आज क्रूड US $ ९६.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ८२.४० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ११०.८६ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.०३ आणि VIX १५.९८ होते.
आज USA मधील मार्केट तेजीत होती.डाऊ जोन्स २.५९% तर NASHDAQ ३% वर होते. USAचे हॉउसहोल्ड इनकम ४% ने वाढले. ऑक्टोबर २०२२ महिन्यासाठी चीनचा मॅन्युफॅक्चअरिंग PMI डेटा ४९.२% आला (अनुमान ५०% चे होते). तर सर्व्हिस PMI डेटा४८.७% आला.( पूर्वीच्या महिन्यात ५०.६% होता). कॉम्पोझिट PMI ४९ होता.
जर्मनीचे GDP वाढले. महागाईचा दर १०.४० होता.
या आठवड्यात फेड (१ आणि २ नोव्हेंबर) , बँक ऑफ इंग्लंड, नॉर्वेच्या सेंट्रल बँकेची मीटिंग आहे. याशिवाय ३ नोव्हेंबर रोजी RBI च्या MPC ची विशेष बैठक आहे.
NYKAA ने त्यांच्या बोनस इशूसाठी रेकॉर्ड डेट ३ नोव्हेंबर ऐवजी ११ नोव्हेंबर निश्चित केली. १० नोव्हेंबर २०२२ रोजी IPO मधील शेअर्सचा इन्स्टिट्यूशनल (रिटेल इन्व्हेस्टरशिवाय इंव्हेइस्टर्स) चा लॉकइन पिरियड संपेल. त्यामुळे शेअरमध्ये विक्री येण्याचा संभव आहे.
त्रिवेणी टर्बाइन्स ही कंपनी २ नोव्हेंबर २०२२ रोजी शेअर बायबॅकवर विचार करेल.
NTPC चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
टाटा पॉवरचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
रेड्डीज लॅबोरेटरीजचा दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
IOC चे निकाल चांगले आले.
IFB इंडस्ट्रीजचे निकाल चांगले आले.
स्वराज इंजिन्सचे प्रॉफिट, रेव्हेन्यू आणि मार्जिन वाढले. निकाल चांगले आले.
मारुतीने ३ ऑगस्ट ते १ सप्टेंबर मध्ये उत्पादन झालेल्या ९९२५ कार्स ब्रेकमधील दोषासाठी परत मागवल्या.
ल्युपिनच्या नागपूर येथील प्लांट्सच्या तपासणीत USFDA ने ३ त्रुटी दाखवल्या.
लौरास लॅबच्या विशाखापट्टणम येथील ५ प्लांट्सची तपासणी २४ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०२२ रोजी USFDA ने केली.
ज्युबिलण्ट फार्मोवाच्या रुडकी प्लांटची USFDA ने जुलै ऑगस्ट मध्ये तपासणी झाली होती. USFDA ने त्यावर आधारित कारवाई केली.
L & T ला सौदी अरेबियाकडून Rs १००० कोटी ते Rs २५०० कोटी दरम्यान ऑर्डर मिळाली.
रामकृष्ण फोर्जिंगला Rs ११० कोटींची निर्यातीसाठी ऑर्डर मिळाली.
ब्लॅक ग्रेन असोशिएशन मधून रशिया बाहेर पडला.या डील अन्वये USA आणि पश्चिमी देशांना अन्नधान्य, खाद्यतेले यांची निर्यात होत होती. यामुळे गहू, मक्का, सनफ्लॉवर ऑइल, सोया, जवस आणि खाद्यतेले यांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. हे डील १९ नोव्हेम्बरला संपत होते. रशियाचे म्हणणे आहे की युक्रेनने क्रिमियावर केलेल्या हल्ल्यांमुळे बंदरात उभ्या असलेल्या जहाजांचे नुकसान होत आहे.
हिवाळा जवळ आल्यामुळे नैसर्गिक गॅसच्या किमती वाढायला सुरुवात झाली आहे.
चीनमध्ये स्टीलचे उत्पादन कमी होते झिंक स्टीलला गॅल्व्हनाईझ करण्यासाठी वापरतात. त्यामुळे झिंकमध्ये मंदी आहे तर इतर बेस मेंटल्स कॉपर,अल्युमिनियम ही मंदीत होते. सोने आणि चांदीमध्येही मंदी होती
NCDEX वर रोबस्टा चेरी कॉफीची काँट्रॅक्टस ३० सप्टेंबरपासून लाँच झाली. भारत, इंडोनेशिया, कोलंबिया यांचे कॉफीचे उत्पादन वाढले. भारत त्यांच्या उत्पादनापैकी ६०% ते ७५% कॉफी निर्यात करतो. या काँट्रॅक्टस्ची किमान साईझ १ तर कमाल साईझ ५० MT आहे. भारतात प्रामुख्याने केरळ आणि तामिळनाडूमध्ये कॉफीचे उत्पादन होते.
या आठवड्यात प्रायमरी मार्केटमध्ये ४ IPO येत आहेत.
DCX सिस्टिम्स एकूण Rs ५०० कोटी ( Rs ४०० कोटींचा फ्रेश इशू आणि Rs १०० कोटींचा OFS) IPO दवारा उभारेल. या शेअरची दर्शनी किंमत Rs २ आहे.
प्राईस बँड Rs १९७ ते Rs २०७ आहे. मिनिमम लॉट ७२ शेअर्सचा आहे.
ही कंपनी केबल आणि वायरलेस हार्नेस असेम्ब्लीज बनवते. IPO प्रोसिड्सचा विनियोग Rs ११० कोटी लोन रिपेमेंट आणि Rs ४५ कोटी बॅकवॉर्ड इंटिग्रेशनसाठी नवीन प्लांटमध्ये गुंतवणूक करेल. हा इशू ३१ ऑक्टोबरला ओपन होऊन २ नोव्हेम्बरला बंद होईल.
ग्लोबल हेल्थ केअर चा Rs ५०० कोटींचा फ्रेश इशू आणि ५.०८ कोटींची OFS असेल.एकूण इशू Rs २२०६ कॉटनचा असेल. ही कंपनी ‘मेदांता’ या ब्रॅण्ड अंतर्गत हॉस्पिटल चेन चालवते. प्राईस बंद Rs ३१९ ते Rs ३३६ आहे. हा इशू ३ नोव्हेम्बरला ओपन होऊन ७ नोव्हेम्बरला बंद होईल.
बिकाजी फूड्स चा Rs ८८१ कोटींचा IPO ३ नोव्हेम्बरला ओपन होऊन ७ नोव्हम्बरला बंद होईल. प्राईस बंद Rs २८५ ते Rs ३०० आहे.
फ्युजन मायक्रोफायनान्स या कंपनीचा Rs ११०४ कोटींचा IPO ( यात Rs ६०० कोटींचा फ्रेश इशू आणि १ कोटी छतीस लाख पंचान्नव हजार शेअर्सचा OFS असेल प्राईस बँड Rs ३५० ते Rs ३६८ आहे. हा इशू २ नोव्हेंबर ओपन होऊन ४ नोव्हेम्बरला बंद होईल. या चारही IPO चे BSE आणि NSE वर लिस्टिंग होईल.
सुप्रीम इंडस्ट्रीजचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले. कंपनीने Rs ६ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
JSW एनर्जीने सांगितले की थर्मल कोळशाच्या किमती वाढल्यामुले आणि विक्री किंमत रेग्युलेटेड असल्यामुळे मार्जिन कमी झाले. ४४.५% वरून ३७% झाले.
MYTRAH च्या अक्विझिशनमुळे एकूण विंड आणि सोलर क्षमता १७५० MW झाली. या अक्विझिशनमुळे Rs ३५० ते Rs ४५० एवढा सिनर्जी बेणीफूट होईल. कंपनीची एकूण क्षमता ९.१ GW एवढी होईल. कंपनीने हायड्रोजन एनर्जी प्लांट कर्नाटकमध्ये सुरु करायचे ठरवले आहेत काही मंजुरी यायच्या आहेत.येत्या वर्षभरात बांधकाम सुरु होईल.
सोना BLW प्रिसिजन चे प्रॉफिट वाढले रेव्हेन्यू वाढले. मार्जिन मात्र कमी झाले. कंपनीच्या मुख्य कच्च्या मालाची म्हणजे ऑलोय स्टीलची किंमत कमाल स्तरावर होती. आता थोडी कमी झाली आहे. नवीन बिझिनेससेस कडून ऑर्डर येत आहेत. युरोप आणि चीनमधून मागणी कमी किंवा स्थिर आहे. EV सेगमेंटमध्ये २३ ग्रह आहेत आणि २५% रेव्हेन्यू या सेगमेंटमधून येतो. २०२६ पर्यंत हे प्रमाण ५०% ते ५५% वाढण्याची शक्यता कंपनीने व्यक्त केली. कंपनी मल्टिमोडल मल्टिप्लाटफॉर्म प्रोडक्ट बनवते. त्यामुळे कंपनी सतत नवनवीन प्रोडक्ट बनवते. कंपनीचे Rs २०५०० कोटींचे ऑर्डर बुक आहे.कंपनी आता त्यांचा एक छोटा प्लांट चाकणला शिफ्ट करत आहे आणि तेथे R & D सेंटर बनवण्याची कंपनीची योजना आहे. कंपनीने सांगितले की फोर व्हीलर पॅसेंजर व्हेइकल्ससाठी सर्वांबरोबर कॉन्ट्रॅक्ट आहे.
GHCL चे प्रॉफिट उत्पन्न वाढले. निकाल चांगले आले. कंपनी अजमेरा सिमेंटकडून काई असेट्स खरेदी करेल.
VST टिलर्स आणि ट्रॅक्टर्सचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.
द्वारिकेश शुगरने सांगितले की वेज बोर्डाचे वाढलेले बिल, मोलासिसवरील ड्युटी १८% वरून २०% झाली आणि नवीन इथेनॉल प्लॅन्टचे यिल्ड अपेक्षेप्रमाणे आले नाही. त्यामुळेमार्जिनवर आणि प्रॉफिट वर परिणाम झाला. सरकार लवकरच त्यांचे निर्यात धोरण जाहीर करेल. कंपनीला एक्स्पोर्ट कोटा मिळेल त्याप्रमाणे कंपनी निर्यात करेल.
ASAHI इंडियाचे निकाल चांगले आले प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन वाढले.
आज IT, ऑटो, फार्मा, सिमेंट, बँका च्या शेअर्स मध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६०७४६ NSE निर्देशांक निफ्टी १८०१२ बँक निफ्टी ४१३०७ वर बंद झाले.
Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !