट गुड्सच्या PLI च्या दुसऱ्या चरणात Rs १३६८ कोटीची गुंतवणूक करणार.

या १५ कंपन्यात अडानी कॉपर ट्यूब, LG इलेक्ट्रॉनिक्स, विप्रो एंटरप्रायझेस,जिंदाल पॉली हॅवेल्स, सिस्का या कंपन्यांचा समावेश आहे.

यातील ६ कंपन्या AC वाल्या तर ९ कंपन्या LED वाल्या आहेत.

१ जुलै २०२२ पासून टाटा मोटर्स CV च्या किमतीत १.५% ते २.५% वाढ करणार आहे.

पारस डिफेन्स ने ऑप्टिकल इमेजिंग सिस्टीम टेक्नॉलॉजी साठी न्यू स्पेस इंडियाबरोबर करार केला.

२४ जूनपासून रुची सोयाचे नाव बदलून पतंजली फूड प्रॉडक्टस असे झाले.

IOC च्या बोनस इशूची १ जुलै २०२२ शुक्रवार ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५३१७७ NSE निर्देशांक निफ्टी १५८५० बँक निफ्टी ३३६४२ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.