आजचं मार्केट – २९ November २०२२

आज क्रूड US $ ८५.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८१.७० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०६.५१ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.६७ आणि VIX १३.६२ होते.

आज USA मध्ये डाऊ जोन्स आणि NASHDAQ मंदीत होते. फेड दरवाढ करणार म्हणून सोने तेजीत होते. उद्या फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांचे भाषण होणार आहे.

USA मध्ये फ्ल्यू चे प्रमाण खूपच वाढले आहे.
मोबाइल्सच्या उत्पादनात ६० लाख मोबाइल्सची कपात होणार म्हणून अँपलचा शेअर पडला मेटल आणि एनर्जी शेअर्सही पडले.फेडला सध्याच्या ४% दरावरून दर ५.२५% करायचा आहे. म्हणजे यावेळीही फेड ०.७५% एवढी दरवाढ करू शकते. त्यामुळे मार्केटने सावधगिरीचा पवित्रा घेतला.

CLSA ने त्यांचा Paytm वरील आऊटलूक अपग्रेड केला आहे. Paytmसाठी सेल ऐवजी बाय रेटिंग दिले आहे. अलीकडच्या काळात या शेअरमध्ये झालेल्या करेक्शन मुळे रिस्करिवार्ड रेशियो अनुकूल झाला आहे. Paytm च्या बॅलन्सशीटमध्ये US $१ बिलियनपेक्षा जास्त कॅश आहे.नजीकच्या भविष्यात लोन्स आणि क्रेडिट कार्ड बिझिनेस, आणि क्लाऊड यांच्यामुळे रेव्हेन्यूत वाढ होऊ शकेल. CLSA ने PRE IPO इन्व्हेस्टर्सनी त्यांचा लॉक -इन पिरियड १५ नोव्हेम्बरला संपल्यामुळे केलेल्या विक्रीमुळे Paytm च्या शेअर पडला. त्यामुळे धोका नाहीसा झाला आणि व्हॅल्युएशन रिझनेबल झाले असे सांगितले
कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने LAURUS लॅबचे रेटिंग ‘सेल’ असे डाऊनग्रेड केले. कंपनीच्या PAXLOID या प्रोडक्टसची किंमत कमी होण्याचा आणि त्यामुळे मार्जिन कमी होण्याचा संभव आहे.

त्यामुळे त्याचा EPS स्ट्रीटच्या EPS पेक्षा ३४% कमी राहील.या कोटकच्या रिपोर्टनंतर लॉरस लॅब्सचा शेअर खूपच पडला.

NBCC ला आम्रपालीच्या रखडलेल्या प्रोजेक्टससाठी Rs २७१ कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

ल्युपिनच्या ब्राझीलमधील सबसिडीअरीने ९ ब्रँडच्या उत्पादनांचे राईट्स घेतले.

NPPA ने सन फार्मा विक्री करत असलेल्या AMOXICILLIANE आणि POTASSIUM CLAVULANATE ओरल सस्पेन्शन च्या ५०MG ची किंमत Rs १६८ एवढी निश्चित केली.

HCL टेक ने S.R. टेकनिक्स बरोबर दीर्घ मुदतीचा मेंटेनन्स आणि रिपेअर्ससाठी करार केला.

RCF ने Rs १.६० प्रती शेअर एवढा अंतरिम लाभांश जाहीर केला.

टेक महिंद्राने ५ देशात 5G सोल्युशन डेव्हलप करण्यासाठी ‘AXIATA’ बरोबर MOU केले.

ब्ल्यू स्टार ने नेदरलँड्स मध्ये ‘ब्ल्यू स्टार युरोप’ ही सबसिडीअरी सुरु केली.

टाटा मोटर्स आणि इंडसइंड बँकेने ऑथोराइझ्ड डीलर्सना फायनान्सियल सोल्युशन देण्यासाठी करार केला.

झायड्स लाईफ अंबरनाथ येथील ‘वॉट्सन फार्मा’ चा API व्यवसाय Rs ४६.८ कोटींना खरेदी करणार आहे. त्यासाठी कंपनीने बिझिनेस ट्रान्सफर ऍग्रीमेंट केले.

सरकारने अमेझॉन आणि फ्लिप कार्ट यांना परवानाधारी कंपन्यांनी उत्पादन केलेल्या कीटकनाशंकांची ऑन लाईन विक्री करण्यासाठी परवानगी दिली. यामुळे स्पर्धा वाढून शेतकऱ्यांना कमी किमतीत कीटकनाशके मिळतील.

BEL S.A ला ब्रिटानिया डेअरी मधील ४९% स्टेक ब्रीटानिया Rs २९४ कोटींना विकणार अपोलो टायर्सचा शेअर आज तेजीत होता. रबराच्या किमती कमी झाल्या. रिप्लेसमेंट मार्केटमध्ये ८०% मार्केट शेअर आहे. प्रॉडक्ट मिक्स चांगले आहे. आशिया आणि भारतात ७० ते ७२ % व्यवसाय आहे.

सरकारी कंपन्यांचे शिलकी पैसे खाजगी म्युच्युअल फंडात गुंतवण्यासाठी परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

बंधन बँकेची मायक्रो फायनान्स चे कलेक्शन आणि ग्रोथ यात प्रगती आहे असे CLSA ने सांगितले.

SBI ने SBI इन्फ्रास्ट्रक्चर बॉण्ड दवारा Rs १०००० कोटी उभारले.

तामिळनाडू मर्कंटाईल बँकेने २ इन्शुअरन्स प्रॉडक्टसाठी मॅक्स लाईफ आणि चोलामंडळम जनरल इन्शुअरन्स या कंपन्यांबरोबर करार केला.

नेस्ले या कंपनीने त्यांच्या ग्रोथ रेट चे अनुमान ८% ते ८.५% एवढे केले. त्यामुळे आज शेअरमध्ये तेजी होती.

क्रूड तसेच इतर कच्च्या मालाच्या, खाद्य तेलाच्या, भाजीपाल्याच्या किमतीत घट झाली आणि मागणी वाढल्यामुळे आज FMCG कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी झाली.

उदा HUL, डाबर, मेरिको ब्रिटानिया, नेस्ले. कोलगेट
आज FMCG, गॅस,फार्मा मध्ये खरेदी झाली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६२६८१ NSE निर्देशांक निफ्टी १८६१८ बँक निफ्टी ४३०५३ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

One thought on “आजचं मार्केट – २९ November २०२२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.