आजचं मार्केट – २४ November २०२२

आज क्रूड US $ ८५.१० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८१.६८ च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०५.९७ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.६८ आणि VIX १३.८० होते.

आज USA , युरोपियन आणि एशियन मार्केट्स तेजीत होती. आज USA मधील मार्केट्स थँक्स गिव्हिंग डे साठी बंद राहतील. USA मधील जॉबलेस क्लेम्सची संख्या वाढली. फेडने सांगितले की आम्ही आता दरवाढीचा वेग कमी करण्याची शक्यता आहे. फेडची पुढील बैठक १५ डिसेंबर रोजी होईल.

चीन liquidity वाढवण्यासाठी व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे. चीनने कोविड संबंधातील निर्बंध कडक केले. चीनमधील ऍपलचा प्लांट बंद होण्याचा मार्गावर आहे.

रिलायन्स जिओने पुण्यात 5G लाँच केले
G-7 देशांनी रशियन क्रूडची किंमत US $ ६५ ते ७० प्रती बॅरल दरम्यान कॅप करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय ५ डिसेम्बरपासून अमलात येईल. क्रूडची किंमत कमी झाल्याचा फायदा प्लास्टिक पाईप्स, पेंट सेक्टरमधील कंपन्यांना फायदा होईल.
आज FII ने Rs ७९० कोटींची विक्री आणी DII ने Rs ४१४ कोटींची खरेदी केली.

इंडिगो भारतातून पोर्तुगाल आणि स्वित्झर्लंड साठी १९ नवीन उड्डाणे सुरु करेल. इंडिगोने केम्पेगौडामध्ये दुसरे MRO सेंटर सुरु केले. यासाठी बंगलोर विमानतळाबरोबर २० वर्षांचा करार केला. क्रूडचा भाव कमी झाला एअर ट्रॅफिक वाढली.

कॅप्री ग्लोबल होल्डिंगने फिनो पेमेंट बँकेचे १३.१९ लाख शेअर्स (१.५८% स्टेक) Rs २२८.७० प्रती शेअर भावाने खरेदी केले.

SBI कार्ड्सच्या चीफ रिस्क ऑफिसर ने राजीनामा दिला.

HG इंफ्रा इंजिनीअरिंगने अडानी रोड ट्रान्सपोर्ट बरोबर UP मधील ६ लेनच्या १५१ किलो मीटर रोडसाठी करार केला.हे कॉन्ट्रॅक्ट Rs ४९७० कोटींचे आहे.

कॅन फिन होम्स २८ नोव्हेम्बरला अंतरिम लाभांशावर विचार करेल.

कीस्टोन रिअल्टर्स चे आज लिस्टिंग झाले . या कंपनीचे BSE आणि NSE वर Rs ५५५ वर लिस्टिंग झाले. कंपनीच्या IPO मध्ये हे शेअर्स Rs ५४१ ला दिले असल्याने माफक लिस्टिंग गेन्स झाले.

INOX ग्रीनच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर काल विक्री झाली.

झोमॅटोनी आजपासून UAE मध्ये फूड डीलिव्हरीचा बिझिनेस बंद केला.

२०२२-२३ च्या गाळप हंगामासाठी सरकार साखरेचा निर्यात कोटा वाढविण्याची शक्यता आहे. सध्याच्या ६मिलियन टनचा कोटा वाढवून १० मिलियन ते १६ मिलियन टन एवढा होण्याची शक्यता आहे असे ISMA चे म्हणणे आहे यामुळे साखरेच्या शेेेअर् मध्ये तेजी आली

टाटा कंझ्युमर्स प्रॉडक्टस ‘बिसलेरी’ Rs ६००० ते ७००० कोटींमध्ये खरेदी करण्याची शक्यता आहे. बिसलेरीच्या व्यवस्थापनाने सांगितले की आम्ही आमचा बिझिनेस विकण्यासाठी वेगवेगळ्या खरेदी करणाऱ्यांबरोबर वाटाघाटी करत आहोत. कंपनीचा काही भाग प्रमोटर्स त्यांच्याकडे ठेवतील.

डोडला डेअरीने केनयामध्ये सब्सिसिरी स्थापन केली.
ग्लेनमार्क फार्माच्या गोवा युनिटसाठी USFDA ने वार्निंग लेटर दिले.

IRDAI ने सांगितले की डिलर्सचे कमिशन वाढवण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहोत. याचा फायदा PB फिनटेकला होईल.

JK पेपरने अलीकडे हॉरीझॉन पॅक्स आणि सेकुरीपॅक्स या दोन्ही कोरूगेशनच्या क्षेत्रातील कंपन्या खरेदी केल्या. या कंपन्यांतील ८५% स्टेक JK पेपरने खरेदी केला आणि राहिलेला १५% स्टेक ते ३ वर्षांनंतर खरेदी करतील. JK पेपरच्या व्यवस्थापनाने सांगितले की या कंपन्यांच्या प्रमोटर्सच्या अनुभवाचा आम्हाला फायदा होईल.

कंपनीने लुधियाना येथे कोरुगेशनचा प्लांट सुरू केला आहे. कॉरुगेशन सेक्टर्स ६५ ते ७० लाख टन व्हॉल्यूमचा आहे. आणि या सेक्टरमध्ये कोणताही मोठा उत्पादक नाही. या कंपन्यांच्या खरेदीनंतर कंपनीचे ८ प्लांट होतील आणि उत्पादन क्षमता ३ लाख टन आणि मार्केटशेअर ३% होईल. खरेदी केलेल्या कंपन्या फायदा होत असलेल्या कंपन्या आहेत. JK पेपरच्या व्यवस्थापनाने सांगितले की आमच्या कंपनीकडे Rs १००० कोटी इंटर्नल एक्रूअल्स आहेत त्यामुळे ही खरेदी इंटर्नल एक्र्युअल्स मधून फायनान्स होईल.

अर्चण केमिकल्सने गुजरातमध्ये विकत घेतलेल्या खाणीमध्ये ब्रोमेन मिळाले. त्यावेळेला या केमिकलला भाव नव्हता. आता चीनमधून ब्रोमीन आणि इंडस्ट्रियल सॉल्ट आणि सल्फेट याना चांगली मागणी आली आहे. अर्चण केमिकल्स या दोन्ही वस्तूंचं उत्पादन किमान कॉस्टवर करतात. IPO प्रोसिड्स मधून कंपनी कर्जाची परतफेड करणार असल्यामुळे DEBT EQUITY रेशियो सुधारेल.SBI म्युच्युअल फंडाने या कंपनीत ६.४६% स्टेक घेतला

IOCL आणि CPCL बरोबर HDFC लाइफने JV केले.

१४ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२२ दरम्यान झालेल्या ल्युपिनच्या मंदिदीप युनिट १ च्या तपासणीत USFDA ने ८ त्रुटी दाखवल्या.

सोनाटा सॉफ्टवेअरने बर्म्यूडामधील ग्लोबल क्लाउड एक्स्चेंज बरोबर करार केला

TVS मोटर्सने TVS एक्सपीरियन्स सेंटर सिंगापूरमध्ये सुरु केले.

नोव्हेंबर २५ रोजी ZIM लॅबचे NSE वर लिस्टिंग होईल.

KPI ग्रीन एनर्जी ३० नोव्हेंबर रोजी बोनस इशूवर विचार करेल.

सिप्लाला गोवा फॅसिलिटीसाठी OAI (ऑफिशिअल एक्शन इंडिकेटेड) मिळाले.

FMCG, एनर्जी, बँकिंग, मेटल्स, फार्मा आणि रिअल्टी मध्ये खरेदी झाली. आज सेन्सेक्स ऑलटाइम हाय स्तरावर पोहोचले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६२२७२ NSE निर्देशांक निफ्टी १८४८४ बँक निफ्टी ४३०७५ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.