Monthly Archives: September 2022

आजचं मार्केट – २३ September २०२२

आज Dollar index – १११, क्रूडऑइल – ९१ , रुपया – ८० विक्स – २०.५९ USA १० वर्षे बाँड यिल्ड ३.७५ होते

USFDA ने शिल्पा मेडीकेअरच्या हैदराबाद अनलेटीक डिपार्टमेंटला क्लीन चीट दिली. ग्लेनमार्क फार्माच्या बद्दी युनिटमध्ये ६ त्रुटी दाखवल्या. औंरगाबाद मधील युनिटला क्लीन चिट दिली. TRF आणि टाटा स्टील लाँग प्रोडक्ट याचा रेशियो डिस्काउंटवर आहे.

सिपलाच्या इंदोर युनिटला २७ जून ते १जुलै या दरम्यान झालेल्या तपासणीत क्लीन चिट दिली.
रशिया आणि युक्रेन युद्धाचे ढग पुन्हा दिसू लागले आहेत. रशिया ३००००० लोकांना रिक्रूट करणार आहे. रशियाला या युद्धासाठी पैसा झोकावा लागेल.
यासाठी रशियाला त्यांच्या कडे असलेली नैसर्गिक संपत्ती मिळेल त्या किमतीस विकावी लागेल. त्यामुळे नैसर्गिक गॅस आणि क्रूड मध्ये मंदी येण्याची शक्यता आहे. क्रूड US $ ६५ प्रती बॅरल एवढे स्वस्त होण्याची शक्यता आहे.

M & M फायनान्स कंपनीवर रिकव्हरीचे काम ऑउटसोर्सिंग करण्यासाठी RBI ने पुढील सूचना मिळेपर्यंत बंदी घातली आहे. परिणामी सर्व NBFC आणि बँका यांचे शेअर्स मंदीत गेले.

ITC योगा बार ही बंगलोर बेस ८ वर्षे या क्षेत्रात असलेली स्नॅक कंपनी आहे यामुळे नेस्लेशी स्पर्धा करणे सोपे जाईल.

Tata Steel मध्ये ७ मेटल कंपन्यांचे मर्जर होईल टाटा स्टील लाँग प्रोडक्ट, tinplate यांचे मर्जर आणि टाटा मेतलिक्स व TRF, आणि indian steel, wire product यांचा विलय होईल TRF च्या १० शेअरला tata steel चे १७ शेअर
, टाटा मेतलिकच्या १० शेअर ला टाटा स्टीलचे ७९ शेअर, टाटा स्टील लाँग प्रोडक्ट १० शेअरला tata steel चे ६७,tinplate चे १० शेअर असतील तर ३३ शेअर टाटा स्टीलचे मिळतील. या अमालगमेशनमुळे कॉस्ट कमी होईल (व्यवस्थापन
लॉजिस्टिक्स वेअरहाउसिंग,) .EPS वाढेल
सिंपलिफिकेशन.scale,sustainability, synergy ,स्पीड हे पाच S साध्य
होतील. निर्णय त्वरित घेता येतील टाटा मेटॅलिक आणि टाटा लाँग प्रॉडक्ट्स
यांना पालक कंपनीला आयर्न ore chyaa वाहतुकीसाठी रॉयल्टी द्यावी लागणार
नाही. नीलांजन इस्पात घेतल्यानंतर पोर्टफोलिओ मोठा आणि अर्थपूर्ण होईल. टिन प्लेट आणि टाटा मेटॅलिक या दोन्हीसाठी मरजर रेशियो चांगला आहे.
इंडियन स्टील आणि वायर, टाटा स्टील माईनिंग आणि S & T माईनींग या अनलिस्टेड कंपन्या आहेत.

काल USA फेड ने ०.७५% दरवाढ केल्यावर दक्षिण आफ्रिका, UAE ,,सौदी अरेबिया, हाँग काँग, स्वित्झर्लंड यांनी ही त्यांच्या दरामध्ये ०.७५%ची
वाढ केली. फिलिपाईन्स इंडोनेशिया नॉर्वे यांनी ०.५०% दरवाढ केली.तैवान ने १२५ बेसिस पाईंट दर वाढवले. CCI ने हॉस्पिटल चेनना प्राईस फिक्सिंग साठी नोटिसा पाठवल्या.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५८०९८ NSE निर्देशांक निफ्टी १७३२७ बँक निफ्टी ३९५४६ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २२ September २०२२

आज क्रूड US डॉलर 90.30 च्या आसपास तर रुपया US डॉलर 1=₹ ८०.९० च्या आसपास होता. US डॉलर निर्देशांक १११.६४ USA १० वर्षे bond yield ३.५६ आणि VIX १९ होते. बँक ऑफ इंग्लंडने दर ०.५० % ने वाढवले आता दर २.२५% झाला.
फेडने दर ०.७५% ने वाढवले. अपेक्षेप्रमाणे निर्णय आल्यामुळे USA मार्केट काही काळ सुधारली.पण जेव्हा फेडच्या कॉमेंट्रीतून त्यांचे कठोर धोरण जाणवले तेव्हां पुन्हा मार्केट मंदीत गेले.२०२२ च्या अखेरपर्यंत ४.४०% रेटचा अंदाज व्यक्त केला गेला म्हणजेच अजूनही पुढील दोन पॉलिसी मध्ये मिळून १.२५%एवढी दरात वाढ. होण्याची शक्यता आहे. यामुळें पुन्हा अमेरिकन मार्केट मंदीत गेले US डॉलर निर्देशांक वाढला आणि रुपया घसरला.भारतीय मार्केटही मंदीत होते. हॉटेल्स FMCG,foot wear आणि garments मध्ये तेजी होती.

किर्लोस्कर ऑईल इंजिनने अहमदाबादच्या LGM (La गज्जर मशिनरीमध्ये २४ % स्टेक घेतला.२०१७ मध्ये ७६% स्टेक घेतला होता. त्यामुळे ही किर्लोस्कर ऑईल इंजिनची पूर्णपणे मालकीची सबसिडीअरी झाली.

रिलायन्स रिटेल नवीन कपड्याचा आणि अक्सेसरी ब्रँड स्टोअर चेन चालू करणार आहे. यामुळे ZARA आणि HM इंडिया यांच्याबरोबर स्पर्धा करू शकेल.

सिटीने APTUS व्हॅल्यू हाउसिंग फायनान्स या शेअरचे

कव्हरेज सुरू केले .BUY रेटिंग दिले आणि Rs ४२५ टार्गेट दिले म्हणून शेअर तेजीत होता.

सरकारने TDI वर २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत लावलेल्या आणि चीन जपान आणि कोरिया येथून आयात होणाऱ्या अँटी डंपिंग ड्यूटीची मुदत ५ वर्षे वाढवली.याचा फायदा GNFC ला होईल.फक्त ही कंपनी याचे उत्पादन करते लुपिनला Diclofenac sodium topical solution USP ला USFDA ने मान्यता दिली. या औषधाचे USA मध्ये US डॉलर ४८.४ कोटींचे मार्केट आहे. या औषधीचे उत्पादन पिथमपुर प्लांट मध्ये होईल.

रोलेक्स रींग्ज:- ही कंपनी रिंग्ज बनवणारी देशातील ५ वी मोठी कंपनी आहे. ही कंपनी हॉट रोलड फोर्ज आणि इंडस्ट्रियल मशीन बेअरींग रिंगचे उत्पादन करते.प्रामुख्याने ऑटो सेक्टरला सप्लाय करते.पण ते नॉन ऑटोमोटिव इंडस्ट्रीजनाही इंडस्ट्रियल मशीन बेअरींगचा सप्लाय करतात. कंपनीच्या प्रॉडक्ट्चे लाईफ १८ ते२० वर्षे असते कंपनीची वर्तमान उत्पादन क्षमता १४४०० MPT आहे. कंपनी क्षमता विस्तार करत आहे पण तो पूर्ण व्हायला ३ महिने लागतील. कंपनीच्या प्रॉडक्ट्सना डोमेस्टिक मार्केटमध्ये चांगली मागणी आहे.कारण डोमेस्टिक ग्राहक त्यांचा क्षमता विस्तार करत आहेत.

युरोप आणि USA मध्ये ग्रोथ कमी होईल. कंपनी येत्या तीन वर्षात १५% ते २०% YOY ग्रोथ करील असे अनुमान आहे. FY २२ मध्ये कंपनीचे उत्पन्न ₹ १०२० कोटी होते.

कंपनीच्या मुख्य कच्च्या मालाच्या म्हणजेच अलोय स्टीलच्या किमती ३०% ते ४०% ने वाढल्या. त्या आता हळूहळू कमी होत आहेत. पण त्याचा कंपनीच्या मार्जिनवर जास्त परिणाम अपेक्षित नाही.

कंपनी EV आणि हायब्रीड व्हेईकल्स साठी कम्पोनंट बनवू शकते. पण EV आणि हायब्रीड व्हेइकल्सचे मार्केट कमी वेगाने वाढत आहे.

नवी मुंबई विमानतळ जुलै २०२४ पर्यन्त सुरू होईल.याचा फायदा RIIL आणि JAI CORP या कंपन्यांना होईल.

स्पाइस जेटने ,१ऑक्टोबर २०२२ पासून वैमानिकांचे

पगार 20% ने वाढवले

GMM PFAUDLER ने GMM इंटरनॅशनल SARL मध्ये स्टेक घेण्याला UK मधील रेग्युलेटरी अथॉरिटीने परवानगी दिली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९११९ NSE निर्देशांक निफ्टी १७६२९ बँक निफ्टी ४०६३० वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २१ September २०२२

आज क्रूड US डॉलर ९०.३० प्रती baral च्या आसपास तर रुपया US डॉलर १= ₹ ७९.८० च्या आसपास होते

US डॉलर निर्देशांक ११०.२७ USA १० वर्षे बाँड यिल्ड ३.५६ VIX १९.४० होते.

अडानी ग्रुपने अंबुजा सिमेंट मधील ६३.१५% स्टेक आणि ACC मधील ५६.६९% स्टेक (व्हॅल्यू ऑफ स्टेक ₹ १ लाख कोटी) तारण म्हणून ठेवला. त्यामुळे ACC आणि अंबुजा सिमेंट या शेअर्समध्ये मंदी आली.

M&M ही कंपनी स्वराज इंजिनमध्ये जादा १७.४१% (२१,१४,३४९ शेअर्स) Rs १४०० प्रती शेअर या भावाने Rs २९६ कोटींना घेतला.आता M&M चा स्वराज इंजिन मधील स्टेक ३४.७२% वरून ५२.१३% होईल. त्यामुळे स्वराज इंजिन ही M&M ची सबसिडीअरी होईल.स्वराज इंजिन ही कंपनी डिझेल इंजिन आणि त्याचे कॉम्पोनंटचे उत्पादन करते. ही १९८५ वर्षात पंजाब ट्रॅक्टर ने प्रमोट केलेली कंपनी असून मोहाली मधून कार्यरत आहे. नंतर ती किर्लोस्कर ऑईल इंजिन्स आणि आता M&M कडे हस्तांतरीत झाली.या स्टेक सेल्समुळे किर्लोस्करना पैसे मिळतील म्हणून किर्लोस्करचां शेअर तेजीत होता. FY २०२२ साठी स्वराज इंजिनचे रेव्हेन्यू Rs.११३८.१५ कोटी होते.

त्रिवेणी इंजिनीअरिंगने त्यांचा त्रिवेणी टरबाईंसमधील
११.८५% स्टेक ब्लॉक डीलच्या माध्यमातून Rs
८७५ कोटींना विकला. आज हे दोन्ही शेअर्स तेजीत होते.

Central Bank आजपासून PCA fremwork मधून बाहेर आली पण याचा अर्थ स्थिती सुधारली असा मात्र घेऊन फसू नये.

जेफ्रिनी सांगितले की SBI ची क्रेडिट growth चांगली आहे क्रेडिट कॉस्ट सुद्धा कमी होत आहे ७०० रुपये पर्यंत त्यांनी टार्गेट दिले तसेच जॉब इंडस्ट्रीमध्ये चांगली growth आहे याचा फायदा टीम लिज आणि quess कॉर्प अशा प्रकारच्या कंपन्यांना होईल
कोफोर्जने डाटाब्रिक्सबरोबर डिजिटल डाटा सोल्युशनसाठी करार केला.

झुरीच इन्शुरन्स या जर्मन कंपनीकडून TCS ला लाईफ इन्शुरन्स बिझीनेसच्या ट्रान्सफॉरमेशनसाठी ऑर्डर मिळाली.

S P ॲपरलस ही कंपनी Rs 585 प्रती शेअर या भावाने 6 लाख शेअर्स टेंडर ऑफर रुटने बायबॅक करणार आहे.

HDFC बँकेने REFINITIVE बरोबर लाँग टर्म डाटा टेक्नॉलॉजीसाठी करार केला.

TVS मोटर्सने बांगलादेशमध्ये APACHE RTR 160 2v लाँच केली.

CE इन्फोने KOGO टेक लॅब बरोबर MAPS नॅव्हीगेशन प्लॅटफॉर्म साठी करार केला.

सोलार मोड्युलसाठी PLI स्कीम जाहीर केली. याचा फायदा बोरोसिल रीन्यूएबल्सला होईल.दुसऱ्या टप्प्यात Rs 19500 कोटींची PLI स्कीम जाहीर केली.

घरगुती सेमीकंडक्टरसाठी अतिरिक्त PLI स्कीम जाहीर केली.एका युनिट साठी Rs 12000 कोटींची मर्यादा रद्द केली.सर्व प्रकारच्या सेमीकंडक्टरसाठी आता 50% इन्सेंटीव्ह मिळेल. सर्व साइझच्या नोड्स साठी ५०% insentive मिळेल.

इंडिया पेस्टीसाईड्स ही agrochemical कंपनी आहे. कच्चा माल आणि एनर्जी कॉस्ट वाढली याचा मार्जिनवर परिणाम झाला. हरबिसाईड आणि फंगीसाईडचे API बनवतात. धानाची पेरणी 4%ते ५%कमी झाली. ४००० TPA पर्यंत क्षमता विस्तार करणार आहे.

फेडच्या निर्णयाची वाट मार्केट पहात होते त्यामुळे सावध पवित्रा मार्केटचा होता.

BSE निर्देशांक सेन्सेक्स,५९४५६ NSE निर्देशांक निफ्टी १७७१८ बँक निफ्टी ४१२०३ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २० September २०२२

आज क्रूड US dollar ९२.५० चा आसपास तर रुपया US डॉलर १=₹ ७९.७० चा आसपास US dollar निर्देशांक १०९.६३ USA १०वर्षे बाँड यिल्ड ३.९० VIX १९.०१ होते.

सेबी च्या नियमानुसार प्रमोटरकडे ७५% शेअर्स असू शकतात. ही अट पूर्ण करण्यासाठी बटरफ्लाय गांधिमती चे १०.७२ लाख शेअर्स किंवा ६% स्टेक OFS च्या माध्यमातून ₹ १३७० या फ्लोअर प्राईसने २०आणि २१सप्टेंबर २०२२ laa विकणार आहेत.OFS चा नॉन रिटेल भाग पूर्ण भरला.
बॉम्बे dyeing ही कंपनी राईट्स इशू द्वारें
फंड उभारणार आहे.

ठाणे महापालिकेकडून ₹ १८५ कोटींची १२३ इलेक्ट्रिक बसेससाठी ऑर्डर मिळाली.

नाटको फार्माला chlorantraniliprole CTPR आणि हे इन्सेक्टिसाईड थ्रू नॉनइन्फ्रिनजिंग प्रोसेस आणि त्याची फॉर्म्युलेशन्स लाँच करायला परवानगी दिली.

मिष्टान्न फुड गुजराथमधील साबरकाठा येथील धालपूर
या खेड्यात १०००किलो लीटर प्रती दिवस उत्पादन क्षमतेचा ग्रेन बेस्ड इथेनॉल प्लांट लावणार आहे.
IRCON ला महानदी कोल फिल्ड कडून ₹२५६ कोटींची work ऑर्डर मिळाली

जियो सिनेमा OTT आणि VIACOM 18 मेडिया यांच्या मर्जरला CCI ची मंजूरी मिळाली.

हट्सन अग्रो ही कंपनी राईट्स इशुद्वारें ₹ ४०० कोटी उभारेल.

वेलस्पन कॉर्पने नौयान शिप यार्डचे सर्व शेअर्स खरेदी केले.₹ १०००००/- दिले.ही कंपनीची पूर्ण मालकीची सबसिडीअरी होईल.

इनॉक्स लिजरचे लाँग टर्म रेटिंग वाढवून A+चे AA- केले.

कॉफीची किंमत वाढत आहे.CCLचा व्हिएतनाममध्ये ५५००० टन टर्नओव्हर होईल तर देशात ७२००० टन turnover होईल.

CCL व्हिएतनाममधील क्षमताविस्तारासाठी US dollar ३ ते ४ कोटी खर्च करेल,,३०% ते ४०% किमतीतील वाढीचा फायदा त्यांना मिळाला. कॉफीची किंमत ७०% ते ८०%वाढली डिसेंबर मध्ये नवीन कॉफिचे उत्पादन येइल तेव्हा कॉफीच्या किमती कमी होतील.

MAP MY इंडियाने MAPPLS हे स्वदेशी ॲप लाँच केले. कंपनी नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसी बरोबर काम करेल. याचा फायदा लॉजीस्टिक,टेक तसेच वाहतूक कंपन्यांना होईल.

RBI NBFC ना क्रेडिट कार्ड इशु करायला परवानगी देण्याच्या विचारात नाही. त्यामुळे SBI कार्ड्सना स्पर्धा होणार नाही. यामुळं SBI कार्ड चा शेअर वाढला

१ ऑक्टोबर २०२२ रोजी वाराणसी, बंगळुरू, दिल्ली मध्ये रिलायन्स जियो, भारती एअरटेल 5G लाँच करेल.

kKR हिरो मोटो कॉर्पमध्ये ₹ ४०००/- कोटींची गुंतवणूक करणार आहे

Aster DM ने मध्य पूर्वेतील व्यवसायासाठी निधी उभारण्याची मोहीम तेज केली

कॅनफिना होम्सचे MD आणि CEO गिरीश कौसगी यांनी राजीनामा दिला. त्यामुळे शेअर मंदीत गेला.
सर्व ऑटो OEMS मधे २२% प्रगती आहे पण टाटा मोटर्सचा रिटर्न -१ ०% आहे. टाटा मोटर्सचे main प्रोडक्ट जग्वार landrover हे आहे UK,USA, युरोप, चीनमध्ये सारख्या प्रमाणात विक्री होते.ही हायएन्ड लक्झरी कार आहे.

यासाठी हायएन्ड सेमीकंडक्टर चिप्स लागतात.याची सप्लाय चेन अजून पूर्ण सुधारलेली नाही.युरोप,UK मध्ये महागाई आहे चीनमध्ये लॉक डाऊन चालू आहे यामुळे सगळे ऑटो क्षेत्रातील शेअर तेजीत असले तरी टाटा मोटर्स मंदीत असतो.

आज mid cap,small cap share, It,Pharma, मद्याचे शेअर,सिमेंट, रिॲलिटी,मेटल FMCG मध्ये खरेदी दिसली.

BSE sensex ५९५१९, NSE Nifty १७८१६ , BANK Nifty ४१४६८ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १९ September २०२२

आज क्रूड US डॉलर 90 च्या आसपास तर रुपया US डॉलर1=₹ ७९.६0 आसपास होते.US डॉलर निर्देशांक १०९.८५ USA १०वर्षे बाँड यील्ड ३.४५ आणि VIX २०.०६ होते

या आठवड्यात USA FED, बँक ऑफ इंग्लंड,तसेच जपान, स्वित्झर्लंड,नॉर्वे या देशांच्या सेन्ट्रल बँका त्यांचे वित्त्तिय धोरण जाहीर करतील.

UK, युरोप मध्ये नैसर्गिक गॅसच्या किमतीत थोडी घट झाली.

सरकारने वींडफॉल गेन टॅक्स कमी केला.

टेलिकॉम सेक्टरमध्ये मर्जर आणि अधिग्रहण सोपे होइल.

पेनल्टीची कमाल मर्यादा ₹50 कोटी केली जाईल.
टेलिकॉम रिफॉर्म बिलाला संसदेच्या शीतकालीन सत्रात

मंजूरी शक्य. टेलिकॉम लायसेन्ससाठी अटी, पात्रता आणि प्रक्रिया सोपी केली जाईल. स्पेक्ट्रम लिलाव साठी नवीन नियम केले जातील.

Adani पॉवरने dilisting चा प्रस्ताव मागे घेतला.
पंतप्रधानांनी 17 सप्टेंबर 2022 रोजी लॉजिस्टिक्स पॉलिसी जाहीर केली. लॉजिस्टिक्स कॉस्ट कमी करणे, आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक्स कॉस्टच्या जवळच्या स्तरावर आणणे, पहिल्या 25 देशात भारताची लॉजिस्टिक्स कॉस्ट आणणार. मालाची वाहतूक,साठवण, inventory व्यवस्थापन, रेल,रोड, शिपिंग वाहतुकीला उत्तेजन देणे ,
ULIP वर 17सिस्टिम्स जोडल्या आहेत. 35 लॉजिस्टिक्स हब स्थापन करणार आहे.

MCX 21सप्टेबरपासून सोन्यामध्ये मंथली ऑप्शन सुरु करणार आहे. लॉट 100 किलोचा तर टिक साइज् ₹ ०.५०ची असेल. ही ऑप्शन्स गोल्ड फ्युचरवर आधारीत असतील.एकाच
फ्युचरवर वेगवेगळया ऑप्शन्सची एक्सपायरी असेल
TVS मोटर्सने NTRQ १२५ रेस XP नेपाळ मध्ये लाँच केली.

गेटवे डिट्रीपार्क या कंपनीकडे ३१आगगाड्या, आहेत ९ inland कंटेनर डेपो, आणि ५०० ट्रेलर आहेत जनरल आणि bonded Wearhouse , railway आणि रोड वाहतूक सेवा,कंटेनर handling आणि इतर संलग्न सेवा पुरवते Snowman logistics द्वारा तपमान कंट्रोल सेवा पुरवते.

IBAHN इलुमिनेशन ही स्मार्ट लायटिंग सोल्युशन्स Dixon टेक ने खरेदी केली.

DB रियलतीजने ₹ ४८० कोटींना जमीन विकण्यासाठी करार केला. म्हणून शेअर तेजीत होता.
M&M त्यांच्या रीन्यूएबल एनर्जी arm मधील व्हॅल्यू अनलॉक करण्याच्या विचारात आहे.

इंडो नॅशनलच्या TINEKO या सबसिडीअरीला ₹११३कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. त्यामुळे शेअर तेजीत होता.

DELTA CORP ला DELTIN हॉटेल दमण मध्ये कॅसिनो चालू करण्यासाठी लायसेन्स मिळाल्याच्या बातमीचा कंपनीने इंकार केला.

आयनॉक्स विंडने सांगितले की ते आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेसचा IPO आणणार आहेत. त्यामुळे शेअर मध्ये तेजी होती.

वेलस्पन कॉर्पला USA मधून कार्बन कॅपचर पाइपलाइनसाठी ऑर्डर मिळाली. त्यामुळे शेअर तेजीत होता.
मफतलाल इंडस्ट्रीज त्याच्या १ शेअरचे ५ शेअर्स मध्ये स्प्लिट करणार आहेत.

ग्रानुअल्स या कंपनीचा शेअर बायबॅक २७ सप्टेंबर २०२२ ते ११ऑक्टोबर २०२२ दरम्यान ओपन राहिल.
GAIL ने LNG कार्गो साठी गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट किंमतचुकवली.रशियाकडून होणारा नैसर्गिक गॅसचा पुरवठा बंद/कमी झाला हे कारण आहे

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९१४१ NSE निर्देशांक निफ्टी १७६२२ आणिf बँक निफ्टी ४०९०४ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १६ September २०२२

आज क्रूड US $ ९१.००प्रती बॅरल्सच्या आसपास तर रुपया US $१ = Rs ७९.८० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०९.५९ USA १०वर्षे बॉण्ड यिल्ड ३.४५ VIX १९.१५ होते.

UK मधील रिटेल सेलचे आकडे कमजोर आले.
२०-२१ सप्टेंबरला फेड आपले व्याजाचे दर जाहीर करेल.

सोने आणि चांदी मध्ये मंदी आहे. तसेच बेस मेटल्स मध्येही मंदी आहे. वाढत असलेले बॉण्ड यिल्ड आणि व्याजाचे दर यामुळे मेटल्समध्ये मंदी आहे. नैसर्गिक गॅस मध्ये माफक मंदी आली. कारण चीन आत जास्त निर्यात करेल.

लॉजिस्टिक्स आणि इंफ्रासाठी कर्ज देण्यास REC ला मंजुरी मिळाली.

गोदरेज प्रॉपर्टीजने Rs १२०० कोटींचे दोन प्रोजेक्ट विकले.

चीनमधील रिटेल सेल्स ५.४% झाले. चीनमधील अनएम्प्लॉयमेंट ५.३% झाली तर IIP ४.२% झाले.
‘VI’ ने १५.४ लाख ग्राहक गमावले तर भारती एअरटेलने ५.१३लाख ग्राहक मिळवले तर रिलायन्सने २९.५ लाख ग्राहक मिळवले.

UPL ने क्लीन मॅक्स KRATOS PVT LTD मध्ये २६% स्टेक घेतला. ही कंपनी सोलर आणि विंड पॉवर क्षेत्रातील ही कंपनी आहे.

भारताची करंट अकाउंट डेफिसिट या दशकातील सर्वात जास्त आहे.

वेदांताची अल्टिमेट होल्डिंग कंपनी VOLCAN इन्व्हेस्टमेंट ही सेमी कंडक्टर उत्पादनाचा बिझिनेस सांभाळेल.

MANKIND फार्मा IPO साठी अर्ज करणार आहे. प्रमोटर त्याचा १०% स्टेक साठी OFS करण्याची शक्यता आहे.

ITD सिमेंटेशन ही अर्बन इन्फ्रा, ब्रिज, प्लायओव्हर, मरिन लॉजिस्टिक्स आणि अंडरग्राउंड प्रोजेक्टमध्ये काम करणारी कंपनी आहे. भारत, बांगलादेश, फिलिपिन्स, व्हिएतनाम श्रीलंका या देशातून प्रोजेक्ट मिळतात. सध्या Rs २०००० कोटींचे ऑर्डर बुक आहे. मरिन लॉजिस्टिक्स साठी जगभरातून ऑर्डर मिळतात.

गोदावरी पॉवर इस्पातने त्यांच्या छत्तीसगढ मधील सिलत रा येथील प्लांटची क्षमता 24लाख टनांवरून 27लाख टन करायला मंजुरी मिळाली
बाबा रामदेव यांनी सांगितले की लाईफ स्टाईल बिझीनेस आणि आयुर्वेद बिझीनेस यासाठी IPO आणणार आहे.

झायड्स लाईफच्या shugarnndex इंजेक्शनला USFDA ने मंजुरी दिली

टाटा मेटॅलिकने सांगितले की त्यांच्या खरगपूर येथील डक्टाईल आयर्न पाईप प्लांटच्या विस्ताराला सुरुवात झाली. ही प्रोजेक्ट ₹ ६०० कोटींचे आहे याची कपॅसिटी प्रत्येक वर्षाला ४ लाख टन आहे Sampre Nutrition या microcap फर्म मध्ये Eriska investment फंडानी ५०००० शेअर १०१ रुपये भावाने घेतले त्यामुळे शेअर मध्ये तेजी होती

इन्फोसिस दुसऱ्या तिमाहीचे निकाल 13ऑक्टोबर 2022 रोजी जाहीर करेल

ब्लिंकीटने ऍपलबरोबर आयफोन 14 आणि त्याच्या अक्सेसरिज डिलिव्हरी करण्यासाठी करार केला. त्यामुळे मंदीच्या मार्केटमध्येही zomato चा शेअर तेजीत होता.

BSE निर्देशांक सेन्सेक्स 58840 NSE निर्देशांक निफ्टी 17530 बँक निफ्टी 40776 वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १५ September २०२२

आज क्रूड US $ ९४.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७९.५०च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०९.६९ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.४२ VIX १८.२८ होते.

LIC ने GSK फार्मामधील त्यांचा स्टेक २% ने कमी केला.
तामिळनाडू मरकन्टाइल बँकेचे BSE वर Rs ५१० वर आणि NSE वर Rs ४९५ वर लिस्ट झाले. हे शेअर्स IPO मध्ये Rs ५२५ ला दिले आहेत.
मेडिकल डिव्हाइसेस उत्पादनाच्या अटी सोप्या केल्या जाण्याची शक्यता आहे याचा फायदा BPL आणि पॉलिमेडीक्युअर या कंपन्यांना होईल.
बालाजी अमाईन्सने फेज I ग्रीन फिल्ड प्रोजेक्ट पूर्ण केली.
कॅम्पस ऍक्टिव्हवेअर ३०० नवी डिझाईन लाँच करणार आहे.
GR इन्फ्रा ६.८% स्टेक OFS च्या माध्यमातून विकणार आहे. या OFS ची फ्लोअर प्राईस Rs १२६० आहे.
PAYtm वर ED ने काही ठिकाणी धाडी टाकल्या.
दीपम लवकरच IDBI बँकेसाठी EOI ( एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट ) फ्लोट करेल.
HFCL ला Rs ४४७ कोटीच्या रेलटेल आणि BSNL कडून ऑर्डर्स मिळाल्या.
होम फर्स्ट फायनान्स मधून वॉरबर्ग पिंकस हे प्रमोटर त्यांची २८.७३% स्टेक विकून बाहेर पडतील.
आज BEL मध्ये बोनस इशूची अडजस्टमेन्ट होऊन किंमत आली.
PVR मधील ९.३४% स्टेकमध्ये डील झाले. याची किंमत Rs १०७४ कोटी आली.
वेदांताने गोघरपल्ली कोल ब्लॉकसाठी सर्वात जास्त बोली लावली.
ASTRAL पॉली च्या UK मधील सबसिडीअरीने सील IT सर्व्हिसेसमध्ये ५% स्टेक घेतला. आता ASTRAL पॉली चा स्टेक ९५% होईल.
LIC ने डिपॉझिटरी चालू करण्यासाठी IRDA बरोबर बोलणी सुरु केली. इन्शुअरन्स पॉलिसी डिमटेरिअलाईझ करण्यासाठी LIC वेगळी डिपॉझिटरी उघडणार आहे.
लेड केअर हॉस्पिटल LLI मध्ये ऍस्टर DM ने २% स्टेक खरेदी केला.
सोम डिस्टीलरीजने दिल्लीमध्ये नवीन मद्य धोरणानुसार बीअर आणि मद्याची दुकाने सुरु केली.
वेदांता ओडिशामध्ये अल्युमिनियम फेरो क्रोम आणि मायनिंगच्या क्षमता विस्तारासाठी Rs २५००० कोटींची गुंतवणूक करेल.
गतीशक्ती योजनेअंतर्गत इन्फ्रस्ट्रक्चरच्या Rs १.००लाख कोटींच्या २२ प्रोजेक्टसला मंजुरी मिळाली. यात २ रोड, ८ हाऊसिंग आणि अर्बन, ४ पेट्रोलियम मंत्रालयाच्या तर ६ रेल्वेच्या प्रोजेक्टसला मंजुरी मिळाली. विशाखापट्टण च्या मल्टिमोडल लॉजिस्टिक हब च्या प्रोजेक्टला मंजुरी मिळाली. IOC च्या ATF पाइपलाइनला मंजुरी मिळाली. याचा फायदा बामर लॉरी, IRCON, वेलस्पन कॉर्प यांना होईल.
अशोक लेलँडने सांगितले की आम्ही सरकारच्या ५०००० इलेक्ट्रिक बस च्या टेंडर मध्ये भाग घेऊ. तसेच आमची दोस्त I आणि दोस्त II यांचा इलेक्ट्रिक अवतार सहा ते नऊ महिन्यात येईल. तसेच हायड्रोजनबेस्ड IC इंजिन्सचे टेस्टिंग चालू आहे.
वेदांताची ११ ऑक्टोबर २०२२ रोजी शेअरहोल्डर्सची मीटिंग आहे. वेदांताकडे Rs १२५०० कोटी जनरल रिझर्व्हज आहेत. त्यामुळे स्पेशल डिव्हिडंड जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रेड्डींग्टन ने गूगलबरोबर करार केला.
आज IT मेटल्स, पॉवर रिअल्टी मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. ऑटो, टायर उत्पादक कंपन्या, रेडीमेड आणि होजियरी उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९९३४ NSE निर्देशांक निफ्टी १७८७७ बँक निफ्टी ४१२०९ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १४ September २०२२

आज क्रूड US डॉलर्स ९३.४० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US dollar १=₹ ७९.६० चया आसपास होते.US डॉलर निर्देशांक १०९.७८ USA १०व र्षे बाँड यिल्ड ३.४५आणि VIX १८.२० होते.

डाऊ जोन्स,S&P, NASHDAQ, हे तिन्ही निर्देशांक ४, ते ५ टक्के मंदीत होते. ऑगस्ट २०२२साठी.USA चा CPI ८.३ एवढा आला. USA मध्ये सर्व सेक्टर मध्ये महागाई वाढत आहे.हाउसिंग,मेडिकल, क्षेत्रात महागाई सर्वात जास्त आहे.कर्ज महाग झाले आहे. अर्थव्यवस्था मंदीत जाण्याचा धोका आहे.तसेच आशियातील मार्केटही मंदीत गेली.

UK चा CPI निर्देशांक ९.९ आला .

हट्सन ऍग्रो १९ सप्टेंबर २०२२ ला राईट्स इशू द्वारे भांडवल उभारण्यावर विचार करेल.

महाराष्ट्र स्कुटर्सने Rs १०० ( रेकॉर्ड डेट २३ सप्टेंबर ) आणि बजाज होल्डिंगने Rs ११० प्रतिशेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.

इन्फोसिसने Bpost ( बेल्जियम पोस्ट) बरोबर कोलॅबोरेशन केले. Bpost ही यूरोपमध्ये पोस्टल ऑपरेटर आणि पार्सल ओम्नी कॉमर्स लॉजिस्टिक्स कंपनी आहे. JSW स्टील ही जर्मनी बेस्ड SMS ग्रुप बरोबर करार केला. कार्बन एमिशन कमी करण्यासाठी Rs १०००० कोटी गुंतवणार आहे.
PVR /इनॉक्स च्या प्रस्तावित मर्जरविरुद्धची कंप्लेंट रद्द केली. त्यामुळे आता या मर्जरला मंजूरी मिळणे सोपे झाले.

अडानी ट्रान्समिशन ही अडानी इलेक्ट्रिसिटी जेवर ही होलली ओन्ड सबसिडीअरी स्थापन केली आहे. या कंपनी द्वारे पॉवर ट्रान्समिशन, डिस्ट्रिब्युशन, सप्लाय आणि संबंधित इन्फ्रास्ट्रक्चर सेवा पुरवणार आहे.
भारत फोर्जचे कल्याणी पॉवर ट्रेंड युनिटने USA बेस्ड HARBINGER मोटर्स बरोबर JV केले. कमर्शियल व्हेईकल मार्केटसाठी इलेक्ट्रिक ड्राइव्ह ट्रेन सोल्युशन विकसित करण्यासाठी करार केला.

KEC इंटरनॅशनलला Rs ११०८ कोटींची ऑर्डर मिळाली.

झायडस लाईफ सायन्सेस LENALIDOMIDE या विविध कर्करोगांसाठी उपयोगी असलेल्या कॅप्सूल्स विकण्यासाठी US हेल्थ ऑथॉरिटीची मंजुरी मिळाली. JP पॉवर व्हेंचर ही मध्य प्रदेशातील १० कोळशाच्या खाणींच्या राज्य सरकारने केलेल्या लिलावात हायेस्ट बीडर आहे.

EKI एनर्जी सर्व्हिसेसने एक प्लास्टिक प्रोजेक्ट आंतरराष्ट्रीय ACCREDATION स्टॅंडर्डखाली लिस्ट केली. यामुळे भारताला पहिले आंतरराष्ट्रीय प्लास्टिक लिस्टिंग मिळाले. फिलाटेक्स इंडिया या कंपनीला पॉलिथिलिन TELIPHATELETE च्या वेस्ट रिसायकलिंग साठी २० वर्ष मुदतीचे पेटंट मिळाले.
भारताचा ऑगस्ट २०२२ महिन्यासाठी WPI (होलसेल प्राईस इंडेक्स )१२.४१ झाला. जुलै महिन्यासाठी हा १३.९३ होता. हा MOM ( मंथ ऑन मंथ कमी झाला.

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १७ सप्टेंबरला नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसी जाहीर करतील. यात IDS (इंटिग्रेशन ऑफ डिजिटल सिस्टीम), ELOG ( EASE ऑफ लॉजिस्टिक्स) आणि ULIP ( युनिफाईड लॉजिस्टिक इंटरफेस प्लॅटफॉर्म) या वर भर असेल. या घोषणेनंतर सर्व लॉजिस्टिक कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली.

आज मार्केट गॅप डाऊन ओपन झाले. पण मार्केटने स्वतःला सावरले आणि काही काळ तेजीमध्ये होते. मार्केटची वेळ संपता संपता पुन्हा मार्केट मंदीत गेले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६०३४६ NSE निर्देशांक निफ्टी १८००३ बँक निफ्टी ४१४०५ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १३ September २०२२

आज क्रूड US $ ९५.२० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७९.२० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०७.७० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.३३ VIX १७.५१ होते.

ऑगस्ट २०२२ महिन्यासाठी CPI ७% तर जुलै महिन्यासाठी IIP २.४ होती.

गुजराथ अपोलो ने फार्म मशिनरी आणि कंपोनंट साठी KEESTRACK बरोबर करार केला.
HDFC लाईफ चे ४.३ कोटी शेअर्स Rs ५६४.१० ते Rs ५७८.५५ प्रती शेअर या दरम्यान विकले.
PADGET इलेक्ट्रॉनिक्स या डिक्सनच्या सबसिडीअरीची PLI योजनेसाठी निवड झाली.डिक्सनने सांगितले की आता गूगलच्या पिक्सएलकंपनीचे मोबाईल सेट भारतात बनवण्यासाठी ऑर्डर मिळू शकते. कंपनी वॉशिंग मशीन, टेलिव्हिसां मॅन्युफॅक्चरिंग मध्ये ६०% क्षमता. फिचर फोन यांचे पार्ट बनवते. स्मार्ट लाइटिंग सेगमेंटच्या अधिग्रहणासाठी बोलणी चालू आहेत.
HCL टेक ३५० कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. जे लोक मायक्रोसॉफ्टच्या प्रोजेक्टवर आहेत त्यांना काढून टाकणार.

उज्जीवन स्माल फायनान्स बँक QIP च्या द्वारे १३.१% स्टेक Rs २१ प्रती शेअर भावाने विकणार आहे. यामुळे प्रमोटर्सचा स्टेक ७५% पेक्षा कमी होईल. यामुळे दोघांचे मर्जर करण्यासाठी मंजुरी मिळाली.

जीव रक्षक औषधांच्या यादीतून २६ औषधांची नावे वगळली तर नवीन ३४ औषधे समाविष्ट केली.
अमी ऑर्गनिक्सच्या १८.५५ लाख शेअर्सचा Rs १०४० प्रती शेअर या भावाने (५% स्टेकचा) व्यवहार झाला.

बजाज ऑटोची निर्यातीत थोडी घट झाली. ते ज्या देशामध्ये निर्यात करतात त्या देशांची सरकारे मोटारसायकल आयातीवर निर्बंध घालत आहेत. विशषतः आफ्रिकेत असे निर्बंध लावले जात आहेत. हे निर्बंध कायम राहत नाहीत. पण कंपनीने इन्व्हेन्टरी कमी ठेवायला सुरुवात केली आहे. २८% ने निर्यात कमी झाली. थ्री व्हिलर्समध्ये टेस्टिंग चालू आहे. सरकारबरोबर चर्चा चालू आहे. आफ्रिकेत बजाज ची मोटारसायकल लोकप्रिय आहे. मोटारसायकलच्या मागणीमध्ये शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये फारसा फरक पडत नाही. भारताची सर्वसाधारण आर्थीक प्रगती आता तळागाळापर्यंत आणि देशाच्या कानाकोपर्यात पोहोचली आहे फायनान्स कंपन्या अग्रेसर होऊन नव्या नव्या क्रेडिट स्कीम्स आणत आहेत. तसेच पाऊसही चांगला झाला आहे. कंपनीने ‘VINCENT’ हा ब्रँड खरेदी केला आहे. कंपनीला हा ब्रँड म्हणजे एक चांगली संधी आहे असे वाटले त्यामुळे भविष्यात या ब्रँडमध्ये कंपनी गुंतवणुकीचा विचार करू शकते.

सिस्को च्या सबसिडीअरी वेबेक्स कम्युनिकेशनला संपूर्ण देशासाठी युनिफाईड लायसेन्स मिळाले आहे. आता ही कंपनी टाटा कम्युनिकेशनबरोबर काम करते. आता ती स्वतंत्रपणे काम करू शकेल. ती टाटा कम्युनिकेशनची स्पर्धक कंपनी बनू शकते. त्यामुळे टाटा कम्युनिकेशनचा शेअर पडला.

DB रिअल्टी ही मुबई बेस्ड रिअल इस्टेट सेक्टर मधील कंपनीचे अडाणी ग्रुपच्या रिअल्टी क्षेत्रातील कंपनी अडाणी रिअल्टीमध्ये मर्जर साठी बोलणी चालू आहेत या बातमीमुळे DB रिअल्टी मध्ये खरेदी झाली.
थंडीच्या मोसमात खतांचे भाव वाढवले जाणार नाहीत असे सरकारने सांगितले.

आज FMCG, रिअल्टी, केमिकल, मेटल्स , इन्फ्रा, एनर्जी आणि केमिकल, बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांमध्ये खरेदी झाली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६०५७१ NSE निर्देशांक निफ्टी १८०७० बँक निफ्टी
४०८७३ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १२ September २०२२

आज क्रूड US $ 91.44 प्रती बॅरल तर रुपया US $ १= Rs 79.70 च्या आसपास होते. US $ निर्देशांक 108.74 USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड 3.30 VIX १७.९५ होते.

ग्रीव्हज कॉटन ही वेलडायव्हर्सिफाइड इंजिनिअरिंग कंपनी आहे. ही १६२ वर्ष जुनी मल्टिप्रॉडक्ट आणि मल्टिलोकेशन कंपनी आहे. ही कंपनी क्लीन ट्रेन पॉवरसोल्युशन कंपनी आहे. या कंपनीचे ६ अत्याधुनिक प्लांट असून ६३०० ट्रेडर्सचे नेटवर्क आहे. ही कंपनी प्रत्येक मिनिटाला १ इंजिन बनवते. आता कंपनी टू व्हिलर्स आणि थ्री व्हिलर्सना स्पेअर्स आणि सर्व्हिसेस, मेकॅनिकल सेवा तसेच फायनान्स पुरवतात. कंपनी B २ B कडून B २ C कडे वाटचाल करत आहे. कंपनीच्या बॅलन्सशीटवर Rs १३५० कोटी कॅश आणि कॅश इक्विव्हॅलंट आहेत. ही कंपनी नवीन प्रॉडक्ट, क्षमता विस्तार, ब्रँड बिल्डिंग आणि मार्केटिंग वर खर्च करू इच्छिते. कंपनीचा फोकस मोबिलिटी आणि E -मोबिलिटीवर आहे. कोविड च्या काळात थ्री व्हिलर्ससाठी मागणी कमी झाली.आता मागणी सुधारत आहे.

एलकॉन इंजिनीअरिंग ही कंपनी गिअर्स आणि मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट या बिझिनेस मध्ये आहे. ३१ ऑगस्ट रोजी गियर बीझिनेस साठी Rs ५३३ कोटींचे तर मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट मध्ये ६२ कोटींच्या ऑर्डर्स आहेत. गिअर्स बिझिनेस ८७% तर मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट बिझिनेस १३% आहे. कंपनी आता ५०% ते ६०% क्षमतेवर काम करात आहे. EBITD मार्जिन २१% आहे आणि कंपनी हे मार्जिन कायम राखण्यासाठी आशावादी आहे.

मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट बिझिनेस स्टील, शुगर आणि सिमेंट सेक्टर मध्ये आहे. युरोप आणि USA मधून येणाऱ्या ऑर्डर्स उशिरा येत आहेत. त्यामुळे कंपनीचे Rs १५० कोटींचे निर्यातीसाठी ठेवलेले लक्ष्य पूर्ण करणे थोडे कठीण आहे. कंपनी दोन वर्षाच्या काळात इंटर्नल ACRUALS मधुन सोलर सिस्टीम लावण्यासाठी Rs १०० कोटींची गुंतवणूक करेल. यामुळे इलेक्ट्रिसिटी चा खर्च कमी होईल. कंपनीने कोविड काळात काही ऑर्गनायझेशनल बदल केले. मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट प्रोजेक्ट्स जी लॉसमध्ये चालत होती ती बंद केली. कंपनी आता DEBT फ्री झाली आहे.

सरकारने संरक्षण, टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांमधील विनिवेशाची गती वाढवायला सांगितले. HAL, गार्डन रिच शिपबिल्डर्स, BDL, RITES या कंपन्यांचे रोड शो सुरू केले. ‘दीपम’ या कंपन्यांमध्ये OFS आणण्याची शक्यता आहे. HAL ला मॉर्गन स्टॅन्ले च्या इंडेक्स मध्ये समाविष्ट केले आहे.

रामकृष्ण फोर्जिंगजने Rs २०५ च्या भावांनी ४६ लाख वॉरंट इशू केली.

ABAN ने सेंट्रल बँकेबरोबर सेटलमेंट केली. सेंट्रल बँकेने कंपनीविरुद्ध दाखल केलेली इंसॉल्व्हंसी याचिका मागे घेतली.

इ -कॉमर्स कंपन्या फेक रिव्ह्यू प्रसिद्ध करतात. सरकार याविरुद्ध सुओमोटो कारवाई करू शकेल. या फेक रिव्ह्यूमुळे ग्राहकांची फसवणूक होते आहे असे लक्षात आले तर कंपनीला Rs १० लाख ते Rs ५० लाख दंड ठोठावण्यात येऊ शकतो.

चीनमध्ये लॉकडाऊनमुळे क्रूडची आयात ९% ने कमी झाली. ट्राफिक ५०% ने कमी झाली. २० वर्षात क्रूडसाठी मागणी प्रथमच एवढी कमी झाली.

व्हिनस पाइप्सला ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स कडून मंजुरी मिळाली.

टाटा कन्झ्युमर प्रॉडक्टस बिसलेरी मध्ये स्टेक घेण्याची शक्यता आहे.

ONGCने DSF III राऊंडचे ६ करार केले. कंपनी Rs १५००० कोटींची गुंतवणूक करेल.

टिटाघर वॅगन्सच्या इटालियन आर्ममधे ३०% स्टेक इटालियन सरकार घेणार आहे. युरो १० मिलियनची गुंतवणूक करणार आहे. HAWK EYE DMCC ४.५मिलियनला १३.६४% स्टेक घेणार आहे.

ओबेराय रिअल्टी त्याच्या ४ सबसिडीअरीजचे अमलगमेशन करणार आहे.

KEC ला गुजरात इंडस्टीजचे Rs २४४ कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

अनुपम रसायनच्या युनिट नंबर ६ ला आग लागली. पण हे युनिट लो कपॅसिटीचे आहे.

EIL ला ONGC कडून Rs २४९ कोटींचे ३३ महिने मुदतीचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

अजंता फार्माच्या दहेज युनिटच्या ५ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर २०२२ दरम्यान झालेल्या तपासणीत २ त्रुटी दाखवल्या.

रशियाने नैसर्गिक गॅसचा पुरवठा युरोपला कमी केला. त्यामुळे युरोपियन केमिकल कंपन्यांना सोडा ASH, चौस्टिक सोडा या खूप हीट लागणाऱ्या प्रोडक्ट्सच्या उत्पादनात अडचणी येत आहे. याचा फायदा टाटा केमिकल्स, गुजरात अल्कली, ग्रासिम, गुजरात फ्लुओरो, नवीन फ्ल्युओरीन, आरती यांना होईल. चीनच्या कंपन्यांना पर्याय शोधला जात आहे.

वेदांता आणि FOXCOMM यांचे JV US $ २००० कोटींची गुंतवणूक गुजरात मध्ये सेमीकंडक्टर प्लांट लावणार आहे.

सरकार Rs २५००० ते Rs ३०००० कोटी सबसिडी LPG वर देणार आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने USA मधील कंपनी SENSHAWK आणि सॉफ्टग्रीन ब्रँड कॅम्पा कोला यांच्या नंतर आता पॉलिएस्टर चिप आणि धागा बनवणारी कंपनी शुभलक्ष्मी पॉलिएस्टर (Rs १५२२ कोटी) आणि शुभलक्ष्मी पॉलीटेक्स ( Rs ७० कोटी) .या दोन कंपन्यांचा पॉलिएस्टर व्यवसाय खरेदी केला. या कंपन्यांची युनिट्स दहेज, सिल्व्हासा आणि दादरानगर हवेली येथे आहेत. या वर्षीच्या दिवाळीपर्यंत कॅम्पाकोलाचे तीन फ्लेवर रिलायन्स मार्केटमध्ये आणणार आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज, केमिकल, मेडिया आणि रिअल्टी सेक्टरमध्ये तेजी होती.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६०११५ NSE निर्देशांक निफ्टी १७९३६ बँक निफ्टी ४०५७४ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!