आजचं मार्केट – २२ September २०२२

आज क्रूड US डॉलर 90.30 च्या आसपास तर रुपया US डॉलर 1=₹ ८०.९० च्या आसपास होता. US डॉलर निर्देशांक १११.६४ USA १० वर्षे bond yield ३.५६ आणि VIX १९ होते. बँक ऑफ इंग्लंडने दर ०.५० % ने वाढवले आता दर २.२५% झाला.
फेडने दर ०.७५% ने वाढवले. अपेक्षेप्रमाणे निर्णय आल्यामुळे USA मार्केट काही काळ सुधारली.पण जेव्हा फेडच्या कॉमेंट्रीतून त्यांचे कठोर धोरण जाणवले तेव्हां पुन्हा मार्केट मंदीत गेले.२०२२ च्या अखेरपर्यंत ४.४०% रेटचा अंदाज व्यक्त केला गेला म्हणजेच अजूनही पुढील दोन पॉलिसी मध्ये मिळून १.२५%एवढी दरात वाढ. होण्याची शक्यता आहे. यामुळें पुन्हा अमेरिकन मार्केट मंदीत गेले US डॉलर निर्देशांक वाढला आणि रुपया घसरला.भारतीय मार्केटही मंदीत होते. हॉटेल्स FMCG,foot wear आणि garments मध्ये तेजी होती.

किर्लोस्कर ऑईल इंजिनने अहमदाबादच्या LGM (La गज्जर मशिनरीमध्ये २४ % स्टेक घेतला.२०१७ मध्ये ७६% स्टेक घेतला होता. त्यामुळे ही किर्लोस्कर ऑईल इंजिनची पूर्णपणे मालकीची सबसिडीअरी झाली.

रिलायन्स रिटेल नवीन कपड्याचा आणि अक्सेसरी ब्रँड स्टोअर चेन चालू करणार आहे. यामुळे ZARA आणि HM इंडिया यांच्याबरोबर स्पर्धा करू शकेल.

सिटीने APTUS व्हॅल्यू हाउसिंग फायनान्स या शेअरचे

कव्हरेज सुरू केले .BUY रेटिंग दिले आणि Rs ४२५ टार्गेट दिले म्हणून शेअर तेजीत होता.

सरकारने TDI वर २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत लावलेल्या आणि चीन जपान आणि कोरिया येथून आयात होणाऱ्या अँटी डंपिंग ड्यूटीची मुदत ५ वर्षे वाढवली.याचा फायदा GNFC ला होईल.फक्त ही कंपनी याचे उत्पादन करते लुपिनला Diclofenac sodium topical solution USP ला USFDA ने मान्यता दिली. या औषधाचे USA मध्ये US डॉलर ४८.४ कोटींचे मार्केट आहे. या औषधीचे उत्पादन पिथमपुर प्लांट मध्ये होईल.

रोलेक्स रींग्ज:- ही कंपनी रिंग्ज बनवणारी देशातील ५ वी मोठी कंपनी आहे. ही कंपनी हॉट रोलड फोर्ज आणि इंडस्ट्रियल मशीन बेअरींग रिंगचे उत्पादन करते.प्रामुख्याने ऑटो सेक्टरला सप्लाय करते.पण ते नॉन ऑटोमोटिव इंडस्ट्रीजनाही इंडस्ट्रियल मशीन बेअरींगचा सप्लाय करतात. कंपनीच्या प्रॉडक्ट्चे लाईफ १८ ते२० वर्षे असते कंपनीची वर्तमान उत्पादन क्षमता १४४०० MPT आहे. कंपनी क्षमता विस्तार करत आहे पण तो पूर्ण व्हायला ३ महिने लागतील. कंपनीच्या प्रॉडक्ट्सना डोमेस्टिक मार्केटमध्ये चांगली मागणी आहे.कारण डोमेस्टिक ग्राहक त्यांचा क्षमता विस्तार करत आहेत.

युरोप आणि USA मध्ये ग्रोथ कमी होईल. कंपनी येत्या तीन वर्षात १५% ते २०% YOY ग्रोथ करील असे अनुमान आहे. FY २२ मध्ये कंपनीचे उत्पन्न ₹ १०२० कोटी होते.

कंपनीच्या मुख्य कच्च्या मालाच्या म्हणजेच अलोय स्टीलच्या किमती ३०% ते ४०% ने वाढल्या. त्या आता हळूहळू कमी होत आहेत. पण त्याचा कंपनीच्या मार्जिनवर जास्त परिणाम अपेक्षित नाही.

कंपनी EV आणि हायब्रीड व्हेईकल्स साठी कम्पोनंट बनवू शकते. पण EV आणि हायब्रीड व्हेइकल्सचे मार्केट कमी वेगाने वाढत आहे.

नवी मुंबई विमानतळ जुलै २०२४ पर्यन्त सुरू होईल.याचा फायदा RIIL आणि JAI CORP या कंपन्यांना होईल.

स्पाइस जेटने ,१ऑक्टोबर २०२२ पासून वैमानिकांचे

पगार 20% ने वाढवले

GMM PFAUDLER ने GMM इंटरनॅशनल SARL मध्ये स्टेक घेण्याला UK मधील रेग्युलेटरी अथॉरिटीने परवानगी दिली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९११९ NSE निर्देशांक निफ्टी १७६२९ बँक निफ्टी ४०६३० वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.