आजचं मार्केट – १५ November २०२२

आज क्रूड US $ ९२.८० प्रती बॅरेलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८१.३० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०६.९९ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.८६ आणि विक्स १४.९१ होते.

ओपेक+ने क्रूड ऑइलसाठी असलेल्या मागणीचे अनुमान कमी केले. त्यामुळे क्रूडचे भाव कमी झाले.
L&T इन्फोटेक आणि माईंड ट्री यांच्या मर्जरची डेट २४ नॉव्हेएम्बर निश्चित झाली. पब फिंटेकच्या अँकर इन्व्हेस्टर्सचा लॉक इन पिरियड आज संपला.

इसरो आज त्यांचे पहिले रॉकेट लाँच करणार.

रेल्वेच्या शेअर्समध्ये चांगली खरेदी दिसून येत आहे उदा. RVNL आणि IRCON

टाटा मोटर्सने हायड्रोजन पॅसेंजर व्हेईकल बनवण्यासाठी कमिन्स बरोबर करार केला.

चीनचा औद्योगिक आउटपुट ६.३% वरून ५% झाला.

मानव संसाधन मंत्रालयाने ऍपटेकबरोबर कॉम्प्युटर टेस्ट सेवा पुरवण्यासाठी करार केला.

फ्युजन मायक्रो फायनान्सचा शेअर BSE वर Rs ३६०.५० वर तर NSE वर Rs ३५९.५० वर लिस्ट झाला,. हा शेअर IPO मध्ये Rs ३६८ ला दिला होता. क्रिसिलने फ्युजन मायक्रो फायनान्स चे लॉन्ग टर्म रेटिंग A – वरून A केले.

KFIN टेक्नॉलॉजीच्या IPO ला सेबीची मंजुरी मिळाली.

अपोलो टायर, ONGC, ग्रीव्हज कॉटन ( तोट्यातून फायद्यात आली), दिलीप बिल्डकॉन ( तोट्यातून फायद्यात आली) इंडिया बुल्स हाऊसिंग, सिरमा ( प्रॉफिट उत्पन्न मार्जिनमध्ये लक्षणीय वाढ) NBCC ( मार्जिन वाढले), मार्क्सन फार्मा, अरविंद फॅशन्स, युनिव्हर्सल केबल्स यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

IRCTC, NMDC, बायोकॉन, GMR इन्फ्रा, CESE, झुआरी, रॅडिको खेतान, आरती इंडस्ट्रीज यांचे निकाल कमजोर होते.

BSNL जानेवारी २०२३ मध्ये 4G लाँच करणार आहे. . BSNLने TCS ला १ लाख टॉवर्स लावण्यासाठी Rs २६८३१ कोटींची ऑर्डर दिली हे तोवर २ वर्षात लावायचे आहेत आणि ९ वर्षे त्यांचा मेंटेनन्स करायचा आहे.

अडानी एंटरप्रायझेसने NDTV आणि त्यांच्या इतर सबसिडीअरीमध्ये मध्ये २६% स्टेक खरेदी करण्यासाठी सेबीने मंजुरी दिली. आता अडानी एंटरप्रायझेस Rs २९४ प्रती शेअर या भावाने २६% स्टेक साठी ओपन ऑफर आणणार आहे. त्यामुळे NDTV च्या शेअरला अपर सर्किट लागले.
सिनजीन च्या बंगलोर युनिटला USFDA कडून क्लीन चिट मिळाली.

फिंनोटेक्स केमिकलला FMCG कंपनीकडून Rs १५० कॉटनची ऑर्डर मिळाली.

सेंच्युरी प्लायवूड ने त्यांचे ब्रम्हदेशातील युनिट बंद केले. त्यामुळे त्यांनी Rs ४७ कॉटनचा वन टाइम लॉस बुक केला. ब्रम्हदेशातील राजकीय परिस्थिती अस्थिर झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. कंपनी हे युनिट विकून टाकणार आहे. वाढणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीमुळे मार्जिन कमी झाले. पण आता कच्च्या मालाच्या किमती कमी होत आहेत त्यामुळे येणाऱ्या दोन तिमाहीत मार्जिनमध्ये सुधारणा दिसेल. वर्तमान युनिटचा परफॉर्मन्स चांगला आहे. दक्षिण भारतात पार्टीकल बोर्डसाठी चांगली मागणी आहे त्यामुळे चेन्नईमध्ये कंपनीने कन्टीन्यूअस प्रोडक्शन लाईन चा प्लांट लावला. या प्लांटमध्ये Rs ५.५० कोटींची गुंतवणूक केली आहे. कंपनीने सांगितले की सर्व OEM आमचे ग्राहक आहेत.

आज रेल्वे गॅस टायर क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली. मार्केटमध्ये मार्केटची वेळ संपता संपता बरीच खरेदी झाली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६१८७२ NSE निर्देशांक निफ्टी १८४०३ बँक निफ्टी ४२३७२ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.