आजचं मार्केट – १८ November २०२२

आज क्रूड US $ ९०.५० प्रती बॅरल्सच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८१.७० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०६.६२ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.७९ आणि VIX १४.५० होते. आज FII नी Rs ६१८ कोटींची तर DII ने ४४९ कोटींची खरेदी केली .

आज USA ची मार्केट्स मंदीत होती. USA मध्ये घरांची विक्री कमी झाली.३०वर्षांच्या मुदतीच्या होम लोन्सचे व्याजदर ७% पेक्षा कमी झाले.
चीनमध्ये कोरोनाच्या केसेस सतत वाढत आहेत. त्यामुळे चीनकडून येणारी क्रूडसाठी मागणी कमी झाल्यामुळे क्रूड US $ ९० पर्यंत कमी झाले.
UK मध्ये GBP ५५०० कोटींचा फिस्कल प्लॅन जाहीर केला.

NYKAA मधील TPG कॅपिटलने त्यांचा मोठा स्टेक विकला. ०.५% डिस्काउंटवर Rs १००० कोटींचे ब्लॉक डील झाले.

BEL ने आर्मर्ड व्हेइकल्स आणि टँक्ससाठी आर्मर्ड व्हेईकल निगम लिमिटेड बरोबर करार केला.

BEL ने R & DE (E) आणि DRDO बरोबर ऑर्डनन्स हँडलिंग रोबोट उत्पादनासाठी करार केला.
BEL ने IITM प्रवर्तक टेक बरोबर अकाउस्टिक सेन्सिंगच्या विस्तारासाठी करार केला.

आज झायडस वेलनेस च्या व्यवस्थापनाने सांगितले की रुपयाची कमजोरी , दुधाची किंमत आणि पॅकिंग कॉस्ट वाढल्यामुळे मार्जिनवर परिणाम झाला. या कंपनीचे कॉम्प्लान, न्यूट्रीलाईट, एव्हरयूथ, शुगरफ्री हे ब्रँड आहेत. ग्रामीण भागातून मागणी कमी झाली आहे. शुगर फ्री च्या विक्रीत डबल डिजिट ग्रोथ सुरु राहील.

अल्ट्राटेक सिमेंटच्या नाथद्वारा बिर्ला व्हाइट पुट्टी प्लांट च्या तिसऱ्या युनिट मध्ये काम सुरु झाले.

वेदांताला हिंदुस्थान झिंक कडून Rs ४४०० कोटी लाभांश मिळेल. त्यानुसार Rs ११ ते Rs १२ वेदांत अंतरिम लाभांश जाहीर करण्याची शक्यता आहे. याची रेकॉर्ड डेट ३० नोव्हेंबर निश्चित केली आहे.

SPARK च्या ‘SEZABY’ या एपिलेप्सीवरील औषधाला USFDA कडून मंजूर मिळाली.

बजाज हेल्थकेअरच्या बरोडा युनिटची USFDA ने १४ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर दरम्यान तपासणी केली पण कोणतीही त्रुटी दाखवली नाही.

पॉलीकॅब च्या १६.२२ लाख शेअर्सचे Rs २५२०.८५ प्रती शेअरवर डील झाले.

आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये खाद्य तेलांच्या किमती कमी झाल्या. युक्रेन आणि रशिया कडून होणारा सनफ्लॉवर ऑईलचा पुरवठा सुरु झाला.

RJIO ने दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, गाझियाबाद, फरिदाबाद मध्ये 5 G सेवा सुरु केली.

सोम डिस्टीलरीज चे नाव सोम डिस्टीलरीज ब्रुअरीज आणि वायनरीज लिमिटेड असे बदलायला कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने परवानगी दिली.

रमा स्टील ट्यूब्सने तुमच्या जवळ असलेल्या १ शेअरला ४ बोनस शेअर्स जाहीर केले. सरकारने आज डेटा डिजिटल प्रोटेक्शन बिलाचा ड्राफ्ट जाहीर केला. फेक रिव्ह्यूजवर कडक कारवाई केली जाईल. डेटाचा चुकीचा वापर केलेला आढळल्यास Rs ५०० कोटींचा दंड आकारण्याची तरतूद केली. स्वीगी, झोमॅटो अमेझॉन, NYKAA, फ्लिपकार्ट ह्या कंपन्यांवर याचा परिणाम होईल.

स्ट्राईड फार्माच्या पोटॅशियम क्लोराईड च्या ओरल सोल्युशनला USFDA कडून मंजुरी मिळाली.
सरकारने सांगितले की रब्बी हंगामासाठी युरियाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.

आज ऑटो, रिअल्टी, फार्मा, इन्फ्रा, FMCG, एनर्जी सेक्टरमध्ये रोफीत बुकिंग झाले तर बँकांच्या शेअर्समध्ये खरेदी झाली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६१६६३ NSE निर्देशांक१८३०७ तर बँक निफ्टी ४२४३७ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.