आजचं मार्केट – १७ November २०२२

आज क्रूड US $ ९१.८० प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१= Rs ८१.६० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०६.४६ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.७२ आणि VIX १५.३२ होते. USA चे रिटेल सेल्स १.३% ने वाढले .

काल FII नी Rs ३८६ कोटींची विक्री तर DII नी Rs १४३७ कोटींची खरेदी केली.

बिकाजीचे व्हॅल्युएशनची किंमत नेस्लेपेक्षा जास्त असल्याने या शेअरमध्ये IPO नंतर जास्त खरेदी झाली नाही. ग्लोबल हेल्थकेअरचे ऍव्हरेज रेव्हेन्यू दुसऱ्या नंबरवर आहेत.पहिल्या नंबरवर मॅक्स हेल्थ केअर आहे त्यामुळे ग्लोबल हेल्थ मध्ये खरेदी होत आहे.

डिझेल वरची एक्स्पोर्ट ड्युटी सरकारने Rs १३.५० प्रती लिटर वरून Rs १०.५० प्रती लिटर केली. तर क्रूडवरील विंडफॉल टॅक्स सरकारने Rs ९५०० वरून Rs १०२०० इतका केला.

हिंदुस्तान झिंकने Rs १५.५० प्रती शेअर एवढा २रा इंटरीम लाभांश जाहीर केला. याची रेकॉर्ड डेट २४ नोव्हेंबर आहे.

सॉफ्ट बँक त्यांचा PAYTM मधील ४.५५ % स्टेक ७% डिस्काउंटवर (फ्लोअर प्राईस Rs ५५५) US $ २.१५ कोटी रकमेचे शेअर्स ब्लॉक डील च्या माध्यमातून विकले. आज Paytm चा शेअर Rs ५४२ वर बंद झाला. ब्लॉक डीलची माहिती माझ्या पुस्तकात आहे.

ऑरोबिंदो फार्माच्या आंध्र प्रदेशातील नॉन अँटिबायोटिक मॅन्युफॅक्चरिंग युनिटला USFDA कडून क्लीन चीट मिळाली.

MP मधील बहुती गुफा या Rs ३९२ कोटींच्या कॉन्ट्रॅक्ट साठी इरकॉनला परवानगी मिळाली.
बलरामपूर चिनीच्या मिर्झापूर येथील ३२० KL प्रती दिन क्षमतेच्या प्लांट मध्ये इंडस्ट्रियल अल्कोहोलचे उत्पादन सुरु झाले. आता कंपनीची इंडस्ट्रियल अल्कोहोल उत्पादनाची क्षमता ८८० KLD झाली.

ब्लॅकस्टोन R सिस्टीम मध्ये ५२% स्टेक Rs २४५ प्रती शेअर या भावाने खरेदी करणार आहे.त्यामुळे शेअर मध्ये तेजी होती

स्टार पेपरच्या सहारनपूर येथील युनिटमध्ये कामकाज सुरु झाले. या प्लांटमध्ये आग लागल्यामुळे काम बंद केले होते.

जालान आणि कालरॉक यांच्या कॉन्सोर्शियम आणि जेट एअरवेजचे कर्जदार यांच्यात मतभेद वाढल्यामुळे जेट एअरवेज चे डील मागे पडले.
पेज इंडस्ट्री तेलंगाणामध्ये २ युनिट लावणार आहे.
HFCL या कंपनीला EURO १०.१८ मिलियनची एक्स्पोर्ट ऑर्डर मिळाली.

DSP म्युच्युअल फंडाला ईकविटास स्माल फायनान्स बँकेत ९.९९% स्टेक घेण्यासाठी RBI ने मंजुरी दिली.
WESATCH अडवायझर्सनी ट्रेन्टमधील त्यांचा २% स्टेक ओपन मार्केटमध्ये विकला.

टाटा मोटर्सला हरयाणा रोडवेज कडून १००० बसेसची ऑर्डर मिळाली.

NMDC ने विक्री वाढवण्याच्या उद्देशाने आयर्न ओअर तसेच लम्प फाईन आणि लम्प ओअर च्या किमती Rs ३०० प्रती टनने कमी केल्या.

अशोक लेलँडने टांझानियाच्या पोलीस दलाला १५० गाड्या पुरवल्या.

AB फॅशन रिटेल ‘GALARIES LAFAYETTE’ बरोबर डिपार्टमेंट स्टोअर चालू करणार आहे.
TCS ने ‘RANDSTAD’ या कंपनी बरोबर डिजिटल सेवा आधुनिक करण्यासाठी असलेल्या कराराची मुदत वाढवली.

कृष्णा मेडिकल (KIMS )ने सांगितले की आमचा मार्जिन ३०% च्या आसपास राखण्याचा प्रयत्न असेल. ऑक्युपन्सी रेट ७३% ते ७५% असून येत्या दोन तिमाहीत स्थिर राहील. सनशाईन आणि नागपूर येथील अधीग्रहणानंतर बेड्स मध्ये १००० ची वाढ झाली आहे. आम्ही बंगलोर येथे हॉस्पिटल आणि नासिक येथे JV तत्वावर हास्पिटल्स चालू करणार आहोत. येत्या वर्षात आम्ही आमची क्षमता १००० ते १२०० बेड्सने वाढवू. या साठी Rs १००० ते Rs १२०० कोटी भांडवल गुंतवणुकीची आवश्यकता आहे. ही गरज आम्ही इंटर्नल अक्र्युअल्स आणि कर्जाच्या माध्यमातून पुरी करू.

टेक महिंद्राने ‘BASIS TEC’ बरोबर स्मार्ट युटिलिटी सोल्युशन साठी करार केला.

UPL ने US $ ४.२३ कोटींना ब्राझीलमधील कंपनी ‘SEEDCROP HO’ मध्ये २०% स्टेक घेतला.
आज ऑटो, IT, फार्मा, मेटल्स, कन्झ्युमर ड्युरेबल्स,रिअल्टी यामध्ये प्रॉफीटबुकिंग झाले तर PSU बँका आणि इन्फ्रा सेक्टरमध्ये खरेदी झाली.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.