आज क्रूड US $ ८३.९० प्रती बॅरल्सच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८१.७० च्या आसपास होते. . US $ निर्देशांक १०५.६१ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.६७ आणि VIX १३.५६. होते .
आज निफ्टीने १९ ऑक्टोबर २०२१ नंतर निफ्टीचा १८६०६ चा हाय पॉईंट क्रॉस केला. आणि १८६१४ झाला आणि सेन्सेक्स ६२७०१ झाला. २७५ सेशननंतर हा पॉईंट क्रॉस केला. पण खरोखरच आनंदीआनंद.म्हणता येईल असा दिवस आहे कां ? तर त्याचे उत्तर नाही असेच द्यावे लागेल. मेजॉरिटी लोकांचे पोर्टफोलिओ तोट्यात आहेत. FII विकत असताना DII नी पैसा गुंतवला त्यामुळे आनंद वेगळा आहे.
आज FII ने Rs ३६९ कोटींची खरेदी तर DII नी Rs २९५ कोटींची विक्री केली.
USA मध्ये ब्लॅक फ्रायडेची विक्री २.३% ने वाढली. तर चीनमध्ये मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे निर्बंध जास्त कडक केले जात आहेत. लोकांनी या निर्बंधांविरुद्ध आंदोलन सुरु केले आहे. याचा चीनच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होईल.चीनमध्ये सर्व कमोडिटीचे उत्पादक आणि ग्राहक जास्त आहेत त्यामुळे कमोडिटीवर परीणाम होतील.
S & P ने FY २०२३ साठी भारताच्या GDP ग्रोथचे अनुमान ७.३% वरून ७% केले.
FY २०२४ साठी GDP ग्रोथचे अनुमान ६.५% वरून ६% केले. FY २०२३ साठी महागाईचे अनुमान ६.८% तर २०२४ साठी ५% केले.
क्रूडचा भाव कमी झाल्यामुळे महागाईचे प्रमाण कमी होईल. फिस्कल डेफिसिट कमी होईल. त्यामुळे RBI ला दिलासा मिळून दर वाढीचे प्रमाण कमी होईल.
या महिन्यातील ऑटोविक्रीचे आकडे चांगले येतील अशी अपेक्षा आहे.
चीनने रिझर्व्ह रिक्वायरमेंट मध्ये ०.२५% ची कपात केली. त्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेतील लिक्विडीटी वाढेल.
धर्मज क्रॉपचा Rs २५१ कोटींचा IPO २८ नोव्हेम्बरला ओपन होऊन ३० नोव्हेम्बरला बंद होईल. याचा प्राईस बँड Rs २१६ ते Rs २३७ असून मिनिमम लॉट ६० शेअर्सचा आहे . ५ डिसेम्बरला अलॉटमेंट तर लिस्टिंग ८ डिसेम्बरला होईल. ही एक अग्रोकेमिकल कंपनी आहे
युनिपार्ट्स इंडिआचा Rs ८३६ कोटींचा IPO ३० नोव्हेम्बरला ओपन होऊन २ डिसेम्बरला बंद होईल. इंजिनीअरिंग सिस्टीम बनवणारी कंपनी आहे. प्राईस बँड Rs ५४८ ते Rs ५७७ असून या कंपनीच्या शेअर्सची अलॉटमेंट ७ डिसेम्बरला आणि लिस्टिंग १२ डिसेम्बरला होईल.
लेमन ट्री जमशेदपूर येथे ४२ रूम्सचे हॉटेल चालू करणार असून हे सप्टेंबर २०२३ पासून ऑपरेशनला होईल.
इंडिगोला B777 हे विमान भाड्याने देण्यास ६ महिने परवानगी मिळाली.
अमी ऑर्गनिक्स ने FERMION या फिनलंडच्या कंपनीबरोबर करार केला. ही ओरियन कॉर्पोरेशनचि सबसिडी आहे.
PAYTM चे पेमेंट ऍग्रीगेटर साठी केलेले अप्लिकेशन रिजेक्ट केले.
अमेझॉननी फूड डिलिव्हरी सेवा २९ डिसेम्बरपासून बंद केली. याचा परिणाम झोमॅटोवर होईल.
१ एप्रिल २०२३ पासून १५ वर्षापेक्षा जुन्या गाड्या स्क्रॅप होतील. हा नियंम केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व खात्यांना आणि इतर सलंग्न सरकारी संस्थाना लागू होईल. यामुळे अशोक लेलँड, टाटा मोटर्स, मारुती आणि बस कंपन्यांचा फायदा होईल.
व्हीनस पाइपमधील ८.२% स्टेक BNP PARIBAS ने Rs ६५० प्रती शेअर भावाने Rs ४२ कोटींना घेतला.
हिरोमोटो कॉर्प त्यांच्या गाड्यांच्या किमती Rs १५०० ने वाढवणार आहे.
L & T फायनान्स होल्डिंग ने L & T इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट मधील १००% स्टेक विकला.यातून Rs ३४८४ कोटी मिळाले. Rs ७६४ कोटींचा कॅश बॅलन्स मिळाला.
बजाज फायनान्स SNAPWORK टेक्नॉलॉजी मधील ४०% स्टेक Rs ९३ कोटींना घेणार आहे.
मित्सुई सुमिटोमो कंपनीचा मॅक्स लाईफ इन्शुअरन्स बाकीचा (५.१७%) स्टेक Rs ८५ प्रती शेअर या भावाने खरेदी करण्यासाठी मॅक्स फायनांनशियल सर्व्हिसेसला IRDAI ने परवानगी दिली. मॅक्स फायनान्स चा शेअर तेजीत होता.
नैसर्गिक गॅस किमती संदर्भात किरीट पारेख कमिटीचा अहवाल यायचा आहे. त्याच्या शिफारशी खालीलप्रमाणे.
नैसर्गिक गॅसच्या किमतीवरील नियंत्रण पूर्णपणे हटवा. १ जानेवारी २०२६ पासून सध्याची कार्यप्रणाली बंद करा. कमाल US $ ४.७५ आणि किमान US $ ३.५० प्रती MMBTU अशा किमती ठरवा. डिफिकल्ट फिल्डच्या गॅसचा फॉर्म्युला बदलू नका.
आज, शुगर, फार्मा,रेल्वे, FMCG, फर्टिलायझर्स क्षत्रात खरेदी झाली तर मेटल्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६२५०४ NSE निर्देशांक निफ्टी १८५६२ बँक निफ्टी ४३०२० वर बंद झाले
Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !