आज क्रूड US $ ७९ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८१.९० च्या आसपास होते.US $ निर्देशांक १०२.९९ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.५४ आणि VIX १५.८८ जिंदाल होते.
सेंट फ्रान्सिस्को आणि अटलांटामधील अधिकाऱ्यांनी सांगितले की ५% पेक्षा जास्त व्याजाचे दर वाढू शकतात. एनर्जीच्या किमती कमी होऊ लागल्या आहेत.
आज FII ने Rs २०३ कोटींची विक्री तर DII नी Rs १७२३ कोटीची खरेदी केली.
स्टार हेल्थ या कंपनीच्या ग्रॉस डायरेक्ट प्रीमियममध्ये १३% वाढ झाली. Rs ७७७४ कोटींवरून Rs ८७५२ कोटी झाला. रिटेल हेल्थ प्रीमियम १९% वाढून Rs ८०४५ कोटी झाला. ग्रुप हेल्थ प्रीमियम मात्र ३८% कमी झाला. पर्सनल ऍक्सिडंट प्रीमियम २३% ने वाढून Rs १३३५ कोटी झाला.
IRB इन्फ्रा आणि कंपनीचं InVit मिळून टोल कलेक्शन २% वाढून Rs ३८८ कोटी झाले. ( २९४ कोटी होते.)
टाटा मोटर्सची JLR होलसेल विक्री १५% ने तर रिटेल विक्री ५.९% ने वाढली. विक्री चीन आणि यूरोपमध्ये कमी झाली तर नॉर्थ USA आणि UK मध्ये वाढली. JLR चे ऑर्डर बुक Rs २.१५ लाख युनिट्स एवढ्या रेकॉर्ड स्तरावर होते.
TCS ने सांगितले की क्लाउड सायबर सिटी अलोकेशन मध्ये चांगली ग्रोथ आहे. यूरोपमध्ये सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे. UK आणि USA मधील बिझिनेस बाबत सावध आहोत. परंतु आऊटलूक निराश नाही.
सोना BLW ही कंपनी MM वेव्ह रडार सेन्सर परसेप्शन सोल्युशन पुरवणाऱ्या सर्बियन कंपनी ‘NOVELIC DOO BEOGARD’ या कंपनीत ५४% स्टेक युरो ४.०५ कोटींना घेतला.
ल्युपिन च्या ‘NAMUSLA’ साठी स्पेन सरकारकडून मंजुरी मिळाली.
तांदुळाच्या निर्यातीवरील निर्बंध सरकार हटविण्याची शक्यता आहे. याचा फायदा चमनलाल सेठिया KRBL
बर्ड फ्लू साठी हेस्टर बायोचे औषध परीणामकारक आहे.
CYIENT DCM च्या Rs ७४० कोटींच्या IPO साठी अर्ज दिला.
जिंदाल वर्ल्ड वाईड अहमदाबादमध्ये संपूर्णपणे ऑटोमेटेड बॅटरी EV २ व्हीलर चा उत्पादन प्लांट सुरु करणार आहे याची वार्षिक क्षमता २.५लाख युनिट एवढी असेल.
झायडस लाईफच्या ‘ FEBUXOSTAT ‘ टॅबलेट्स ला USFDAची मंजुरी मिळाली.
ओडिशा, झारखंड छत्तीसगढ आणि पश्चिम बंगाल मधील १३२ कोळशाच्या खाणींचा लिलाव होणार आहे.
PSP प्रोजेक्टला Rs १३४४ कोटीचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.
कोल इंडियाने MOD ( माईन डेव्हलपर कम ऑपरेटर मोड) तत्वावर ८ प्रोजेक्टसाठी LOA जारी केले.
श्रीराम ऍसेट मॅनेजमेंट कंपनीने कार्तिक जैन यांची MD &CEO यांची नेमणूक केली. हा शेअर अपर सर्किटला गेला.
PVR चे सोमवारपर्यंत ९०० स्क्रीन होते. आणखी Rs ३०० कोटी गुंतवून पुढील महिन्यात आणखी १०० स्क्रीन चालू करणार. FY २४ च्या अखेरपर्यंत एकूण १००० स्क्रीन होतील.
TCS च्या स्पेशल आणि इंटरीम लाभांशाची रेकॉर्ड डेट १७ जानेवारी असून ३ फेब्रुआरीपर्यंत हा लाभांश तुमच्या खात्यात जमा होईल.
भारती एअरटेलने भुवनेश्वर कटक राउरकेला या शहरात 5G लाँच केला.
आज मिडकॅप स्मॉल कॅप तसेच IT आणि बँकांच्या शेअर्समध्ये प्रॉफीट बुकिंग तर OMC मध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६०११५ NSE निर्देशांक निफ्टी १७९१४ बँक निफ्टी ४२०१४ वर बंद झाले.
Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !