आजचं मार्केट – २२ November २०२२

आज क्रूड US $ ८७.९३ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८१.७०च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०७.६० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.८२ आणि VIX १४.५१ होते.

आज USA च्या मार्केट्समध्ये दिवसभर अस्थिरता होती. क्रूडचा भाव US $ ८२ प्रती बॅरल एवढा खाली आला. रशियाच्या क्रूड प्राईसवर कॅप लावणार आणि ओपेक त्यांचे उत्पादन ५ लाख BPD वाढवणार असे जाहीर झाले. UAE नी ओपेक+ चा असा सध्यातरी काहीच विचार नाही असे सांगताच क्रूड पुन्हा US $८८ प्रती बॅरल वर गेले.

USA मध्ये चीनच्या ज्या लिस्टेड कंपन्या आहेत त्यांच्या शेअर्सचे भाव कमी होत आहेत.

चीनने GUAANJU आणि बीजिंग मध्ये लॉकडाऊन लावायला सुरुवात केली.

ऑस्ट्रेलियाच्या संसदेने भारताबरोबर FTA करायला मंजुरी दिली.

माइंडट्रीचा आज स्टॉक एक्स्चेंवरील शेवटचा दिवस आहे.

अडाणी ग्रुपची NDTV च्या शेअर्ससाठी Rs २९४ प्रती शेअर्स भावाने ओपन ऑफर सुरु झाली.
आज FII नी Rs १५९४ कोटींची विक्री तर DII नी १२६३ कोटींची खरेदी केली.

APTUS व्हॅल्यू २८ नोव्हेंबरला अंतरीम लाभांशावर विचार करेल.

लाईट हाऊस आज दुसऱ्या वेळेला त्यांचा NYKAA मधील ०.६५% स्टेक Rs १८० ते Rs १८४ प्रती शेअर्स भावाने Rs ३२० कोटींना विकतील.
होरीझॉन पॅक्स आणि सेकुरी पॅक्स या दोन्ही कंपन्यात JK पेपर ८५% स्टेक खरेदी करणार आहे.
KAYNES टेक या कंपनीच्या शेअर्स आज BSE वर Rs ७७५ वर आणि NSE वर Rs ७७८ वर लिस्ट झाले. कंपनीने IPO मध्ये हे शेअर्स Rs ५८७ प्रती शेअर या भावाने दिले असल्यामुळे ज्यांना शेअर्स अलॉट झाले त्यांना चांगला लिस्टिंग गेन्स झाले.
बजाज ऑटो नवीन गाडी लाँच करणार आहे.
लोकेश मशिन्सनी IIT मद्रास बरोबर करार केला.
वेलस्पन इंडिया त्यांच्या २ सबसिडीअरीज विकणार आहे.

ग्लेनमार्क फार्माने फायझर बरोबरचा मामला सोडवला.

ल्युपिनने राज्यस्थान सरकारबरोबर करार केला.
रूट मोबाईलने CITC लायसेन्स UAE मध्ये जिंकले.कंपनी रियाधमध्ये आता सेल्स ऑफिस उघडू शकेल.

महाराष्ट्र सरकारने ३ इन्फ्रा प्रोजेक्ट्स जाहीर केल्या. Rs ५२६० कोटींच्या ऑर्डर्स दिल्या. सरकार गॅरंटी देणार असल्यामुळे हुडको चा शेअर वाढला.

VI ने ४०.१ लाख ग्राहक गमावले तर रिलायन्स जिओने ७.२४ लाख ग्राहक आणि भारती एअरटेलने ४.१२ लाख ग्राहक जोडले.

हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत २७ % ने वाढ होऊन सप्टेंबरमध्ये १.१४ कोटी झाली. स्पाईस जेटचा मार्केटशेअर ७.३%, इंडिगोचा मार्केट शेअर कमी झाला ५६ ७% झाला, विस्ताराचा मार्केट शेअर ९.६% वरून ९.२% झाला तर एअर इंडियाचा मार्केट शेअर ९.२% वरून ९.१% झाला.

स्टील स्ट्रीप ने इझरेलमधील REDLAR TECH या कंपनीबरोबर EV साठी करार केला.

रिलायन्स इंडस्ट्रीज RCOM चे टॉवर आणि फायबर ऍसेट Rs ३७५० कोटींना घेणार आहे.

LIC ने टेक महिंद्रामधील स्टेक वाढवून ६.८७% केला. LIC ने १ एप्रिल २०१९ मध्ये लाँच केलेली २ टर्म इन्शुअरन्स प्रॉडक्टस बंद केली.

वेदांताने Rs १७.५० प्रती शेअर तिसऱ्या अंतरिम लाभांशाची घोषणा केली. या अंतरीम लाभांशासाठी ३० नोव्हेंबर ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.

नजारा टेक, डेल्टा कॉर्प यांना आकारला जाणारा GST १८% वरून २८% करण्यावर विचार करण्यासाठी ग्रुप ऑफ मिनिस्टर्सची बैठक आहे. या बैठकीत, गेमिंग हॉर्सरेसिंग यावर आकारल्या जाणाऱ्या GST वर विचार होईल.

भारती एअरटेलने Rs ९९ चा प्लॅन बंद करून Rs १५५ चा केला.

आज मार्केट २ वाजेपर्यंत मर्यादित रेंज मध्ये काम करत होते. २ वाजल्यानंतर मात्र मार्केटने उसळी घेतली. पेपर, हॉस्पिटल, बँकांच्या शेअर्समध्ये खरेदी झाली.

मींडा कॉर्पने LOCONOV बरोबर करार केला.
‘EASE MY TRIP’ आणि आसाम टुरिझम डेव्हेलपमेंट कॉर्पोरेशन यांच्यात करार झाला.
ज्युबिलण्ट फूडला डॉमिनोस पिझ्झा बिझिनेसची सबसिडीअरी नेपाळमध्ये सेट अप करायला परवानगी मिळाली .

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६१४१८ NSE निर्देशांक निफ्टी १८२४४ बँक निफ्टी ४२४५७ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.