आज क्रूड US $ ९७.१० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१ = ७९.५० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०६.३८ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड २.७२ VIX १९.०० होते.
KEC इंटरनॅशनल ह्या कंपनीला FY २०२२-२३ या वर्षात Rs ३२०० कोटींच्या ऑर्डर्स मिळाल्या. या वर्षी प्रोजेक्ट एक्झिक्युशन मध्ये वेग आला आहे. कंपनीकडे Rs ७००० कोटींच्या L १ ऑर्डर आहेत. आता एकूण टोटल ऑर्डर बुक Rs ३०,००० कोटी आहे. कंपनीला बहुसंख्य ऑर्डर्स सौदी अरेबिया आणि इतर मध्य पूर्वेतील देश, आफ्रिका आणि उत्तर अमेरिका (मेक्सिको) मधून येतात. रेल्वे आणि सिविल, रेसिडेन्शियल, औद्योगिक त्यात सिमेंट मेटल्स आणि मायनिंग उद्योगातील आणि पब्लिक सेक्टरमधून वॉटर पाईपलाईन प्रोजेक्टच्या ऑर्डर्स मिळतात. हल्ली आफ्रिकेत स्लोडाऊन असल्यामुळे तेथून ऑर्डर्स येणे कमी झाले आहे.
कंपनीने डाटा सेंटरच्या व्यवसायात पदार्पण केले आहे. संरक्षण मंत्रालयासाठी बनवलेले डाटा सेंटर संरक्षण मंत्रालयाला सुपूर्द केली आहे. डेटा सेंटर्सच्या व्यवसायात Rs ७०० ते Rs ८०० कोटींच्या ऑर्डर्स अपेक्षित आहेत.
कंपनीला कोरोना निर्बंधांच्या काळात फिक्स्ड प्राईस प्रोजेक्ट घ्याव्या लागल्या यात मार्जिन कमी असायचे. आता परिस्थिती बदलली आहे. मेटल्स आणि इतर कच्च्या मालाच्या किमती कमी होत आहेत त्यामुळे तिसया तिमाहीत फायदा आणि मार्जिन वाढण्याची शक्यता आहे.
धानुका एग्रीटेक ह्या कंपनीचे एप्रिल मे महिन्यात विक्रीत चांगली ग्रोथ झाली पण जून मधील विक्री जुलैमध्ये बदली झाली. दुसऱ्या तिमाहीत विक्री वाढेल असा कंपनीला विश्वास आहे. इन्सेक्टीसाईड्स मध्ये विक्री थोडी कमी झाली असली तरी हमिसाईड्समध्ये चांगली ग्रोथ दिसली. कंपनीने दोन नवीन प्रोडक्टस लाँच केली आहेत त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. कंपनी Rs १५० कोटी क्षमता विस्तारावर खर्च करेल. कंपनीच्या प्रॉडक्टसची विक्री पश्चिम भारत आणि दक्षिण भारतात होते. उत्तर भारतात आता विक्रीत चांगली वाढ होत आहे. आता उत्पादनखर्चात घट होत आहे पण त्याचा परिणाम खरीप हंगाम संपल्यावरच दिसू शकेल.
इनॉक्स लिजरने सांगितले की आम्ही तिकिटांच्या दरात वाढ केली आहे. पहिल्या तिमाहीत चांगले मुव्हीज प्रसिद्ध झाले तसेच कोविड संबंधीत निर्बंध उठल्यामुळे उत्पन्नात वाढ झाली. आम्ही येत्या वर्षात ५० ते ६० मल्टी स्क्रीन चालू करू. PVR बरोबरचे मर्जर येत्या वर्षाअखेरीस पुरे होण्याची शक्यता आहे.आम्ही सर्व प्रकारच्या प्रेक्षकांना पसंद पडेल अशी मल्टी स्क्रीनची रचना करत आहोत. विशेषतः तरुण वर्गाला चांगला अँबियन्स पाहिजे असतो तर सिनियर सिटिझन्सला स्वस्त दर पाहिजे असतात. तर काही प्रेक्षकांना चांगले मुव्हीज बघायचे असतात. असतात.या कारणामुळे वेगवेगळ्या वेळेच्या शोजसाठी वेगवेगळे दर ठेवले आहेत.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ( BEL) या कंपनीने तुमच्याजवळ असलेल्या १ शेअरमागे २ बोनस शेअरची घोषणा केली.
उद्या सकाळी १० वाजता RBI चे गव्हर्नर RBIचे द्विमासिक वित्तीय धोरण जाहीर करतील.
आज बँका, रिअल्टी, पॉवर आणि साखर क्षेत्रातील कंपन्यांमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. अस्वस्थ जिओपॉलिटिकल वातावरण, RBI ची पॉलिसी यामुळे मार्केट सावधानता बाळगून होते. मेटल्स , फार्मा आणि IT क्षेत्रातीळ शेअर्स तेजीत होते.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ५८२९८ NSE निर्देशांक निफ्टी १७३८२ बँक निफ्टी ३७७५५ वर बंद झाले.
Bhagyashree Phatak