आज क्रूड US $ १०६.९० प्रती बॅरल तर रुपया US $१= ७९.२० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०५.८५ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड २.७० VIX १६.७६ होते.
आज श्रावणातील पहिला दिवस. मार्केटनेही कात टाकली का ? मंदीचे सावट कमी झाले का
कधी कधी निकाल चांगले येऊनही शेअर पडतो. कधी निकाल कमजोर असतात पण शेअर वाढतो. काही गोष्टी कळतात, कधी अभ्यास कमी पडतो, कधी सामान्यांना काही गोष्टी समजत नाहीत, कधी अंदरकी बात असेल!असे म्हणतो. अशा काही गोष्टी समजावून देण्याचा प्रयत्न करायचा माझा मानस आहे. जेणेकरून कंपन्यांची माहिती मिळवणे हे कठीण न वाटता आनंददायी वाटेल आणि काही दिवसांनी तुम्ही स्वतः होऊन कंपन्यांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न कराल
मूलभूत गोष्टींची माहिती कंपन्यांच्या कॉन्फरन्स कॉल मधून समजत असते. अशी माहिती मी तुमहाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. आज आपण लाल पाथ लॅब DB कॉर्प, सोना कॉमस्टार यांची माहिती घेणार आहोत.
लाल पाथ लॅबच्या व्यवस्थापनाने सांगितले की आमचा मार्केटिंगवर खर्च जास्त झाला.आम्ही किमती कमी केल्या नाहीत. आम्ही स्पर्धा किंवा प्राईस वॉरच्या भानगडीत पडणार नाही. स्पर्धा टिकाऊ नसते. प्रमोशनल असते तेव्हा ठीक असते. नॉन कोविड रेव्हेन्यू वाढला आहे. स्पर्धेचा परिणाम रुटीन चेक अपच्या किमतीवर थोडा जाणवत आहे.
DB कॉर्पने सांगितले की आम्ही सब्स्क्रिप्शन रेट वाढवू शकत नाही.Rs ४ किमतीच्या वर्तमानपत्राचा दर Rs ५ करू शकतो तेथे आम्हाला किंमत वाढवायला जागा नाही. आम्ही रोज ६०० विडिओ चालवतो. यावेळी एक्स्टेंडेड दिवाळी साजरी होईल. सरकार प्रिंट मेडियावरचा टॅक्स कमी करण्याची शक्यता आहे. वर्तमानपत्राची क्रेडिबिलिटी खूप आहे. त्यामुळे आम्हाला भविष्यातील ग्रोथबद्दल विश्वास आहे.
सोना कोयो चे उत्पन्न वाढले. गेल्या २ वर्षांपासून इंडस्ट्री ( ऑटो सेक्टर) अडचणीत आहे. फ्रेट रेट कमी होतील. स्टील तांबे यांच्या किमती कमी होतील.
त्यामुळे मार्जिन सुधारेल. २ व्हीलरमध्ये रेव्हेन्यू सुधारला आही . २०२१ ते २०२२ मध्ये CAGR ३६% ग्रोथ झाली.
दीपक फर्टिलायझर्स चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
स्ट्राइड्स फार्माचा तोटा कमी झाला उत्पन्न वाढले.
मोरेपन लॅब प्रॉफिट उत्पन्न कमी झाले.
LT फूड्स उत्पन्न वाढले प्रॉफिट वाढले.
टिप्सचे उत्पन्न प्रॉफिट वाढले, मार्जिन कमी झाले.
अशोक लेलँड तोट्यातून फायद्यात आली. उत्पन्न Rs २९५१ कोटींवरून Rs ७२२३ कोटी झाले. Rs २८२ कोटी लॉसचा Rs ६८ कोटी फायदा झाला.
सन फार्मा चे प्रॉफिट वाढून Rs २०६० कोटी उत्पन्न वाढून Rs १०७६२ कोटी, मार्जिन कमी होऊन २६.८% होते.
मोतीलाल ओसवाल, IIFL सिक्युरिटीज यांचे निकाल कमजोर आले. वेस्टलाईफ डेव्हलपमेंट, डाटामाटिक्स, एकसाईड चे निकाल चांगले आले.
महिंद्रा लॉजिस्टकचे, रूट मोबाईलचे, GE शिपिंगचे, असाही इंडियाचे, SBI लाईफचे, सुंदरम क्लेटनचे निकाल सुंदर आले.
HDFC प्रॉफिट Rs ३६६८ कोटी, NII Rs ४४६५ कोटी झाले. NPA कमी झाले. फायनान्स कॉस्ट वाढली.
TTK प्रेस्टिज ने त्यांच्या प्रॉडक्टसच्या किमती १% ने वाढवल्या.
आज इंटरनॅशनल बुलियन एक्स्चेंजचे गांधीनगर गिफ्ट सिटीमध्ये उद्घाटन केले जाईल. या एक्स्चेंजमुळे व्हॉल्युम वाढतील आणि प्राईस डिस्कव्हरी चांगली होईल. सोन्याच्या गुणवत्तेचा आणि सोर्सचा भरोसा असेल. गोल्डमधे ९९९ प्युरिटीच्या गोल्डमध्ये ट्रेडिंग होईल. फिझिकल गोल्ड, डिजिटल गोल्ड किंवा कोणत्याही चलनात पैसे मिळतील. सोने रिएक्सपोर्ट करता येईल. काही दिवसांनी प्राईस सेट होईल . या एक्स्चेंमध्ये सिक्युरिटी ट्रान्सक्शन टॅक्स आणि स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत असेल. बँकांचा मध्यस्थ म्हणून रोल संपेल.
युरोझोनचा जुलै २०२२ चा CPI ८.९% होता
९ ऑगस्टला ग्रनुअल्सची शेअर बायबॅकवर विचार करर्ण्यासाठी बैठक आहे.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ५७५७० NSE निर्देशांक निफ्टी १७१५८ बँक निफ्टी ३७४९१ वर बंद झाले.
Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!