आज क्रूड US $ ८४.८० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८१.७० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०२.३० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.५४ आणि VIX १६.९६ होते.
IMF ( इंटरनॅशनल मॉनेटरी फंड) ने ग्लोबल अर्थव्यवस्थेच्या ग्रोथचे अनुमान २.९% केले आहे. ८४% देशांमध्ये महागाईचा दर कमी होईल. USA मध्ये IT, सेमी कंडक्टर चिप शेअरमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
आज सोने, चांदी आणि इतर बेस मेटल्समध्ये मंदी होती
FII ने Rs ६७९२.८० कोटीची विक्री तर DII ने Rs ५५१२.६३ कोटींची खरेदी केली.
भारतीय बॉण्ड यिल्ड वाढले. कारण गुंतवणूकदार सावध झाले. समोर उभे ठाकलेले अंदाजपत्रक आणि राज्य सरकारांनी वाढीव कर्जाची मागणी केली आहे. त्यामुळे बॉण्ड यिल्ड ७.४००४% झाले.
टाटा पॉवरने ‘CONTOUR’ बरोबर पार्टनरशिप केली. ‘CONTOUR’ हे डिजिटल ट्रेड फायनान्स नेटवर्क आहे.
सन फार्माचे प्रॉफिट वाढले रेव्हेन्यू वाढला. Rs ७.५० प्रती शेअर लाभांश दिला
अडाणी पोर्ट आणि अंबुजा सिमेंट यांचा Rs ३००० कोटींचा शेअर बायबॅक आणण्याच्या विचारात अडानी ग्रुप आहे.
IFB चा तोटा कमी झाला. महागाईमुळे वॉशिंग मशीन आणि एअर कंडिशनर यांचि मागणी कमी झाली. पण व्हाइट गुड्स आणि ऑटोमोटिव्ह ऍप्लिकेशन्स च्या साठी ज्या मोटर्स बनवल्या जातात तो व्यवसाय तेजीत राहिला. इंजिनीअरिंग विभागात प्रॉफिट चांगले झाले.
REC ने सांगितले की त्यांचा फायदा ५.१% वाढला. खर्च कमी केला.
IIFL चे प्रॉफिट ३७% ने आणि रेव्हेन्यू १८% ने वाढले. GNPA ०.३०% ने आणि NNPA ०.१०% ने कमी झाले.
KEC इंटरनॅशनलला Rs ११३१ कोटींच्या नवीन ऑर्डर्स मिळाल्या.
LARAUS लॅबने गेल्यावेळी रेव्हेन्यू गायडन्स कमी केला तर यावेळी मार्जिन गायडन्स कमी केला.
धामपूर शुगरला शुगरमध्ये तोटा पण एथॅनॉलमध्ये ५९% नफा झाला साखरेच्या किमती आंतरराष्ट्रीय मार्केट्समध्ये US $ ०.२१ इतकी झाली. यावेळी शुगर आणि इथेनॉल दोन्हीमधून फायदा होण्याची शक्यता आहे.
फ्युजन मायक्रो, मंगलोर केमिकल्स, कन्साई नेरोलॅक, निपॉन लाईफ यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
VIP इंडस्ट्रीज चे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. विक्रीत चांगली वाढ झाली. त्याच प्रमाणे ग्रॉस मार्जिन मध्ये वाढ वन टाइम प्रोव्हिजनमुळे आणि वाढत्या जाहिरात खर्चामुळे ऑपरेटिंग मार्जिनवर थोडा परिणाम झाला. ग्राहकांचा प्रीमियम लग्गेजसाठी वाढती आवड, असंघटीत सेक्टरकडून कंपनीकडे मार्केट शेअर येत आहे. कंपनीची स्वतःची उत्पादनक्षमता आहे आणि हार्ड लगेजला अग्रक्रम दिला जात आहे.
L & T ने गायडन्स खूप चांगला दिला.
LIC नी त्यांची अडाणी ग्रुपमध्ये किती गुंतवणूक केली आहे आणि ती फायद्यात आहे असे सांगितले.
कन्साई नेरोलॅक ने त्यांची ठाणे येथील २४ एकर जमीन Rs १५५ कोटींना विकली.
आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कोळशाची मागणी कमी झाली किंमत US $ २६६/टन झाली थंडीचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी आहे.
ज्युबिलण्ट इंग्रेव्हियाचे प्रॉफिट, उत्पन्न कमी झाले.
NIIT चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
गोदरेंज कंझ्युमर्सचे प्रॉफिट वाढते उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
वेदांताचा तामिळनाडूमधील कॉपर स्मेल्टिंग प्लांट पुन्हा सुरु करण्यासाठी लोकांशी बोलणी सुरु करणार आहे. कंपनीने हा स्मेल्टर प्लांट विकण्याची योजना स्थगित केली.
अडाणी पोर्ट ने २७ जानेवारी रोजी प्रमोटरचा आणखी ०.५६ % स्टेक तारण म्हणून ठेवले
गोदरेज प्रॉपर्टीजने महाराष्ट्रामध्ये खालापूर येथील ८९ एकर जमीन हौसिंग प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी घेतली.
MCX वर कॉटन मध्ये वायदा ट्रेडिंग फेब्रुवारी २०२३ मध्ये सुरु होण्याची शक्यता आहे.
ल्युपिनच्या HIV वरील औषधाला USFDA ने मान्यता दिली.
हेस्टर बायोसायन्सेस चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले
सेंचुरी चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन कमी झाले.
अपार इंडस्ट्रीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले प्रॉफिट आणि उत्पन्नात लक्षणीय वाढ झाले. शेअर अपर सर्किटला जाऊन बंद झाला.
IOC तोट्यातून फायद्यात आली. प्रॉफिट उत्पन्न आणि मार्जिन वाढली.
ऑटोमोटिव्ह ऍक्सलचे निकाल चांगले आले.
GNA ऍक्सल्स चे प्रॉफिट उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
BASF ची प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न कमी झाले.
MOIL चे प्रॉफिट उत्पन्न कमी झाले. कंपनीने Rs ३ इंटरींम लाभांश दिला..
कॉर्बोरॅण्डमचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
वेस्टलाइफचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सप्लायचेनमध्ये सुधारणा झाली आहे.पण फेडनी जर दर खूपच वाढवले तर अडचणी वाढतील. विकसित देशात मंदी येण्याची शक्यता व्यक्त होत असल्यामुळे भारतात गुंतवणुक येत आहे
रिअल ग्रोथचे FY २०२४ साठी अनुमान ६.५% तर २०२३ साठी ७.०० % केले आहे. नॉमिनल ग्रोथचे अनुमान ११% केले आहे. येत्या आर्थीक वर्षात इम्पोर्ट बिल वाढेल तर निर्यात कमी होईल.
आज एनर्जी, इन्फ्रा, मेटल्स, रिअल्टीमध्ये खरेदी झाली. फार्मा, आणि IT मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९५५० NSE निर्देशांक निफ्टी १७६६२ आणि बँक निफ्टी ४०६५५ वर बंद झाले
Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !