.आज क्रूड US $ १०८.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ७९.००च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.५९ US १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.०९ VIX २२.०० होते.
FII ने Rs ११३८ कोटींची विक्री तर DII नी Rs १३७८ कोटींची खरेदी केली.
सोन्यावरची इम्पोर्ट ड्युटी वाढवून १२.५% (७.५%)केली.
GIC फिनिक्स मिलच्या सबसिडीअरीमध्ये Rs १५११ कोटींची गुंतवणूक करेल.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने ब्रिटनच्या कॉफी चेन ‘PREF A MANGER’ बरोबर करार केला. या कराराद्वारा RIL फूड आणि बिव्हरेजीस व्यवसायात उतरत आहे.
ल्युपिनच्या ‘SCHIZOPHRENIA’या रोगावरील ‘PALIPERIDONE’ या औषधाला USFDA ची मंजुरी मिळाली.
ज्युबिलण्ट फार्मोवा मॉन्ट्रीअल येथील युनिटच्या विस्तारासाठी कॅनेडियन $ १० कोटी खर्च करेल.
विप्रो ‘HARTE HANKS’ मधील १.४२% स्टेक US $ ९९.०० लाखांना विकणार.
रूट मोबाईलने ‘कोकाकोला UAE’ बरोबर ऑटोमेशनसाठी करार केला.
हिंदुस्थान कॉपर QIP रुटने Rs ५०० कोटी उभारणार.
पेट्रोल(६%) डिझेल (१३%) ATF (६%) च्या निर्यातीवर ड्युटी वाढवली.
हिरो मोटोला EV साठी ‘हिरो’ ट्रेड मार्क वापरण्यासाठी आर्बिट्रेशन ट्रायब्युनलकडून मंजुरी मिळाली.
भारती एअरटेलने इंडस टॉवरमध्ये २.०६% स्टेक घेतला. गूगलला भारती एअरटेलमध्ये US ४७०० मिलियन ची गुंतवणूक करायला CCI ( कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया) कडून परवानगी मिळाली.
AGR ड्यूज साठी ४ वर्षांच्या सवलतीचा फायदा भारती घेणार आहे. पण AGR ड्यूज आणि त्यावरचे व्याज याचे रूपांतर शेअर्समध्ये करणार नाही.
आज जून महिन्यासाठी ऑटो विक्रीचे आकडे आले.
एस्कॉर्टसची विक्री १००५१ युनिट्स झाली.
बजाज ऑटोची विक्री ३.४७ लाख युनिट झाली.
VST टिलर्स आणि ट्रॅक्टर्सची विक्री ४३५८ युनिट झाली.
अतुल ऑटोची विक्री या १८१८ युनिट झाली.
आयशर मोटर्सची CV विक्री ६३०७ युनिट झाली.
अशोक लेलॅण्डची एकूण विक्री १४५३१ युनिट तर M &H CV ची विक्री ९३५१ युनिट झाली.
मारुतीची एकूण विक्री १.५५ लाख युनिट झाली.
SML ISUZU ची विक्री १३२२ युनिट झाली.
सरकारने क्रूड वरील एक्सपोर्टवर Rs २३२५०/टन विंडफॉल टॅक्स लावला. ज्या कंपन्यांचे उत्पादन २०लाख बॅरल्स पेक्षा कमी आहे त्यांना हा टॅक्स लागणार नाही SEZ मधील युनिट्स आणि EOU ना हा टॅक्स लागेल. डिझेल आणि क्रूडच्या किमतीची विंडफॉल टॅक्ससाठी समीक्षा दर १५ दिवसांनी केली जाईल.
रॉयल ऑर्चिड्सच्या प्रमोटर्सनी त्यां
घरांच्या विक्रीचा ७ शहरांचा डेटा आला. महागाई आणि घरांच्या वाढलेल्या किमती आणि कर्जावरील वाढलेले व्याजाचे दर यामुळे विक्री खालीलप्रमाणे कमी झाली
दिल्ली NCR : १९%, MMR ११% , बंगलोर १४%, चेन्नई २४%, कोलकाता २०% पुणे ११% हैदराबाद १५% .
गोदरेज प्रॉपर्टिजचा शेअर २०० आठवड्याच्या किमान स्तरावर आहे.
REC ने तुमच्याजवळ असलेल्या ३ शेअरमागे १ बोनस शेअरची घोषणा केली. आणि Rs ४ .८० प्रती शेअर अंतिम लाभांश दिला,. लाभांशासाठी रेकॉर्ड डेट ५ जुलै तर बोनससाठी रेकॉर्ड डेट १८ ऑगस्ट असेल.
विप्रो २१ जुलै २०२२, इन्फोसिस २४ जुलै २०२२, TCS ८ जुलै २०२२, पर्सिस्टंट २१ जुलै २०२२ रोजी त्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.
SBI ने सांगितले की लवकरच ते ग्राहकांसाठी व्हाट्सअँप सेवा आणि अग्रीगेटर्स आणि कॉर्पोरेट्ससाठी API सेवा सुरु करतील. SBI ने Rs १ लाख कोटींपेक्षा जास्त गोल्डलोन दिली.
जून महिन्यात GST कलेक्शन १.४५ लाख कोटी झाले
आज ऑइल &गॅस, पॉवर क्षेत्रात प्रॉफिट बुकिंग झाले. NBFC, FMCG क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२९०७ NSE निर्देशांक निफ्टी १५७५२ बँक निफ्टी ३३५३९ वर बंद झाले
Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!