आजचं मार्केट – १६ November २०२२

आज क्रूड US डॉलर्स ९३.५० च्या आसपास तर रुपया US $१=₹८१.४० च्या आसपास होते. US डॉलर निर्देशांक १०६.५०, USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.७६ आणि VIX 15.12 होते.

,USA ची, युरोपियन मार्केट्स आज तेजीत होती. एशियन मार्केट्स मंदीत होती.

USA मध्ये WPI कमी झाले.PPI ०.२% होते .
UK चा ऑक्टोबर महिन्यासाठी CPI ११.१ (१०.७) होते.TSMC मध्यें बर्क्सशायर हाथवे ने US$ ४०० कोटींना stake खरेदी केला. बेस मेंटल्समध्ये तेजी होती.

BEL ने डिफेन्स प्रॉडक्ट डेव्हलप करण्यासाठी हिंदुस्थान शिपयार्ड बरोबर केला, लाईट वेपन्ससाठी प्रोफेन्स LLC बरोबर करार केला.

TCS ने TAP एअर पोर्तुगाल बरोबर एअरलाईन डिजिटल सेंटर साठी करार केला.

गोदरेज प्रॉपर्टीजने पुण्यामधील प्रोजेक्ट मध्ये ₹ ५०० कोटींची विक्री केली .

ESCORTS क्यूबोटा त्यांच्या ट्रॅक्टर्स च्या किमती वाढवणार आहे.

आज बिकाजी फुडसचे BSE वर ३२२.८० आणि ग्लोबल हेल्थ केअर (मेदांत हॉस्पिटल्स) चे ₹ ३९८.१५ वर लिस्टिंग झाले.

हे शेअर्स अनुक्रमे IPO मध्यें ₹ ३०० आणि ₹ ३३६ ला दिले असल्यामुळे ज्यांना हे शेअर्स अलॉट झाले त्यांना चांगले लिस्टिंग फायदा झाले. लिस्टिंग आणि एकूणच IPO विषयी सविस्तर माहिती माझ्या पुस्तकात दिली आहे.

ONGC चे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. कंपनीने ₹ ६.७५ अंतरिम लाभांश जाहीर केला. याची रेकॉर्ड डेट २२/११/२०२२ निश्चित केली .

M&M ने सेंट्रल भारतात ऍग्री मशिनरी प्लांट सुरू केला.

भारत रसायनचे प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.

ग्लोबल हेल्थ केअर (मेदांत) यांच्या व्यवस्थापनाने सांगितले की रुग्णाला सर्वोत्तम उपचार करणे हे आमचे ध्येय आहे . हे उपचार माफक दरावर देण्याचा आमचा प्रयत्न राहील. वैद्यकशास्त्रातील सर्व शाखातील तज्ज्ञ कंपनीच्या पॅनलवर आहेत. कंपनीची 5 मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत.सहावे हॉस्पिटल नोएडा मध्ये तयार होत आहे. Occupance रेट ६०.५% आहे. प्रती बेड उत्पन्न ₹ ६००००/- आहे. कंपनीचे 10% उत्पन्न परदेशी
रुग्णांकडून येते.

झेन टेक्नॉलॉजीने UAE मध्ये झेन डिफेन्स टेक नावाची सबसिडीअरी बनवली.

मेट्रोपोलिस लॅबच्या मुंबई ऑफिसवर आयकर विभागाने तपासणी केली.

KEC इंटरनॅशनलला ₹ १२९४ कोटींचे नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

लिबर्टी शूज तोट्यातून फायद्यात आली. रेव्हेन्यू, मार्जिन वाढले. ही UP बेस्ड कंपनी असून हिचे 10 ब्रँड्स,असून चांगले नेटवर्क आहे . कंपनीची 25 देशात विक्री होते. चीनमधून होणारी आयात कमी झाली. फेस्टिव्हल सिझन मध्ये चांगली विक्री झाली. तिसऱ्या तिमाहीत चांगला व्यवसाय होतो.कच्च्या मालाच्या किमती हळू हळू कमी होत आहेत.कंपनी कृत्रिम चामड्यापासून पादत्राणे बनवते. कारण ओरिजिनल किंवा जेन्यूईन चामड्याची पादत्राणे महाग पडतील.कंपनी नवीन स्टोर्स उघडण्याबरोबरच ऑन लाईन विक्रीवर लक्ष केंद्रित करत आहे

सरकारने टारीफ आधारित कॉम्पिटीटीव्ह बिडिंगच्या अटी सोप्या केल्या. प्लांट 25 वर्षांपेक्षा कमी जुना असला तरी सामील होऊ शकेल .रीन्यूएबल प्लांटही PPA(पॉवर परचेस ऍग्रीमेंट)करू शकतील.PPA पूर्ण झाल्यावर वीज विक्रीत सूट दिली जाईल. प्लान्टची आयुरमर्यादा जर कमी असेल तर PPA ची मुदत कमी होऊ शकते. याचा फायदा NHPC, टाटा पॉवर सारख्या कंपन्यांना होईल.

सरकारने इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीमची मुदत वाढवली. याचा फायदा स्पाईस जेटला होईल. कंपनीला ₹ ९०० ते ₹ १००० कोटी मिळतील. ते आता नवीन 7 विमाने घेऊ शकतील त्यामुळे आता नवीन ठिकाणांवर विमानसेवा चालू करू शकतील तसेच वर्तमान ठिकाणी फ्रीक्वनसी वाढवू शकतील.
झायडस लाईफला कँसर टेस्टसाठी एक्सल्युझीव्ह
राइट्स मिळाले.
आज साखर ,रेल्वे, डिफेन्स तसेच सिमेंट,मेंटल्स,बँकिंग शेअर्समध्ये खरेदी झाली. इन्फ्रा ऑटो आणि फार्मा मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स 61980 NSE निर्देशांक निफ्टी 18409 बँक निफ्टी 42535 वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.