आजचं मार्केट – २ डिसेंबर २०२२

आज क्रूड US $ ८६.८० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $$ १= Rs ८१.३० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.८५ USA बॉण्ड यिल्ड ३.५४ आणि VIX १३.८९ होते.

USA ची मार्केट्स माफक मंदीत होती. USA चा मॅन्युफॅक्चरिंग PMI ४९ वर होता. २०२० नंतर प्रथमच हा मॅन्युफॅक्चरिंग PMI ५० च्या खाली आला.

डिझेलवरील एक्स्पोर्ट ड्युटी Rs २.५० ने कमी केली. Rs १० वरून कमी करून Rs ७.५० केली. डोमेस्टिक क्रूड वरील विंडफॉल टॅक्स ५२% ने कमी करून Rs ४९०० केली. ( सध्या हा टॅक्स Rs १०२०० होता. )
आज FII नी Rs १५६५ कोटींची विक्री तर DII ने Rs २६६५ कोटींची खरेदी केली.

वेस्टलाइफने ५८० वरून ६३० स्टोर्स करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. नव्या स्टोर्सपैकी ६०% स्टोर्स दक्षिण भारतात सुरु केले जातील. भारतात रेव्हेन्यूचे Rs ४००० कोटींचे ते Rs ४५०० कोटींचे लक्ष्य ठेवले आहे. कंपनीने १५% ते २५% लाभांशाचा गायडन्स दिला.

पॉलिसी बाजार मधील त्यांचा ५% स्टेक सॉफ्ट बँक विकणार आहे त्यासाठी फ्लोअर प्राईस (२.५% डिस्काऊंटवर) Rs ४४० ठेवली आहे.

ब्राझीलमध्ये दुष्काळ, थंडीमुळे कॉफीचे उत्पादन कमी होईल. याचा फायदा टाटा कॉफी, CCL यांना होईल.

टाटा पॉवर १००० EV चार्जिंग स्टेशन, १ लाख सोलर पम्प्स ओडिशा मध्ये सुरु करणार आहे. टाटा पॉवर एनर्जीने २५५ MV सोलर विंड हायब्रीड प्रोजेक्टसाठी ऑक्शन जिंकले.

IEX वर कार्बन क्रेडिट मार्केट सुरु होईल.

NCR मध्ये फक्त E -ऑटो/CNG वाहने रजिस्टर करायची यामुळे अतुल ऑटोला फायदा होईल.

तालब्रोस या कंपनीला Rs ४२० कोटींची ऑर्डर मिळाली.

MOIL चे मँगेनीज ओअरचे उत्पादन ६०% नी आणि विक्री ८२% ने वाढली.

गोदरेज प्रॉपर्टीजने मुंबईमध्ये १८ एकर जमीन खरेदी केली

SJVN ने ओडिशा ग्रीड कॉरपोरेशन बरोबर हायड्रो आणि सोलर प्रोजेक्टसाठी JV केले.

ऑरोबिंदो फार्माच्या URSODIOL या औषधाला USFDA ची मंजुरी मिळाली.

NLC ने हायड्रोजन प्रोजेक्ट साठी ग्रीड कॉर्पोरेशनबरोबर करार केला. त्यामुळे NLC चा शेअरमध्ये तेजी होती.

झायड्स लाईफच्या ESTRADIOL TRANSDERMAL सिस्टीम ला USFDA कडून मंजुरी मिळाली.

अमर राजा बॅटरी ने लिथियम आयन बॅटरी उत्पादन युनिट लावण्यासाठी तेलंगणा सरकारबरोबर MOU केले. हे युनिट हैद्राबादमध्ये Rs ९५०० कोटींची गुंतवणूक करून उभारले जाईल.

PVC रेसिनच्या किमतीत ४३% घट झाल्यामुळे PVC पाईप्स बनवणाऱ्या कंपन्यांचा उत्पादन खर्च कमी होईल. याचा फायदा ASTRAL, प्रिन्स पाईप्स, फिनोलेक्स इंडस्ट्रीज यांना होईल.

सरकारने खत उत्पादक कंपन्यांना शेतकऱ्यांना नैनो युरियाचा वापर करण्यासाठी उत्तेजन द्यायला सांगितले आहे. यामुळे शेतकऱ्यांची Rs ४१ प्रती बॅग बचत होईल. RCF NFL यांना फायदा होईल

जानेवारी २३ पासून मारुती त्यांच्या उत्पादनात ( पॅसेंजर व्हेईकल) दरवाढ करण्याची शक्यता आहे.
HEINKIN त्यांच्या बिअर प्रॉडक्टसच्या किमती भारतात वाढवणार आहे. याचा फायदा युनायटेड ब्रुअरीजला होईल.

बजाज हिंदुस्थानने सांगितले की त्यांनी सर्व थकबाकीचे पेमेंट केले. आता आमच्या खात्यावर कोणतेही ओव्हरड्युज नाहीत. त्यामुळे शेअर अपर सर्किटवर गेला

NMDC च्या नागरनार प्लांटसाठी बीड देण्याची तारीख २७ जानेवारी २०२३ निश्चित केली.

आज ऑटो , IT, फार्मा, FMCG, या क्षेत्रातले शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. मेटल्स , मिडकॅप आणि स्मॉल कॅप विशेषतः टायर, साखर, प्लास्टिक पाईप्स आणि नवीन लिस्टिंग झालेल्या उदा :NYKAA, PB फिनटेक, Paytm मध्ये खरेदी झाली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६२८६८ NSE निर्देशांक निफ्टी १८६९६ बँक निफ्टी ४३१०३ वर बंद झाले..

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.