आज क्रूड US $ ८२.३० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८२.७० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०३.९४ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.८२ आणि VIX १४.८६ होते.
डाऊ जोन्स NASDAQ तेजीत होते. आज दक्षिण कोरियाचे मार्केट बंद होते. USA च्या जॉबलेस क्लेम्समध्ये ९००० लोकांची वाढ झाली.
इंडोनेशियाने त्यांचे डोमेस्टिक प्रोडक्शन वाढवण्यासाठी पाम ऑईलच्या निर्यातीवर निर्बंध घातले.
रिलायन्स रिटेलची सबसिडीअरी रिलायन्स कन्झ्युमर ही ५१% कंन्ट्रोलिंग स्टेक लोटस चॉकोलेट या कंपनीत Rs ११३ प्रती शेअर या भावाने Rs ७४ कोटींना घेणार आहे. रिलायन्स कन्झ्युमर नंतर २६% स्टेकसाठी ओपन ऑफर आणेल.
क्राफ्ट्समन ऑटोमेशन ‘DR AXION INDIA ‘ या अल्युमिनियम सिलेंडर हेड मॅन्युफॅक्चर करणाऱ्या कंपनीमध्ये ७६% स्टेक Rs ३७५ कोटींना घेणार आहे.
आयशर मोटर्स युरो ५० मिलियन्सची गुंतवणूक स्पॅनिश इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनी ‘STARK FUTURE SL’ मध्ये करणार.
पुनावाला फिनकॉर्पच्या प्रमोटर्सनी २.१९% स्टेक वाढवला. आता हा स्टेक ६२.०५% झाला.
एलिन इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीच्या शेअर्सचे लिस्टिंग BSE वर Rs २४३ आणि NSE वर Rs २४४ वर लिस्टिंग झाले. हा शेअर IPO मध्ये Rs २४७ ला दिला होता.
वेलस्पन इंडियाने ‘CLEAN MAX THANOS (CTPL) मध्ये २६% स्टेक Rs ३.८ कोटींना घेतला.
HG इन्फ्राला NHAI कडून भारतमाला परियोजने अंतर्गत हरिणामधील रोड प्रोजेक्टसाठी LOA मिळाले. हा ६ लेन ग्रीनफिल्ड कर्नाल रिंग रोड आहे हायब्रीड ऍन्युइटी मोडखाली ७३० दिवसात पूर्ण करायचा आहे. याची व्हॅल्यू ९९७.११ कोटी आहे.
JOCKELS टी मध्ये २३.३% स्टेक टाटा कन्झ्युमर प्रॉडक्टसनी घेतला.
सिप्ला युरो १५ मिलियन जर्मनीच्या ‘ETHRIS’ मध्ये इन्व्हेस्ट करणार त्यामुळे त्यांचा रेस्पिरेटरी पोर्टफोलिओ वाढेल.
मेघा आणि HCC यांचे JV, BKC च्या बुलेट ट्रेन स्टेशनसाठी लोएस्ट बीडर आहेत.
SBI कार्ड्सने पंजाब & सिंध बँकेबरोबर क्रेडिट कार्ड लाँच केले.
इथेनॉल सबव्हेन्शन स्कीम अंतर्गत ३४ नव्या प्रोजेक्टला परवानगी दिली प्राज इंडिया, ग्लायकोल याना याचा फायदा होईल
सेंट्रम कॅपिटल यांच्या युनिटी स्मॉल फायनान्स बँकेला RBI कडून लायसेन्स मिळाले.
HRC च्य किंमती वाढल्या. याचा फायदा JSW स्टील हिंदाल्को यांना होईल.
स्किपरला BSNL 4G प्रोजेक्टसाठी Rs २५७० कोटींचे ऑर्डर मिळाली.
टाटा मोटर्सला फोर्डचा सानंद येथील प्लांट खरेदी करण्यासाठी रेग्युलेटरकडून परवानगी मिळाली. १० जानेवारी २०२३ पर्यंत खरेदीची प्रक्रिया पूर्ण होईल.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६०८४० NSE निर्देशांक निफ्टी १८१०५ बँक निफ्टी ४२९८६ वर बंद झाले
Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !