आज क्रूड US $ ९५.७० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८०.८० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०७.६० तर USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.८१ आणि VIX १४.८१ होते. USA मधील CPI ( कन्झ्युमर प्राईस इंडेक्स ) ऑक्टोबर २०२२ महिन्यासाठी ७.७ एवढा आला. हा सप्टेंबर CPI पेक्षा कमी असल्यामुळे फेड आपली दरवाढ सौम्य करेल अशा अपेक्षेने USA, युरोपियन, आणि आशियन मार्केट्समध्ये तेजी होती.
डॉलर निर्देशांक, USA बॉण्ड यिल्ड कमी झाले तसेच USA मध्ये महागाई कमी झाल्यामुळे सोने आणि चांदीमध्ये तेजी होती.
युरोप आणि UK मध्ये नैसर्गिक गॅसचे दर ८% ने कमी झाले.
अपोलो हॉस्पिटल्सचे प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
अडानी पॉवरचे प्रॉफिट उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
ITI चा तोटा वाढला उत्पन्न कमी झाले निकाल असमाधानकारक होते.
ITC च्या आंध्र प्रदेशातील २०००० टन /प्रती दिन क्षमतेचा स्पाईस प्रोसेसिंग युनिटमध्ये उत्पादन सुरु झाले.
SML इसुझूचा तोटा कमी झाला उत्पन्न वाढले.
तेगा इंडस्ट्रीजचे प्रॉफिट उत्पन्न वाढले.
जिंदाल स्टील अँड पॉवर च प्रॉफिट कमी झाले उत्पन्न कमी झाले आणि मार्जिन कमी झाले
बाटा इंडिया प्रॉफिट आणि उत्पन्न वाढले.
अडानी ग्रीन एनर्जी प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
ऑइल इंडिया प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
EXIDE चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
IRFC चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
TRENT चे प्रॉफिट उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
काँकॉर चे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले.
ओरिएंट पेपर & इंडस्ट्रीज तोट्यातून फायद्यात आले उत्पन्न वाढले.
ऍस्टर DM हेल्थकेअर चे प्रॉफिट कमी झालेउत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.
श्रेयस शिपिंग चे प्रॉफिट उत्पन्न वाढले.
ऍडव्हान्स एंझाइम चे प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले
KRBL चे प्रॉफिट, उत्पन्न वाढले.
किर्लोस्कर इंडस्ट्रीजचे प्रॉफिट वाढले NII वाढले.
मेड प्लस चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
सुप्रिया लाईफ सायन्सेसचे प्रॉफिट उत्पन्न आणि मार्जिन कमी झाले.
मूडीजने भारताच्या GDP ग्रोथचे अनुमान २०२२ साठी ७.७% वरून ७% एवढे केले तर २०२३ साठी ४.८% आणि २०२४ साठी ६.४% केले. कमजोर रुपया आणि वाढते महागाई यामुळे हे अनुमान कमी केले.
आज DCX सिस्टिम्स चे BSE वर Rs २८६.२५ आणि NSE वर Rs २८७ वर लिस्टिंग झाले. हा शेअर IPO मध्ये Rs २०७ ला दिला असल्यामुळे ज्यांना शेअर्स अलोट झाले त्यांना चांगला लिस्टिंग गेन्स झाले.
अल्केम लॅबच्या USA मधील ST. लुइस येथील युनिटच्या तपासणीत USFDA ने ३ त्रुटी दाखवल्या आणि फॉर्म नंबर ४८३ इशू केला. या ट्रुडी डाटा इंटीग्रीटीशी संबंधित नाहीत. अडाणी पॉवरने त्यांच्या सपोर्ट प्रॉपर्टीज या सबसिडीअरीतील १००% स्टेक
अडानी-CONNEX ला विकण्यासाठी MOU केले. अडानी-CONNEX हे अडाणी एंटरप्रायझेस आणि EDGE CONNEX यांच्यातील ५०:५० JV आहे.
वेदांताशी संबंधित १०% अतिरिक्त लेवीच्या बाबतीत सरकारने ६ आठवड्याच्या आत निर्णय घ्यावा असे सुप्रीम कोर्टाने सांगितले.
HDFC आणि HDFC बँक यांचे मर्जर झाल्यावर जी मर्ज्ड कंपनी होईल तिचे MSCI ग्लोबल निर्देशांकात १३% वेटेज असेल. आता या दोन्ही कंपन्यांचे मिळून ५,८% एवढे वेटेज आहे. ऍडजस्टमेन्ट फॅक्टर ०.५X वरून १X केला.
इंडियन हॉटेल्स ही कंपनी तोट्यातून फायद्यात आली. उत्पन्न ६९% ने वाढले मार्जिन २३.९% राहिले. इंडियन हॉटेलच्या व्यवस्थापनाने सांगितले की त्यांच्या वर्तमान हॉटेल्सना चांगले मागणी आहे. ऑक्युपन्सी रेट ७०% आणि सरासरी भाडे Rs११०३ झालं. कोरोनाच्या काळात होम स्टे,होम डिलिव्हरी या योजनांना चांगली मागणी आहे. आम्ही नवीन हॉटेल्स बांधत आहोत त्यातूनही उत्पन्न यायला सुरुवात झाली आहे. G-२० चे अध्यक्षपद भारताला मिळाले आहे आणि पोस्ट कोविड कॉर्पोरेट ट्रॅव्हलमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे तिसरी तिमाही कंपनीला चांगली फलदायी होण्याची शक्यता आहे. कंपनीने २०२५ मध्ये ३३.३३% मार्जिनचे लक्ष्य ठेवले आहे.
FACT या कंपनीचे प्रॉफिट, उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले. कंपनीला Rs ४७.९ कोटींचा वन टाइम लॉस झाला.
वेदांत फॅशनचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
डेक्कन सिमेंटचे प्रॉफिट उत्पन्न आणि मार्जिन कमी झाले. निकाल असमाधानकारक होते.
IPCA लॅबचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले.
युनिकेम लॅबचा तोटा वाढला उत्पन्न वाढले.
M & M चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले. निकाल चांगले आले.
झायड्स लाईफचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
हिंदाल्को चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले कॉपरचे व्हॉल्युम ११२ KT होते.आयशर मोटर्स चे प्रॉफिट Rs ६५७ कोटी, उत्पन्न ५६.४% ने वाढून Rs ३५१९ कोटी आणि मार्जिन २३.३% होते. कंपनीने रॉयल एन्फिल्ड २.०३ लाख विकल्या.
झोमॅटोचा तोटा कमी झाला, उत्पन्न वाढले . ऑर्डर्सची संख्या तसेच ऑर्डरची रक्कम यात वाढ झाली.
आज निफ्टी ५२ आठवड्यांचा कमाल स्तरावर गेला.
बँका आणि IT क्षेत्रातील शेअर्स मध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६१७९५ NSE निर्देशांक निफ्टी १८३४९ बँक निफ्टी ४२१३७ वर बंद झाले.
Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !