आजचं मार्केट – ३ ऑगस्ट २०२२

आज क्रूड US $ १००.३० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७९.२० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०६.३४ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड २.७२ VIX १९ होते.

युक्रेन आणि USA यांच्यातील तणावांवरून लोकांचे लक्ष आता तैवान कडे गेले आहे. नॅन्सी पेलोसीने चीनची तमा न बाळगता तैवानला भेट दिली. याचा चीनला राग आला. तैवान चिप उत्पादनात आघाडीवर असल्यामुळे तैवान वर आपला ताबा असावा असे चीन आणि USA दोघांनाही वाटते. चीनने कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला पण नॅन्सी पेलोसीने त्याला दाद दिली नाही.

अशा वातावरणातच आजचे मार्केट सुरु झाले.पण भारताच्या दृष्टीने कमी झालेला क्रूडचा दर हे वरदान आहे. आणि थोडीशी भौगोलिक परिस्थितीची धाकधूकही आहे. म्हणून मार्केट आज तेजी मंदीचे झोके घेत होते.आता बाय ऑन डिप्स हि व्यूह रचना मार्केटच्या दृष्टीनी योग्य ठरेल.

FII ने Rs ८२५ कोटींची खरेदी तर DII ने Rs ११८ कोटींची खरेदी केली.

ब्रिगेड ही दक्षिण भारतात प्रामुख्याने बिझिनेस असणारी रिअल्टी क्षेत्रातील कंपनी आहे. गोदरेज प्रॉपर्टीजच्या कमजोर निकालाच्या पार्श्वभूमीवर आज ब्रिगेडचे निकाल उठून दिसले. कंपनीने पाहिल्य तिमाहीत विक्री कमी झाली कारण नवीन लाँच कमी केले. गृहकर्जावर आकारल्या जाणाऱ्या व्याजदरात केल्या जाणाऱ्या वाढीमुळे घरांच्या विक्रीवर परिणाम होईल पण त्याचे प्रमाण कमी असेल. दक्षिण भारतात IT सेक्टरमध्ये काम करणारी लोक घरे खरेदी करत आहेत. गेल्या ४-५ वर्षात घरांच्या किमतीत म्हणण्यासारखी वाढ झाली नाही. पण आता डेव्हलपरकडे प्राइसिंग पॉवर येत आहे. घर खरेदीदार डेव्हलपरचा घरांच्या डिलिव्हरीजचा इतिहास पाहतो. ब्रिगेडने आता VACANT प्लॉट लाँच केले आहेत. आमच्याकडे १८ मिलियनची इन्व्हेन्टरी आहे त्यापैकी ४.५ मिलियनची घरे विकली गेलेली नाहीत. त्यामुळे आता कंपनी ९.५ मिलियन चे नवीन लाँच करत आहेत. हे नवीन लाँच बंगलोर, चेन्नई, हैदराबादमध्ये करत आहेत.कोरोनाच्या काळात लोकांनी मोठी घरे पसंत केली आणि त्यामुळे कंपनीचे प्रीमियम प्रोजेक्ट विकले गेली. बंगलोर आणि चेन्नईमध्ये घरांचा मागणी आणि पुरवठा मॅचिंग आहेत.

जमिनीच्या किमती वाढत आहेत. पण डेव्हलपर जमीन मालकाबरोबर वाटाघाटी करून जमिनीची किंमत थोडीफार कमी करू शकतो.

६५% ते ६८% विक्री मिडइन्कम सेगमेंट मध्ये होते.
वोल्टसचे पहिल्या तिमाहीचे निकाल कमजोर आले. वोल्टासच्या व्यवस्थापनाने गेल्या वेळेला सांगितले होते की आमचा मार्केट शेअर वाढला आहे. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष निकालाकडे होते. पण आज आलेल्या निकालांवरून असे जाणवते की वोल्टासकडे प्राइसिंग पॉवर नाही. मार्केट शेअर वाढवण्याच्या मोहिमेमध्ये त्यांना त्यांचे मार्जिन गमवावे लागले आहे.

इंडस टॉवरचा शेअर सुधारत नाही कारण त्यांचे दोन क्लायंट आहेत त्यांच्या कडून पेमेंट वेळेत मिळत नाही. आणि त्यांच्यातले एक क्लायंट ‘VI’ असण्याची शक्यता आहि. या आधी Rs ५४७ कोटींची प्रोव्हिजन करावी लागली होती. आता नेट प्रॉफिटच्या २०% एवढी प्रोव्हिजन करावी लागेल. कर्जाचा बोजा वाढतो आहे .5Gसाठी भांडवली गुंतवणूक करावी लागली आहे. त्यामुळे या प्रश्नाचे सोडवणूक कधी होईल हे सांगता येत नाही.

E -CLERKS ९ ऑगस्टला बोनस इशूवर विचार करेल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५८३५० NSE निर्देशांक निफ्टी १७३८८ बँक निफ्टी ३७९८९ वर बंद झाली.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – ३ ऑगस्ट २०२२

 1. nilesh kadam

  Respected Ajji !
  Namaste !
  I watch all your videos on youtube.
  You mentioned that you would be giving 2 company information daily on blog.
  I could not find it.
  Please advice.
  Regards,
  Nilesh Kadam

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.