आजचं मार्केट – २९ June २०२२

आज क्रूड US $११८.०० प्रती बॅरल्सच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७९.०० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.३८ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.१६ VIX २२.०५ वर होते.

USA मध्ये कन्झ्युमर सेंटीमेंट निर्देशांक , कन्झ्युमर कॉन्फिडन्सनिर्देशांक अनुक्रमे ५८.४ वरून ५० आणि १०३.२ वरून ९८ झाले.हे १९५२ पेक्षाही खालच्या पातळीवर आहेत.

चीनने प्रवाशांसाठी क्वारंटाईनची मुदत कमी केली.
श्रीराम प्रोटीनने रशियात तम्बोव येथे सनफ्लॉवर ऑइल प्रोसेसिंग फॅक्टरी सुरु केली.

FII ने Rs १२४४ कोटीची विक्री तर DII ने Rs १२०६ कोटीची खरेदी केली.

रूट मोबाईल Rs १७०० प्रती शेअर या भावाने मार्केट रुटने शेअर्स बायबॅकवर Rs १२० कोटी खर्च करेल.
१ जुलै २०२२ ही IOC च्या बोनस इशूसाठी रेकॉर्ड डेट तर बजाज ऑटोचा डिव्हिडंड, स्वराज इंजिनचा डिव्हिडंड साठी एक्स डेट आणि EKI एनर्जीच्या बोनस इशूची रेकॉर्ड डेट असेल.

LED वरील GST १२% वरून १८% केला याचा परिणाम हॅवेल्स वर होईल.

हॉस्पिटलचा रूम चार्ज Rs ५००० पेक्षा जास्त असेल तर ५% GST लागेल. याचा परिणाम अपोलो हॉस्पिटल्सवर होईल.

सोलर वॉटर सिस्टीम आणि सोलर वॉटर हिटर वरील GST ५% वरून १२% केला. याचा परिणाम टाटा पॉवरवर होईल.

लेदरवरील GST ५% वरून १२% केला.
हॉटेल रूमचे भाडे Rs १००० पेक्षा कमी असेल तर त्यावर १२% GST लागेल.

कॅसिनो, ऑनलाईन गेमिंग, आणि हॉर्स रेस यांच्यावर २८% GST चा प्रस्ताव ग्रुप ऑफ मिनिस्टर्सकडे पाठवला त्यामुळे आजचा निर्णय पुढे ढकलला गेला.
शक्ती पंप या कंपनीचे प्रमोटर्स शेअर्स खरेदी करत आहेत.

आलेम्बिक फार्मा NIPON इंडिया ग्रनुअल्स, सुप्रिया लाईफ सप्टेंबर पासून F & O सेगमेंटमधून बाहेर पडतील.

SIS लिमिटेड ही कंपनी Rs ५५० प्रती शेअर या भावाने टेंडर रूट ऑफरने शेअर्स बायबॅकवर Rs ८० कोटी खर्च करणार.

सौदी अरेबिया आणि UAE ने सांगितले की क्रूड उत्पादन पूर्ण क्षमतेने चालू आहे. इक्वाड़ोर आणि लिबिया मध्ये राजकीय संकट आहे. तसेच USA मध्येही उत्पादन कमी झाले आहे.

त्यामुळे क्रूडचे भाव वाढण्याची शक्यता आहे.
भारतात RAW शुगर वापरत नसल्यामुळे RAW शुगर निर्यात करण्याची परवानगी द्यावी अशी साखर उत्पादकांनी सरकारला विनंती केली आहे.

जपानीज चिपमेकर रेनेसान्स आणि टाटा मोटर्स यांनी सेमी कंडक्टर सोल्युशन्स डिझाईन, मॅन्युफॅक्चरिंग, डेव्हलपमेंट साठी करार केला.

सरकार क्रूडच्या डोमेस्टिक उत्पादन वाढण्यावर भर देणार आहे. त्यासाठी उत्पादनाच्या अटीत काही सवलत देण्याचा विचार चालू आहे.

नेटस्कोप या कंपनीबरोबर मास्टेकने क्लाउड सेक्युरिटी ट्रान्सफॉर्मेशन साठी करार केला.

युनिफाईड लाइटिंग च्या व्यवसायात बजाज इलेक्ट्रिकल्स उतरणार आहे.

अलाइड डिजिटल सर्व्हिसेसला सोलापूर प्रोजेक्टसाठी Rs ४९ कोटींचे LOI मिळाले. .
सरकारने क्रूड ऑईलची विक्री डिरेग्युलराइझ केली. आता क्रूड उत्पादक कंपन्या खुल्या बाजारात क्रूड विकू शकतील. मात्र क्रूड निर्यात करायला परवानगी दिली नाही. सरकारने हे उपाय डोमेस्टिक उत्पादन वाढवण्यासाठी केले.

६३००० PACS (प्रायमरी ऍग्रीकल्चर क्रेडिट सोसायटी) चे संगणकीकरण करण्यासाठी सरकारने मंजुरी दिली.

अलाइड ब्लेंडर्स आणि डिस्टीलरीज या कंपनीचा IPO लवकरच येण्याची शक्यता आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५३०२६ NSE निर्देशांक निफ्टी १५७९९ बँक निफ्टी ३३२६९ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.