आजचं मार्केट – १४ November २०२२

आज क्रूड US $ ९५.४० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८१.२० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०६.५४ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.८७ VIX १४.९१ होते. आज सोने आणि चांदी तसेच इतर बेस मेटल्स मंदीत होते.

रशियाच्या क्रूड प्राइसेसवर कॅप लावण्याचा विचार चालू आहे. आज ओपेक+ने क्रूड ऑइलसाठीच्या मागणीचे अनुमान FY २०२२ आणि FY २०२३ वर्षांसाठी कमी केले

ऑक्टोबर २०२२ महिन्यासाठी WPI ८.३९ ( १०.७० आधीच्या महिन्यात) होता. ऑक्टोबर २०२२ या महिन्यासाठी CPI ६.७७ आला ( आधीच्या महिन्यासाठी ७.४१ होते) या प्रकारे घाऊक आणि रिटेल महागाई थोडी कमी झाली

हिंडाल्कोच्या व्यवस्थापनाने सांगितले की कोळसा आणि नैसर्गिक गॅसच्या किमती कमी होत आहेत. आमची हिराकूड आणि अन्य एका ठिकाणी गुंतवणूक योजनेप्रमाणे चालू आहे. भारतामध्ये अल्युमिनियम आणि कॉपर यांना लॉन्ग टर्म मध्ये चांगली मागणी असेल.कंपनी त्यांना असलेले कर्ज किमान स्तरावर ठेवण्याचा प्रयत्न करेल.

वोल्टासने डेन्मार्कच्या VESTFROST सोल्युशन्स बरोबर बायोमेडिकल रेफ्रिजरेशन आणि कोल्ड चेन साठी करार केला.

L & T इन्फोटेक आणि माईंड ट्री यांच्या मर्जर नंतर मर्ज्ड एंटिटीचे नाव LTIMAAINDTREE असे असेल आणि या मर्ज्ड कंपनीचा मार्च २०२३ च्या निफ्टी रीबॅलन्सिंगमध्ये समावेश होईल. माइंडट्रीच्या १०० शेअरला L & T इंफोटेकचे ७३ शेअर्स मिळणार होते.

ASTRAL पॉलीटेकनिकच्या व्यवस्थापनाने सांगितले की प्लम्बिंग व्यवसायाकडून मिळणारे उत्पन्न कमी झाले. पेंट्स आणि वार्निशेस सेक्शन मध्ये २७% ग्रोथ झाली. आमचा पाण्याच्या टाक्या उत्पादन करण्याचा व्यवसाय अपेक्षेप्रमाणे वाढत आहे. Q२ मध्ये PVC तसेच केमिकल्स किमती वाढल्यामुळे कंपनीला Rs ४५ कोटींचा इन्व्हेन्टरी लॉस झाला. पण Q ३ मध्ये महागाई कमी होत आहे असे असले तरी थोडा लॉस कंपनीला होईल. कंपनीच्या फ्लॅगशिप ब्रॅण्ड्स साठी चांगली मागणी आहे. येत्या ६ महिन्यात मार्जिन १५% राहील. कंपनीने ४ राज्यात ३७ स्टोर्स उघडली. कंपनीचा ५०० शोरूम उघण्याची योजना आहे.स्ट्रॉंग ब्रँड प्रेझेन्स आणि क्रॉस सेलिंग यामुळे कंपनीची विक्री वाढत आहे.

चीनने झिरो कोविड पॉलिसीमध्ये ढिलाई दिली क्वारंटाईनची मुदत कमी केली, तसेच एअरलाईन्सवरील निर्बंध सौम्य केले. रिअल इस्टेट उद्योगासाठी पॅकेज जाहीर केले. मेटल्ससाठी असलेली मागणी सुधारेल.

बालीमध्ये G -२० देशांची शिखर परिषद आहे. त्यावेळी USA चे अध्यक्ष जो बिडेन आणि चीनचे अध्यक्ष झी जीन पिंग याची प्रत्यक्ष भेट होईल. यात तैवान क्रूड, युक्रेन अशा प्रश्नांचा समावेश असेल.

ग्रासिमचे उत्पन्न वाढले प्रॉफिट वाढले . कंपनीला Rs ८८ कोटींचा वन टाईमलॉस झाला.

LIC चे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. उत्पन्नात वन टाइम गेन आणि टॅक्स रिफंड यांचा समावेश असला तरी इतर रेशियो चांगले आहेत.

थायरोकेअर, युनिकेम लॅब, इंडिया पेस्टीसाईड्स, गजरात अंबुजा एक्स्पोर्ट, MGL, ASTRA, JK सिमेंट, BHEL, ऑरोबिंदो ( USA मध्ये असलेला व्यवसाय कमी झाला. ) , शिल्पा मेडिकेअर यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल कमजोर होते.

P & G, JB केमिकल्स, BDL, गॉडफ्रे फिलिप्स, थॉमस कुक ( तोट्यातून फायद्यात), RCF, HEG, ABB, ग्रीन लॅम, अतुल ऑटो, नाटको फार्मा यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

हिंदुस्थान झिंक १६नोव्हेंबर २०२२ च्या बैठकीत दुसऱ्या इंटरीम लाभांशावर विचार करेल. या लाभांशा साठी त्यांनी २४ नोव्हेंबर ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.

ग्लेनमार्क फार्माचा भारताचा व्यवसाय सुधारला.
फोर्टीज हॉस्पिटलचा ऑक्युपन्सी रेट वाढला.
किस्टोन रिअल्टर्स ( ब्रँड नेम रुस्तमजी) या कंपनीचा IPO १४ नोव्हेम्बरला ओपन होऊन १६ नोव्हेम्बरला बंद होईल. प्राईस बॅड ५१४ ते ५४१ असून २७ शेअर्सचा लॉट आहे. दर्शनी किंमत Rs १० आहे. टोटल Rs ६३५ कोटींचा IPO असून Rs ५६० कोटींचा फ्रेश इशू आणि Rs ७५ कोटींचा OFS आहे. या कंपनीचे PE ३८.७ असून EPS १७.९६ आहे.
पातंजली फुड्सचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल खाद्य तेलांच्या किमती अचानक कमी झाल्यामुळे कमजोर आले. दुसऱ्या तिमाहीत फूड बिझिनेसचे काँट्रीब्युशन वाढले २७% झाले. फूड बिझिनेसमध्ये चांगली ग्रोथ दिसत आहे.

मवाना शुगरचा तोटा वाढला उत्पन्न वाढले. निकाल कमजोर आले.

इमामी पेपर चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.

भारत बिजली चे प्रॉफिट उत्पन्न वाढले.

बॉमर लॉरी चे प्रॉफिट उत्पन्न आणि मार्जिन वाढले.
AIA इंजिनीरिंग चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
पनामा पेट्रोचे प्रॉफिट उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.

JTEKT चे प्रॉफिट उत्पन्न आणि मार्जिन वाढले.
शक्ती शुगर तोट्यातून फायद्यात आली उत्पन्न वाढले.
भारत फोर्जचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले. व्यवस्थापनाने सांगितले की यूरोपमधील २ अल्युमिनियमच्या प्रोजेक्टसची चांगली प्रगती होईल त्यामुळे Q ३ मध्ये निकाल चांगले येतील.असे व्यवस्थापनाने सांगितले.

ITDC चे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
हुतामाकी इंडिया तोट्यातून फायद्यात आली उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.

ऍबॉट लॅब चे निकाल चांगले आले.

गुड इअर चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले.

HAL चे निकाल चांगले आले. त्यांनी Rs २० प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला आणि त्यांची रेकॉर्ड डेट २१ नोव्हेंबर निश्चित केली. अंतिम लाभांश इंटरीम लाभांशाविषयी सविस्तर माहिती माझ्या पुस्तकात दिली आहे.

आज FMCG कन्झ्युमर गुड्स,बँका आणि NBFC मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले तर मेटल्स रिअल्टी आणि IT सेक्टर मध्ये खरेदी झाली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६१६२४ NSE निर्देशांक निफ्टी १८३२९ आणि बँक निफ्टी ४२०७६ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.