आजचं मार्केट – ९ September २०२२

आज क्रूड US $ ९०.४० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७९.६१ च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०९.१५ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.३० आणि VIX १७.७१ होते.

USA ची मार्केट्स तेजीत होती. हेल्थकेअर आणि सेमीकंडक्टर कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. सोने आणि चांदी तेजीत होती. तैवान आणि दक्षिण कोरियाची मार्केट्स आज बंद होती.

ECB ने त्यांच्या व्याज दरात ०.७५% एवढी दरवाढ केली. इन्फ्लेशनच आता ८.१% आहे. त्यांनी इन्फ्लेशनचे लक्ष्य ५.५% ठेवले आहे. ECB ने इशारा दिला की ग्रोथ कमी होईल पण २०२४ पर्यंत अर्थव्यवस्था पूर्वस्थितीला येईल अशी अपेक्षा आहे.

फेडचे अध्यक्ष पॉवेल यांनी सांगितले की महागाई कमी करणे हे आमचे प्रथम उद्दिष्ट असेल त्यासाठी आम्ही उपलब्ध असलेल्या सर्व मार्गांचा अवलंब करू.
सरकारने गैर बासमती तांदुळाच्या निर्यातीवर २०% एक्स्पोर्ट ड्युटी बसवली. व्हाइट आणि ब्राउन तांदुळाच्या निर्यातीवर एक्स्पोर्ट ड्युटी बसवली तर ब्रोकन राईसची निर्याती वर पूर्णपणे बंदी घातली. यावर्षी तांदुळाची पेरणी ६% ने कमी होऊन ३८४ लाख हेक्टर एवढ्या जमिनीत झाली आहे. त्यामुळे तांदुळाचे उत्पादन १३ कोटी टन होईल अशी अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये भारतीय तांदुळाची विक्री ४०% होते. भारत १५० देशांना तांदूळ निर्यात करतो. या वर्षी २.२ कोटी टन तांदुळ निर्यात होण्याची शक्यता आहे. डोमेस्टिक मार्केटमध्ये तांदुळाच्या किमती वाढत आहेत. ब्रोकन तांदुळाची किंमत Rs १५ प्रती किलो वरून Rs २२ प्रती किलो झाली. पाकिस्तानमध्ये महापूर आल्यामुळे त्यांच्या तांदुळाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

बहुतेक भारतीय कंपन्या उच्च प्रतीचा बासमती तांदूळ निर्यात करत असल्यामुळे त्यांच्यावर या एक्स्पोर्ट ड्युटीचा परिणाम कमी होईल किंवा होणार नाही.

मंत्रिमंडळ पुढच्या महिन्यात राष्ट्रीय पर्यटन धोरणमंजूर करण्याची शक्यता आहे. भारत हे जागतिक पर्यटनासाठी २०३० पर्यंत पहिल्या पांच देशात असावे असे या धोरणांचे लक्ष्य असेल. या धोरणात पर्यटन व्यवसायाला सोप्या रीतीने आणि मुबलक अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे तसेच ग्रीन टुरिजमला प्रोत्साहन देणे यावर भर असेल. याचा परिणाम हॉटेल्स, पर्यटनाशी संबंधिततिकीट बुकिंग कम्पन्या, यांना होईल.

PNC इंफ्राटेक या कंपनीला HAM तत्वावर सोनोली ते गोरखपूर ४ पदरी रस्त्यासाठी Rs १४५८ कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

ACC, अंबुजा सिमेंट च्या ऑफर फॉर सेलमध्ये तुमच्याजवळील शेअर्स ऑफर करण्याची आज शेवटची तारीख आहे.

३ i इंफोटेकने मलेशियामध्ये झिरो ट्रस्ट सॉव्हरिन क्लाउड लाँच केला.

हर्ष इंजिनीअर्सचा IPO १४ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर दरम्यान ओपन राहील.

कॉम्पिटिशन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने २८-२९ सप्टेंबरला सुनावणी ठेवली आहे. . २० सिमेंट उत्पादक कंपन्या आणि ६० ऑफिसर्स यांच्याविरुद्ध कार्टलायझेशन संबंधात कारवाई करणार आहे.
राजरतन ग्लोबल वायर ही कंपनी बिग टायर बीड वायर बनवण्याच्या व्यवसायात आहे.ही कंपनी त्यांचे प्रोडक्ट १० देशात निर्यात करते. USA आणि यूरोपमध्ये कार्सचे उत्पादन कमी झाल्यामुळे टायर्स कंपन्यांची निर्यात कमी झाली आहे.
त्याचा परिणाम या कंपनीलाही जाणवत आहे. पॉवर कॉस्ट वरच्या स्तरावर स्थिर होत आहेत तसेच कच्च्या मालाच्या किमतीमध्ये घट होत आहे. कंपनीचा डोमेस्टिक मार्केटमध्ये ४० % तर थायलंड मध्ये २३% मार्केट शेअर आहे. कंपनीचा थायलंड मध्ये ग्रीनफिल्ड प्लांट आहे. दीर्घ मुदतीत बिझिनेस चांगला होईल असे कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितले.

आज IT , बँकिंग, ऑटो ,मेटल्स FMCG मध्ये खरेदी झाली. मेडिया सेक्टरमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
महिंद्रा & महिंद्राने C सेगमेंटमधील XUVOO ही गाडी ५ कलर व्हेरियंटमध्ये लाँच केली. पहिल्या टप्प्यात १६ शहरात लाँच होईल. जानेवारी २०२३ पासून बकिंग आणि डिलिव्हरी सुरु होईल या गाडीचे उत्पादन नाशिक प्लांटमध्ये होईल.

ऑगस्ट २०२२ या महिन्यासाठी CPI चीनमध्ये २.५% झाला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९७९३ NSE निर्देशांक निफ्टी १७८३३ बँक निफ्टी ४०४१५ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.