आजचं मार्केट – ३० June २०२२

आज क्रूड US $ ११५ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७९ च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०५ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.०८ VIX २१.८२ होते.

फेड, ECB, BOE या सर्वांनी वाढत्या महागाईवर चिंता व्यक्त केली. USA ची मार्केट्स मर्यादित रेंजमध्ये ट्रेड करत होती. सोने मंदीत तर चांदी माफक तेजीत होती. युरोपची मार्केट्स मंदीत होती
FII ने Rs ८५१ कोटींची विक्री तर DII ने Rs ८४८ कोटींची खरेदी केली.

मिंडा इंडस्ट्रीज ने जर्मन कंपनी ‘FRIWO’ मध्ये युरो १५ मिलियनला ५.२% स्टेक खरेदी केला.

MCX वर FPI ना नॉन ऍग्रीकल्चर कॉमोडिटीजच्या डेरिव्हेटिव्हमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी सेबीने परवानगी दिली. यामुळे MCX ची डेप्थ आणि लिक्विडिटी वाढेल.

टाटा मोटर्सला दिल्ली राज्य सरकारकडून १५०० इलेक्ट्रिक बससाठी ऑर्डर मिळाली.

KRSNAA डायग्नॉस्टिक्स यांनी प्रत्येक टेस्ट करण्यासाठी भरपूर डिस्काउंट देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या सेक्टरमध्ये प्राईसवॉर सुरू होण्याची शक्यता आहे.

वॉन्डरेला या कंपनीने ओडिशा सरकारकडून ५० एकर जमीन लीजवर घेतली आहे.

तेजस नेटवर्क्सने सेमीकंडक्टर सोल्युशनसाठी जपानीज कंपनी ‘RENAISANS’ बरोबर करार केला.

बायोकॉनने AMPYR रिन्यूएबल एनर्जी रिसोर्सेस इलेव्हनमध्ये २६% स्टेक सोलार पॉवरसाठी Rs ७.५० कोटींना घेतला.

GR इंफ्राने पूर्वाचंल एक्स्प्रेस वे मोजरापूरपासून UP मधील BIJAVRA पर्यंत पूर्ण केला.

मारुतीने ब्रेंझा गाडी लाँच केली.

बांगला देश आणि थायलंड क्लिअर फ्लोट ग्लास जे सोलर एनर्जी, रेफ्रिजरेशनसाठी वापरले जातात , त्याची बेंचमार्क प्राईस US $ ३०६.१०/MT ऍन्टीडम्पिंग ड्युटी लावण्यासाठी ठरवली. याचा फायदा सेंट गोबेन, असाही यांना होईल.

DR रेड्डीज चे ‘SUBOZONE’ संबंधात जे मामले US कोर्टात होते ते सर्व रद्द झाले.

UPL ने ‘BUNGE’ बरोबर ब्राझीलमध्ये ORGEO गठन करण्यासाठी करार केला. शेतकऱ्याचे उत्पन्न आणि उत्पादकता वाढवणे हा उद्देश आहे .

देवयानी INT ने १००० वे आउटलेट सुरु केले. २०२६ पर्यंत आणखी १००० आउटलेट सुरु करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

J. B. केमिकल्स आणि फार्मास्युटिकल्सने DR रेड्डीज लॅबकडून त्यांच्या ब्रँड्सच्या पोर्टफोलिओचा भारतात उपयोग आणि वापरण्यासाठी खरेदी करण्यासाठी २९ जूनच्या बैठकीत मंजुरी दिली.
जुलै सिरीजसाठी खालीलप्रमाणे रोलओव्हर झाले.
९५% रोलओव्हर : सीमेन्स
९४% JSW स्टील. पेज इंडस्ट्रीज
९३% : ग्रासिम
९२% : अडाणी एंटरप्रायझेस. MPHASIS
९१% मुथूट फायनान्स
९०% पीडिलाइट, MRF, हिरोमोटो, ICICI बँक, रामको सिमेंट
८९% कोलगेट, श्री सिमेंट,
८८% पॉलीकॅब, ज्युबिलण्ट फूड्स, अतुल लिमिटेड, मॅरिको

झायडस लाईफच्या लॅन्कोसामाईन या औषधाला USFDA कडून मंजुरी मिळाली.

SRF चे Rs ४०५ कोटींचे दाहेज येथे असलेले प्रोजेक्ट कमिशन झाले.

अहलुवालिया काँट्रॅक्टस यांना Rs २०९ कोटींचे प्रोजेक्ट मिळाले.

IT, ऑटो, मेटल्स, रिअल्टी आणि एनर्जी शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. इन्शुअरन्स आणि NBFC शेअर्समध्ये खरेदी दिसली.

उद्या जून २०२२ या महिन्यासाठी ऑटो विक्रीचे आकडे येतील.

जुलै महिन्यात पहिल्या तिमाहीचे कॉर्पोरेट निकाल जाहीर व्हायला सुरुवात होईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५३०१८ NSE निर्देशांक निफ्टी १५७८० बँक निफ्टी ३३४२५ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.