आज क्रूड US $ १०२.०० प्रती बॅरल तर रुपया US $ १= Rs ७९.८० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०८.०० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.०९ तर VIX १८.७० होते.
तामिळनाड मर्कंटाईल बँकेचा IPO ५ सप्टेंबर २०२२ ला सुरु होऊन ७ सप्टेंबर २०२२ला बंद होईल. हा IPO Rs ८३१.६० कोटींचा Rs १० दर्शनी किमतीच्या १,५८,४०,००० (फ्रेश इशू ऑफ शेअर्स) शेअर्सचा असून याचा प्राईस बँड Rs ५०० ते Rs ५२५.०० आणि मिनिमम लॉट २८ शेअर्सचा आहे. हि बँक प्रोफेशनली मॅनेज्ड असून कोणीही म्हणावा तसे प्रमोटर नाहीत. या बँकेच्या ५०९ शाखा असून प्रामुख्याने तामिळनाडूमध्ये हिचा विस्तार आहे आणि इतर १५ राज्यात आणि ४ केंद्रशासित प्रदेशात शाखा आहेत.
या बँकेचे १०० वर्षांचे चांगले ट्रॅक रेकॉर्ड असून MSME, रिटेल, आणि कृषी क्षेत्रातील ग्राहक आहेत. बँकेचे डिपॉझिट सतत वाढत असून बँकेचा लो कॉस्ट डिपॉझिट वर आणि CASA रेशिओ वाढवण्यावर भर आहे.
आज पिरामल इंटरप्रायझेसचे फार्मा आणि NBFC बिझिनेस वेगळे झाले आणि NBFC बिझिनेसचे Rs १०८० वर लिस्टिंग झाले.
रुचिरा पेपर या कंपनीने तुमच्याजवळ असलेल्या १० शेअर्समागे १ बोनस शेअरची घोषणा केली.
T D पॉवर या कंपनीच्या १ शेअरचे ५ शेअरमध्ये स्प्लिट करण्यासाठी मंजुरी मिळाली.
M M फोर्जिंग्स हि कंपनी फोर्जिंग उत्पादनाच्या व्यवसायात आहे. ही प्रामुख्याने निर्यात अभिमुख कंपनी आहे पण USA आणि युरोप मधील इन्फ्लेशन तसेच युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे या तिमाहीत डोमेस्टिक विक्री निर्यातीपेक्षा जास्त झाली. येत्या दोन महिन्यात यूरोपमधील ऊर्जेची टंचाई अधिक गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. कंपनीच्या एकूण विक्रिपैकी ४८% निर्यात तर ५२% डोमेस्टिक विक्री झाली. २०% निर्यात यूरोपमध्ये तर २२% निर्यात USA मध्ये होते. ५८% निर्यात इतर देशात होते.
एप्रिल २०२२ पासून स्टीलच्या किमतीत खूप वाढ होत होती पण जुलै २०२२ पासून स्टीलच्या किमती कमी व्हावयास सुरुवात झाली आहे.तसेच एक्स्पोर्ट फ्रेट रेट्सही वाढले होते तेही हळू हळू कमी होत आहेत. ६३ टनांची नवीन फॅसिलिटी सुरु झाली आहेत. वर्षाअखेरीस एकूण फॅसिलिटी १३०००० टन एवढी असेल मिळालेल्या निर्यातीसाठी ऑर्डर्सची पूर्तता जरी वेळेवर होत असली तरी ऑर्डर्स येण्याचे प्रमाण कमी झाले आणि उशिरा येऊ लागल्या.
कंपनी सध्या ६६% कॅपॅसिटी युटिलायझेशन वर काम करीत आहे यावर्षी ७५% कॅपॅसिटी युटिलायझेशनचे लक्ष्य ठेवले आहे. तसेच टर्नओव्हर टार्गेट Rs १३०० कोटी ठेवले आहे.
अशोक लेलँड या कंपनीने लाईट कमर्शियल सेगमेंट मध्ये बडा दोस्त I १ आणि बडा दोस्त I २ ही दोन प्रोडक्ट लाँच केली. ह्यांची क्षमता २.५ टन ते २.८ टन एवढी आहे. तसेच याच LCV ची लिमिटेड एडिशन लाँच केली आहे. यात डॅश माऊंटेड लिव्हर तसेच पॅराबोलिक सस्पेन्शन आणि असेच काही इतर फिचर आहेत. E-कॉमर्स, रिटेल, लॉजिस्टिक आणि व्यक्तिशः ग्राहकांकडूनही मागणी येत आहे. मागणीत १६% वाढ होईल अशी अपेक्षा आहे. कमर्शिय सेगमेंटमधून उदयोगांकडून मागणी आहे तसेच ग्रामीण भागात CSC बरोबर करार केल्यामुळे ग्रामीण भागातील मागणीचाही फायदा होईल.
आज मेटल्स, (१ सप्टेंबरला ऑटो विक्रीचे चांगले आकडे येतील या अपेक्षेने) ऑटो, एनर्जी, बँकिंग, रिअल्टी आणि तेल आणि गँस क्षेत्रात तेजी होती.
१४ सप्टेंबर २०२२ ही बजाज फिनसर्व या कंपनीच्या बोनस आणि स्प्लिट साठी रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.
भारत गिअर्स या कंपनीच्या बोनस इशूची रेकॉर्ड डेट २८ सप्टेंबर २०२२ ही निश्चित केली आहे.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९५३७ NSE निर्देशांक निफ्टी १७७५९ बँक निफ्टी ३९५३६ वर बंद झाले.
Bhagyashree Phatak