आजचं मार्केट – २१ November २०२२

आज क्रूड US $ ८७.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ८१.८० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०६.९९ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.८० होते. आणि VIX १५.०८ होते.

आज USA ची युरोपची मार्केट्स तेजीत होती. सोने आणि चांदी मंदीत होते.

FII नी Rs ७५१ कोटी विक्री तर DII नी Rs ८९० कोटींची खरेदी केली.

चीनमध्ये कोविड संबंधित निर्बंधामुळे क्रूडसाठी असलेल्या मागणीत घट झाली त्यामुळे क्रूडचे भाव US $ ८७ प्रती बॅरल्स च्या आसपास आले.ओपेक+ ची २ डिसेंबर २०२२ रोजी बैठक आहे.

IEX २५ नोव्हेम्बरला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या बैठकीत शेअर्स बायबॅकवर विचार करेल.

बायबॅक या कॉर्पोरेट एक्शनविषयी सविस्तर माहिती ब्लॉग नंबर ५८ मध्ये आणि माझ्या पुस्तकात दिली आहे.

१९ डिसेम्बरपासून टाटा मोटर्सचा सेन्सेक्स मध्ये समावेश होईल आणि DR रेड्डीज सेन्सेक्समधून बाहेर पडेल.

PFC ( पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन) ने Rs ३ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला . २५ नोव्हेंबर २०२२ रेकॉर्ड डेट निश्चित केली असून ९ डिसेंबर २०२२ पर्यंत दिला जाईल.

३M इंडिया या कंपनीने Rs ८५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

महाराष्ट्र सीमलेसने १:१ बोनस जाहीर केला आहे. त्याची रेकॉर्ड डेट बदलून २८ नोव्हेंबर २०२२ केली आहे. ( आधी २४ नोव्हेंबर निश्चित केली होती.)
भारतीय संसदेचे अधिवेशन ७ डिसेंबर २०२२ ला सुरु होऊन २९ डिसेंबर २०२२ ला समाप्त होईल.
सरकारने २२ मे २०२२ रोजी आयर्न ओअर आणि इतर स्टील प्रोडक्टसवर एक्स्पोर्ट ड्युटी लावली होती. आता सरकारने ही एक्स्पोर्ट ड्युटी (१५%) रद्द केली आहे. याचा फायदा JSPL आणि NMDC ला होईल.

RCF २९ नोव्हेम्बरला अंतरिम लाभांशावर विचार करेल.

आलेम्बिक फार्माला USFDA कडून NIFEDIPINEला अंतिम मंजुरी मिळाली.
दीपक फर्टिलायझर आरती इंडस्ट्रीज ला नायट्रिक ऍसिड १ एप्रिल २०२३ पासून २० वर्ष
सप्लाय करेल. या करारातून दीपक फर्टिलायझर्स ला एकूण Rs ८००० कोटी फायदा होईल.

चेन्नई पेट्रोला मनाली रीफायनरीकडून ऑर्डर मिळाली.
आज फाईव्ह स्टार बिझिनेसचे ( IPO मध्ये Rs ४७४ ला दिला होता) BSE वर Rs ४४९.९५ वर तर NSE वर Rs ४६८.८० वर लिस्ट झाला.

आज ARCHEAN केमिकल्सचा शेअर ( IPO मध्ये Rs ४०७ ला दिला आहे) BSE वर Rs ४४९ वर तर NSE वर Rs ४५० वर ईस्ट झाला.

रेझिनच्या किमती कमी झाल्या आहेत त्याचा फायदा प्लास्टिक पाईप्स बनवणाऱ्या कंपन्यांना होईल. उदा प्रिन्स पाईप्स, अपोलो ट्यूब्स.

ऑरोबिंदो फार्माच्या तेलंगाणा प्लांटच्या १० नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर २०२२ दरम्यान केलेल्या तपासणीत १० त्रुटी दाखवून फॉर्म नंबर ४८३ इशू केला. ह्या त्रुटी डेटा इंटीग्रीटीशी संबंधित नाहीत.

अलाइड डिजिटलला PMIVC कडून Rs २०७ कोटींची ऑर्डर मिळाली.

२५ नोव्हेंबरपासून ‘FAKE REVIEW’ संबंधित मार्गदर्शक तत्वे लागू होतील. ही तत्वे विशेषतः पर्यटन, आणि रेस्टोरंट्सना लागू होईल.

सरकारने हिंदुस्तान कॉपर च्या डायव्हेस्टमेन्टची योजना स्थगित केली.

पॉलिसी बझारने YKNP मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये US $ २ मिलियनला घेतला. यामुळे कंपनीला UAE मधील बँकात ऍक्सेस मिळेल.

आज मार्केटमध्ये IT, ऑइल & गॅस, ऑटो, पॉवर, रिअल्टी, मेटल्स आणि फार्मा मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६११४४ NSE निर्देशांक निफ्टी १८१५९ आणि बँक निफ्टी ४२३४६ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.