आजचं मार्केट – २३ November २०२२

आज क्रूड US $ ८८.६० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १ = Rs ८१.७० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०७.०९ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.७५ आणि VIX १३.९० होते.

FII नी Rs ६९८ कोटींची विक्री तर DII ने Rs ६३८ कोटी खरेदी केली.

सिमेन्सचे तिमाही निकाल चांगले आले. पण अपेक्षेपेक्षा थोडे कमी आले. कंपनीने Rs १० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

मारुती सुझुकी त्यांच्या डिझेल गाड्यांचे रूपांतर CNG आणि हायब्रीड ऑप्शनमध्ये करणार आहे. हा कंपनीसाठी चांगला बदल ठरेल. मारुती त्यांच्या Dzire, सेलरी, WagonR, एर्टिगा, आल्टो, SPRESSO आणि इतर ब्रँड यांचे आता CNG व्हेरियंट ऑफर करणार आहे. एर्टिगा, ब्रेझा, CIAZ आणि ग्रँड वितारा यांचे हायब्रीड व्हेरियंट ऑफर करत आहे. एप्रिल २०२३ पासून ‘रिअलवर्ल्ड ड्रायविंग एमिशन’ चे नॉर्म्स लागू होतील. यामुळे कार्स मधून कमी एमिशन होणे अनिवार्य ठरेल. या धोरणातील बदलामुळे मारुतीला खूप फायदा होईल.

चीनमध्ये २७००० नव्या कोरोनाच्या केसेस आढळून आल्या त्यामुळे मोठ्या शहरातून आता कोरोनाचे निर्बंध कडक करायला चीनने सुरुवात केली आहे. शाळा आणि ऑफिस बंद ठेवायला सुरुवात केली आहे.

NAYKAA च्या CFO श्री अगरवाल यांनी राजीनामा दिला.

व्हीनस पाईप्स, टारसन प्रॉडक्टस यांच्या अँकर इन्व्हेस्टर्सचा लॉक-इन पिरियड संपेल.

DCW ही CPVC क्षमता १० KT वाढवणार.

युको बँकेचे सर्किट लिमिट २०% वरून १०% केले.
कमोडिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स Rs १००० कोटींवरून Rs ५०० कोटी करण्याची मागणी.आहे. यांचा परिणाम MCX वर होईल.

धनसेरी टी, ३ टी इस्टेट वॉरेन टी कडून खरेदी करेल.
UPL ने एव्हरेस्ट क्रॉप प्रोटेक्शन संबंधातील पेटंट केस जिंकली. ही आता UPL ची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टि होईल.

M & M फायनान्सियल ने इलेक्ट्रिक थ्री व्हीलरच्या डिलिव्हरीसाठी ‘QUIKLYZ’ या व्हेईकल लिजिंग आणि सब्स्क्रिप्शन च्या व्यवसायात असलेल्या कंपनीबरोबर करार केला.

येत्या वर्षीच्या अंदाजपत्रकात Rs २.२५लाख कोटींची फर्टिलायझर सबसिडीसाठी तरतूद असण्याची शक्यता आहे. गॅसच्या किमती वाढत असल्याने खतांच्या किमती वाढत आहेत. उदा युरिया १३५%, DAP ६५%, MOP ११५% नी वाढल्या आहेत.
स्पेशालिटी रेस्टोरंट च्या व्यवस्थापनाने सांगितले की आम्ही आमच्या ‘EPISODE I ‘ ब्रॅण्डची हॉटेल पोवई आणि BKC येथे सुरू करणार आहोत. कोरोनाचे निर्बंध रद्द झाल्यावर डिलिव्हरी सेगमेंटमध्ये चांगली ग्रोथ झाली. आम्ही लग्न समारंभासाठी टॉप अप कॅटरिंग सेवा पुरवतो. अन्नधान्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे कॉस्टमध्ये वाढ झाली आहे. लंडनमधील आमच्या रेस्टारंटच्या डाइनइन सेवेला चांगला प्रतिसाद आहे. लग्न आणि सणासुदीचा हंगाम असल्यामुळे आमच्या हॉटेल्स आणि संबंधित सेवांना चांगली मागणी आहे

फिनो पेमेंट बँकेच्या शेअरमध्ये मोठी ब्लॉक डिल्स झाली.

हिंद मोटर्सने युरोपियन कंपनीबरोबर करार केला.
रेनॉल्ट ग्रुपने KPIT टेकची सॉफ्टवेअर स्केलिंग .पार्टनर म्हणून निवड केली.

आज आयनॉक्स ग्रीन या शेअरचे BSE वर Rs ६०.५० आणि NSE वर Rs ६० वर लिस्टिंग झाले. IPO मध्ये हा शेअर Rs ६५ ला दिला असल्याने हे लिस्टिंग ७% डिस्काऊंटवर झाले.

आज रेल्वे, बँका, पेपर, फर्टिलायझर, ऑटो रिअल्टी मध्ये खरेदी झाली तर मेटल्स आणि IT मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६१५१० NSE निर्देशांक निफ्टी १८२६७ बँक निफ्टी ४२७२९ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.