आजचं मार्केट – ०९ जानेवारी २०२३

आज क्रूड US $ ७९.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८२.३० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०३.६२ तर USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.५६ आणि VIX १४.९७ होते.

USA मधील तिन्ही निर्देशांक तेजीत होते. USA चा जॉब डेटा पगारातील वाढीचा वेग कमी होत आहे असे दाखवतो. ह्या रिपोर्टप्रमाणे जॉब मार्केट अजूनही रोबस्ट आहे. त्यामुळे फेड कमी आक्रमकपणे दरवाढ अमलात आणेल अशी शक्यता आहे.

युरोपियन मार्केट्समध्ये खाण आणि ऑइल उद्योगातील शेअर्समध्ये तेजी होती. युरोपियन मार्केट्स तेजीत होती

सोने आणि चांदीमध्ये तेजी होती.याचा फायदा CSB बँक, फेडरल बँक, कल्याण ज्वेलर्स टायटन, थंगमायल ज्वेलरी, यांना होईल. याबरोबरच कॉपर झिंक आणि अल्युमिनियम या बेस मेटल्समध्ये तेजी होती.

ग्लोबल संकेत चांगले होते. जपानची मार्केट्स बंद राहतील.

FII ने Rs २९०२.४६ कोटींची विक्री केली तर DII ने १०८३.१७ कोटींची खरेदी केली.

आज TCS त्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करेल.

आदित्य बिर्ला फॅशन आणि रिटेल १३ जानेवारी किंवा त्यानंतर रिडिमेबल NCD द्वारे प्रायव्हेट प्लेसमेंट रूटने Rs ५०० कोटी उभारेल.

ग्लॅन्ड फार्माच्या सिंगापूर सबसिडीअरीने FPCI सिनो फ्रेंच फंड आणि इतरांबरोबर CENEXI आणि CENEXI होल्डिंग मधील १००% स्टेक घेण्यासाठी शेअर पर्चेस अग्रीमेंट केले.

JK सिमेंटची सबसिडीअरी JK पेन्ट्स आणि कोटिंग्जने Rs १५३ कोटींना ऍक्रो पेन्ट्स मधील ६०% स्टेक घेतला.

नॅशनल फर्टिलायझर्स या कंपनीने डिसेंबर २०२२ पर्यंत विक्रीमध्ये २७% YOY वाढ केली. कंपनीने ४९.७१ लाख MT एवढी खतांची विक्री केली. गेलेल्या वर्षी ह्या पिरियडमध्ये ३९.२५ लाख MT होती.

ODP कॉर्पोरेशनने HCL टेक ला एन्ड टू एन्ड IT ऑपरेशन्स आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सर्व्हिसेस ODP बिझिनेस सोल्युशन्स आणि VEYER बिझिनेस युनिटला पुरवण्यासाठी करार केला.

मध्य पूर्वेतील एमिरेट्स NBD आणि प्रेम वत्स यांच्या कॅनडामधील FAIRFAX ग्रुपने IDBI बनतील मेजॉरिटी स्टेक साठी EOI ( एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट) दिली आहेत.

टाटांची एकूण विक्री तिसऱ्या तिमाहीत १२% YOY वाढली. कंपनीने १११ नवीन रीतील स्टोर्स सुरु केली. तर तिसऱ्या तिमाहीत २२ रिटेल स्टोर्स सुरु केली. कंपनीचा ज्वेलरी बिझिनेस ११% ने वाढला.

टाटा स्टीलचे डोमेस्टिक प्रॉडक्शन ४.२% ( QOQ) वाढून ५ मिलियन MT आणि डिलिव्हरी व्हॉल्युम्स ३.६% ने वाढून ४.७३ मिलियन टन झाले.

यूरोपमधील उत्पादन ६.२५% ने कमी होऊन २.२५ मिलियन टन आणि डिलिव्हरी व्हॉल्युम्स ४.८% ने वाढून १.९६ मिलियन टन झाले.

बायोकॉन ने बायोसिमिलर इन्शुलिन साठी अर्ज केला पण डेटा कमी आहे म्हणून पुन्हा अर्ज करावा लागेल.
भारत ऍग्री आणि फर्टिलायझर ही कंपनी ठाण्यात माजिवडा येथे रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स डेव्हलप करणार आहे.

Paytm चे MD आणि CEO म्हणून सुरिंदर चावला यांची नेमणूक झाली.

ICICI प्रु चे डिसेंबर महिन्यासाठी न्यू बिझिनेस प्रीमियम ५.४% नं वाढून Rs १४५५ कोटी झाले.

बंधन बँकेचे ऍडव्हान्सेस २७% ने वाढून Rs ८७९९८ कोटी तर डिपॉझिट्स २१% ने वाढून Rs ८४५०० कोटी झाली. पण CASA रेशियोमध्ये घट झाली.

अजमेरा रीलॅटीज ची विक्री १९% ने वाढून Rs १२८ कोटी तर कार्पेट एरिया विक्री २% ने वाढून ६३५९५ SQ FT झाली तर कलेक्शन ४०ने वाढून Rs ११६ कोटी झाले.

TVS ने ‘मेट्रो प्लेस ११०’ बांगलादेशमध्ये लाँच केली.
M & M ने ‘THAR’ ची नवीन रेंज लाँच केली. या रेंजमध्ये किमान किंमत Rs ९.९९ लाख आहे.

HDFC लाईफचे प्रीमियम मध्ये ७.४% घट तर APE २३% ने वाढले.

ऐशियन पेन्ट्सच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने नवीन वॉटर बेस्ड कलर प्लांटसाठी मंजुरी दिली.

HI TECH पाईप ही कंपनी UP मध्ये स्टील उत्पादन प्लांट लावण्यासाठी Rs ५१० कोटींची गुंतवणूक करणार आहे.

‘SHELF DRILLING’ ला ONGC कडून नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

PVR ने ३ नवीन मल्टिप्लेक्सेस सुरु केले. जयपूर आणि बंगलोर मध्ये सुरु केले.

अल्ट्रा कॅब ला टाटा पॉवर कडून Rs २२.८८ कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

बेस्ट ऍग्रो लाईफ ला स्वदेशात PROPAQUIZOFOP टेक्निकल आणि CYHALOFOP BUTYL टेक्निकलच्या उत्पादनासाठी लायसेन्स मिळाले.

RBI ने डिजिटल रुपयात १.६० लाखांचे व्यवहार झाले . आता आणखी ४ बँकांना समाविष्ट केले जाईल. बँक ऑफ बरोडा, युनियन बँक, HDFC बँक आणि कोटक महिंद्रा बँकेचा समावेश होईल. आणखी ८ शहरात डिजिटल रुपयाचे व्यवहार करण्यासाठी मंजुरी मिळाली.

Paytm चे GMV ३८% ने वाढून Rs ३.४६ लाख कोटी झाले. कंपनीने डिसेंबर २०२२ मध्ये Rs ३६६५ कोटी लोन दिली. लेन्डिंग बिझिनेस मध्ये ३५७% ग्रोथ (YOY) झाली.तिसऱ्या तिमाहीत टोटल लोन Rs ९९५८ कोटी दिली.

GHCL ला सोडा ASH उत्पादन क्षमता ११ लाख टनांवरून १२ लाख टन करण्यासाठी रेग्युलेटरची मंजुरी मिळाली.

एप्रिल २०२२ ते डिसेंबर २०२२ या काळात i-फोनची भारतातून निर्यात US $ २५० कोटी झाली.

टाटा मोटर्सचे JLR विक्रीचे व्हॉल्युम १५% ने वाढले रिटेल व्हॅल्यूम ५.९% ने वाढले

गरुड एअरस्पेस ने रॅलीज इंडियाबरोबर करार केला.

आज IT, मेटल्स, फार्मा, इन्फ्रा, ऑटो, FMCG, PSE, बँका आणि रिअल्टी क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६०७४७ NSE निर्देशांक निफ्टी १८१०१ बँक निफ्टी ४२५८२ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.