आज क्रूड US $ ८७ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= ८१.२०च्या आसपास होते.US $ निर्देशांक १०५.९३ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.६१ आणि VIX १३.४६ होते.
USA फेडच्या अध्यक्षांच्या भाषणात आता दर वाढण्याचा वेग कमी असेल.असे संकेत मिळाले. त्यामुळे डिसेंबरच्या फेडच्या पॉलिसीमध्ये ०.५०% दर वाढ केली जाईल असा दिलासा गुंतवणूकदारांना मिळाला.
NASHDAQ तेजीत होते तसेच डाऊ जोन्स मध्येही तेजी होती. नेटफ्लिक्स, मेटा, AFFIRM, झूम हे शेअर ६%ने वाढले. USA चे GDP ग्रोथ २.९% वाढली.
KPI ग्रीन एनर्जीने तुमच्या जवळ असलेल्या १ शेअरला १ शेअर बोनस जाहीर केला.
युरोपमधील महागाई कमी व्हायला सुरुवात झाली आहे.
चीनने सांगितले की कोरोनासाठी लावलेले निर्बंध कमी करून लसीकरण वाढवू. चीनच्या स्टेट मेडिया ने सांगितले की चीनमधील लॉक -डाऊन हळूहळू हटवला जाईल. बीजिंग मध्ये लॉक-डाऊन हळूहळू हटवला जाईल तर GUANGZHOM मधून लॉक-डाऊन पूर्णपणे हटवला.
भारताची दुसऱ्या तिमाहीत GDP ग्रोथ ६.३% झाली ( ८.४% वरून कमी झाली.). नोव्हेंबर महिन्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग PMI ५५.७ ( ५५.३ ऑक्टोबरमध्ये) होता.
विप्रोने AWS ( अमेझॉन वेब सर्व्हिसेस) वर चालणारा विप्रो डेटा इंटेलिजन्स सूट लाँच केला.
शिल्पा मेडिकेअरच्या तेलंगणा युनिट ४ ला कॅनडाच्या रेग्युलेटरी ऑथॉरिटीकडून GMP (गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस) सर्टिफिकेट मिळाले.
अडाणी पॉवरच्या DB पॉवरच्या अधिग्रहणासाठीची मुदत ३१ डिसेंबर पर्यंत वाढवली.
आज नोव्हेंबर महिन्यासाठी ऑटोविक्रीचे आकडे आले.
कॉस्मो फर्स्ट या कंपनीने Rs १०७० प्रती शेअर टेंडर ऑफर रूटने १०८ कोटींचा बायबॅक जाहीर केला. कंपनी त्याचे ३.७% शेअर बायबॅक करणार आहे. शेअर बायबॅक या कॉर्पोरेट एक्शन विषयी सविस्तर माहिती माझ्या ब्लॉग मध्ये आणि पुस्तकात दिली आहे.
बजाज ऑटोची एकूण विक्री १९% ने कमी होऊन ३.०६ लाख युनिट झाली. २ व्हीलर विक्री २३% ने तर निर्यात ३०% ने कमी झाली.
एस्कॉर्टस कुबोटाची एकूण विक्री ११.९% ने वाढली तर डोमेस्टिक विक्री १३.४% ने वाढून ७३५९ युनिट्स झाली. कंपनीने ६०१ युनिट्सची निर्यात केली.
नेलकोने टेलीसॅट (कॅनडातील कंपनी) बरोबर भागीदारी करून GMPCS ( ग्लोबल मोबाईल पर्सनल कम्युनिकेशन सर्व्हिसेस बाय सॅटेलाईट ) च्या लायसेन्ससाठी अर्ज केला
VST टिलर्स अँड ट्रॅक्टर्स ची विक्री ४.८% ने कमी झाली. एकूण विक्री २५९२ युनिट झाली. ट्रॅक्टर विक्री ५४७ युनिट झाली.
अशोक लेलँड ची एकूण विक्री ६९% ने वाढली १४५६१ युनिट झाली.डोमेस्टिक विक्री १३६५४ युनिट झाली. M & HCV ची विक्री ९४७४ युनिट तर LCV ची विक्री ५०८७ युनिट झाली.
TVS मोटर्सची एकूण विक्री २% ने वाढून २.७७ लाख झाली. मोटारसायला विक्री ४% ने वाढून १.४५ लाख तर स्कुटर विक्रीमध्ये १२% वाढ झाली. EV च्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली
येस बँकेमध्ये CARLYLE आणि ADVENT यांना ९.९९% स्टेक खरेदी करण्यासाठी परवानगी मिळाली.
टाटा मोटर्सची एकूण विक्री २१% ने वाढून ७५४७८ युनिट झाली. PV विक्री ५५% ने वाढून ४६४२५ युनिट्स झाली. CV ची विक्री १०% ने कमी होऊन २९०५३ युनिट झाली.
आयशर मोटर्सची एकूण VECV विक्री ४९०३ युनिट झाली. डोमेस्टिक विक्री ४४८३ आणि निर्यात २३७ युनिटची झाली.
मारुतीची एकूण विक्री १४.४% ने वाढून १.५९ लाख युनिट तर डोमेस्टिक विक्री १८.८% ने वाढून १.३९ लाख झाली कंपनीने १९७३३ युनिट्स निर्यात केली.
M & M ची एकूण विक्री ५८३०३ युनिट्स झाली. ट्रॅक्टर विक्री ३०५२८ (१०%), तर PV विक्री ५६% ने वाढून ३०३९२ झाली.डोमेस्टिक ट्रॅक्टर विक्री २९१८० युनिट आणि निर्यात ३१२२युनिट झाली. ३ व्हीलर विक्री १०३% ने वाढून ५१९८ युनिट झाली.
सरकार कॉम्पोझिट इन्शुअरन्स लायसेन्स इशू करण्याचा विचार करत आहे. आता इन्शुअरन्स कंपन्या लाईफ जनरल, आणि हेल्थ आणि ऍक्सिडंट इंशुअरंसच्या एकत्रित लायसन्ससाठी अर्ज करू शकतील. याचा फायदा SBI लाईफ, न्यू इंडियाLIC यांना होईल.
सिटी इंडिया डील पूर्ण करण्यासाठी ऍक्सिस बँकेला मे २०२३ पर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.
डायनामॅटिक टेक्नॉलॉजी या कंपनीच्या सबसिडीअरीने नॉर्दर्न आयर्लंड मध्ये डिटेल पार्ट्स मॅन्युफॅक्चरिंग स्पिरिट एअरोसिस्टिम बरोबर लॉन्ग टर्म करार केला.
इजी ट्रिप नूतन एव्हिएशन कॅपिटल मधील ७५% स्टेक खरेदी करणार आहे.
नोव्हेंबर महिन्यासाठी GST कलेक्शन १.४५ लाख कोटी झाले
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६३२८४ NSE निर्देशांक निफ्टी १८८१२ बँक निफ्टी ४३२६० वर बंद झाले.
Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !