आज क्रूड US $ ८३.७० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८१.४० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०६.६० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.७३ आणि VIX १३.५७ होते.
७ डिसेम्बरला RBI आपले द्वैमासिक वित्तीय धोरण जाहीर करेल.
सरकारने नॉन बासमती तुकडा तांदूळ निर्यात करायला परवानगी दिली.याचा फायदा चमनलाल सेठिया, KRBL कोहिनुर आणि LT फूड्स यांना होईल.
बायोकॉन बायालॉजीक्स ने VIATRISच्या ग्लोबल बायोसिमिलर्स व्यवसायाचे अक्विझिशन पूर्ण केले.
युरो झोनमधील महागाईचा रेट १०% आला.
आज फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांचे भाषण आहे. ते भाषणात नजीकच्या भविष्यातील फेडच्या कारवाईबद्दल संकेत देतात का याकडे सर्व गुंतवणूकदारांचे लक्ष असेल.
ओपेकची बैठक ४ डिसेम्बर २०२२ रोजी होईल आणि रशियाच्या क्रूडच्या किमतीवरील कॅपप्रमाणे ५ डिसेम्बरला क्रूडची किंमत निश्चित केली जाईल
चीनचा मॅन्युफॅक्चरिंग PMI ४९ वरून ४८ झाला . आणि कॉम्पोझिट PMI ४७.१ झाला.
अडाणी ग्रुपला धारावी रिडेव्हलपमेंटचे Rs ५०६९ कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.
विस्तारा आणि एअर इंडियाचे मर्जर होईल. टाटा आणि सिंगापूर एअरलाइन्सबरोबर करार झाला.
‘अलीबाबा’ त्यांचा झोमॅटोमधील ३.५% स्टेक Rs ६० प्रती शेअर भावाने ( ५.५% डिस्काऊंटवर) US $ २० कोटींचे शेअर्स विकणार आहे.
ग्लॅन्ड फर्माने CENEXI मध्ये १००% स्टेक युरो १२० मिलियन्सला घेतला.
LIC ने त्यांच्या भारत बिजली मधील ६.६९% स्टेकपैकी २.५% स्टेक विकला. आता LIC चा स्टेक ४.५४% राहिला.
कृष्णा मेडिकल्सने (KIMS) अरुणोदय हॉस्पिटल्स मध्ये ७.७९% स्टेक घेतला.
बंधन फायनान्शियल होल्डिंग LTD IDFC चा ‘IDFC AMC ‘ मधील स्टेक खरेदी करणार आहे. याला सेबीची मंजुरी मिळाली. CCI ची या खरेदीसाठी आधीच मंजुरी मिळाली आहे.
धनलक्ष्मी बँकेमध्ये MS परम व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट ने .०६% स्टेक ( १५ लाख शेअर्स ) Rs १५.९६ प्रती शेअर्स या भावाने खरेदी केले.
आज किरीट पारीख समितीने त्यांचा नैसर्गिक गॅसवर रिपोर्ट सादर केला. जुन्या ब्लॉकसाठी कमाल किंमत US $ ६.५० प्रती mBtu तर किमान किंमत US $ ४ प्रती mBtu ठरवली. डिफिकल्ट ब्लॉकसाठी किंमत ३ वर्षात मार्केट प्राईसवर आधारित असेल. नैसर्गिक वायू GST च्या कक्षेत आणला जाईल आणि राज्य सरकारांना ५ वर्ष नुकसानभरपाई दिली जाईल. कमाल किंमत दर वर्षी ०.५% वाढेल.. जानेवारी २०२७ पासून गॅसची किंमत बाजारभावाप्रमाणे असेल.याचा परिणाम IGL MGL गुजरात गॅस यांच्यावर होईल.
५ विमानतळावर असलेली 5 G सेवेमुळे विमानातल्या अल्टीमीटरवर त्याचा परिणाम होत असल्यामुळे ५G सेवा बंद केली सरकारने विमानात नवीन अल्टीमीटर लावायला सांगितले.
PNB हौसिंग फायनान्सच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने Rs २५०० कोटींच्या राईट्स इशूचा DRAFT सेबीकडे फाईल करण्यासाठी मंजुरी दिली.
गेटवे डिस्ट्रिपार्क कंटेनर ट्रेन सर्व्हिसेस ICD काशीपूरला सुरु करणार आहे.
NMDC ने आयर्न ओअर लम्प आणि फाइनच्या किमती Rs ३०० प्रती टन वाढवल्या.
अशोक बिल्डकॉन NHAI च्या Rs १६६९ कोटींच्या प्रोजेक्टसाठी लोएस्ट बिल्डर ठरली.
MSCI निर्देशांकाच्या रीबॅलन्सिंगमुळे पुढील शेअर्समध्ये गुंतवणूक येण्याची शक्यता आहे.ट्यूब इन्व्हेस्टमेंट्स, इंडियन हॉटेल्स, वरूण बिव्हरेजीस, TVS मोटर्स, बजाज होल्डिंग अँड इन्व्हेस्टमेंट्स, ABB.
TCS ने UK मधील रेल डिलिव्हरी ग्रुपबरोबर रेल डेटा मार्केटप्लेस ऑपरेशन करण्यासाठी ६ वर्षांचा करार केला.
आज मेटल्स, ऑटो, रिअल्टी, एनर्जी इन्फ्रा, FMCG शेअर्समध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६३०९९ NSE निर्देशांक निफ्टी १८७५८ बँक निफ्टी ४३२३१वर बंद झाले
Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !