आजचं मार्केट – ११ जानेवारी २०२३

आज क्रूड US $ ७९.३६ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८१.५० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०३.०१, USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.५८ आणि VIX १५.६१ होते.

चीनची अर्थव्यवस्था ओपन होत असल्यामुले क्रूडसाठी मागणी वाढली. त्यामुळे क्रूडचे दर पुन्हा US $ ८० प्रती बॅरलच्यावर गेले.चीन कॉपरची उत्पादक आणि ग्राहक आहे.

कॉपरच्या किमती ९% ने वाढल्या आहेत याचा फायदा हिंदुस्थान कॉपर, हिंदाल्को यांना होईल .

FII ने २१०९.३४ कोटींची विक्री तर DII ने १८०६.६२ कोटींची खरेदी केली. अडानी पोर्टने इस्राएलच्या सरकार कडून हैफा पोर्ट कंपनीचे US $४ १.१८ बिलियनमध्ये ऍक्विझिशन पूर्ण केले. या काँट्रॅक्टचा कन्सेशन पीरियड २०५४ पर्यंत आहे.
PC ज्वेलर्स या कंपनीने डोमेस्टिक टर्नओव्हर Rs ८२९.१० कोटी एवढा केला. ह्यात YOY ( Rs ६००.१८) ३८% पेक्षा जास्त ग्रोथ झाली. बिहारमध्ये कटिहार येथे नवीन फ्रॅंचाईजी शोरूम सुरु केली.
उत्तम शुगर या कंपनीने त्यांच्या बरकतपूरच्या इथेनॉल डिस्टिलरी प्लांटची क्षमता १५० KLPD वरून २५० KLPD केली. क्रेन क्रशिंग क्षमता २३७५०TCD वरून २६२३० TCD केली.यासाठी Rs ५६ कोटींची गुंतवणूक करणार.

टाटा मोटर्सची सबसिडीअरी टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी यांनी फोर्ड इंडियाच्या सानंद येथील प्लांटचे (जमीन इमारती प्लांट आणि मशिनरी) ऍक्विझिशन Rs ७२५.७० कोटींमध्ये केले .

क्युपिडला UNO पॉप्युलेशन फंडाकडून मेल कंडोम आणि वॉटरबेस्ड ल्युब्रिकंट्स साठी Rs ५.२१ कोटींची ऑर्डर मिळाली. ही ऑर्डर जून २०२३ पर्यंत पूर्ण करायची आहे.

ब्राझीलमधील अस्थिर परिस्थितीमुळे कॉफी आणि साखर यांच्या उत्पादन/ निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. याचा फायदा टाटा कॉफी, CCL प्रॉडक्टस आणि साखर उत्पादक कंपन्यांना होईल.
सोन्याचा भाव वाढला. ग्लोबल संकेत चांगले होते. आशियातील मार्केट्स तेजीत होती.

फेडचे अध्यक्ष पॉवेल यांनी सांगितले की ग्रीन एनर्जी अर्थव्यवस्था प्रमोट करणे हे फेडचे काम किंवा लक्ष्य नाही. फेड ग्रीन एनर्जी मिनिस्ट्री म्हणून काम करत नाही.एका मर्यादेत आम्ही ग्रीन एनर्जी लक्षात ठेवून काम करू. फेडला महागाई काबूत आणण्यासाठी काही लोकप्रिय नसलेले निर्णय घ्यावे लागतील. फेड ही एक स्वायत्त संस्था म्हणूनच काम करेल. रिलायन्स जिओने ४ राज्यात ७ शहरात 5G लाँच केले.

संरक्षण मंत्रालयाने एकूण Rs ४३०० कोटींचा खर्च मंजूर केला. यात हेलिना अँटी टँकर गाईडेड मिसाईल्स आणि नेव्ही साठी ब्रह्मोस लाँन्चरचा समावेश आहे. याचा फायदा BDL HAL आणि संरक्षण क्षेत्रातील इतर कंपन्यांना होईल.डेटा पॅटर्न्स BEL

अडानी विल्मरने सांगितले की त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागात प्रवेश केल्याचा फायदा होत आहे. सर्व प्रकारच्या खाद्य तेल आणि फूड बिझिनेसमध्ये चांगली ग्रोथ आहे तसेच कंपनीचा मार्केट शेअर वाढत आहे.

भारत पे ला RBI कडून पेमेन्ट अग्रीगेटरच्या लायसेन्ससाठी इन-प्रिंसिपल अप्रूव्हल मिळाले.

आज जॉन्सन आणि जॉन्सन च्या बेबी पॉवडर संबंधित केसचा निर्णय हायकोर्ट देईल.

सिगाची या कंपनीने १.१ कोटी कॉन्व्हॅटिबल बॉण्ड्स Rs २८५ दराने इशू केले. कंपनीच्या शेअरची CMP Rs ३३८ आहे.

करनेक्स मायक्रोने प्रमोटर्सना Rs २६६ प्रती शेअर या भावाने शेअर दिले. शेअरचा भाव Rs २८५ चालू आहे. पण प्रमोटर्सना दिलेले शेअर अन सब्सक्राइबड राहिले.

मार्केट मंदीत असल्यामुळे जरी ब्रोकर हाऊसेसच्या ग्राहकांची संख्या वाढत असली तरी ब्रोकिंग हाऊसेसचे निकाल निराश करतील कारण या ग्राहकांमध्ये ऍक्टिव्ह ग्राहकांची संख्या कमी झाली आहे.

BSE वर कॉर्पोरेट बॉण्ड निर्देशांकामध्ये फ्युचर काँट्रॅक्टस लाँच करायला सेबीने परवानगी दिली.
सन फार्माने ‘PALENO’ हे कॅन्सरवरचे औषध भारतात लाँच केले.

CCI ने गूगलला केलेल्या Rs १३३७ कोटींच्या दंडाविरुद्ध कंपनीने केलेल्या अर्जाची सुनावणी १६ जानेवारीला सुप्रीम कोर्टात होईल.

ऑरोबिंदो फार्माच्या ‘जडचेर्ला’ या ओरल सॉलिड डोसेज बनवणाऱ्या युनिटची तपासणी USFDA ने सुरु केली.

मार्कसन फार्माने ‘ORBIMED आशिया’ ला कॉन्व्हर्टिबल वॉरंटस जारी केली.

हिंदाल्को NCD द्वारा Rs ७०० कोटी उभारणार आहे.

RVNL ला चेन्नई मेट्रोकडून ११३४.१० कोटींच्या ऑर्डरसाठी LOA मिळाले.

रुपे कार्ड वरील लो व्हॅल्यू UPI ट्रॅन्झॅक्शनसाठी सरकारने Rs २६०० कोटींची तरतूद केली.

जिओने उत्तरांचलमध्ये 5Gलाँच केले.

JP मॉर्गनने भारती एअरटेल चे रेटिंगओव्हरवेट वरून अंडरपरफॉर्म डाऊनग्रेड केले आणि टार्गेटही कमी केले. टेलिकॉम कंपन्या ग्राहकांसाठी दर वाढवू शकणार नाहीत. तसेच या क्षेत्रात स्पर्धेला तोंड देणे दिवसेंदिवस कठीण होणार आहे, भारती एअरटेलच्या शेअरमध्ये आज प्रॉफिट बुकिंग झाले.

झीरोधाने RBL बँकेमध्ये १.२६% स्टेक वाढवला.

JBM ऑटोने सेल्फडिझाईन्ड आणि सेल्फ मॅन्युफॅक्चर्ड इलेक्ट्रिक लक्झरीकोच गॅलॅक्सि त्याच बरोबर E -BUS, स्कूल बस ऑटो एक्स्पोमध्ये सामील केली.

ग्रीव्हज कॉटन ने ऑटो एक्स्पो मध्ये टू व्हीलर थ्री व्हीलर इलेक्ट्रिक व्हेईकल AMPERE या ब्रॅण्डखाली लाँच केली

मारुतीने कॉनसेप्ट EV SUV eVX ऑटो एक्स्पोमध्ये लाँच केले.

THERANICA या इझ्राएल डिजिटल थेरॅपी कंपनीने NERIVIO या मायग्रेन पेनवरच्या औषधाच्या मार्केटिंग आणि डिस्ट्रिब्युशनसाठी DR रेड्डीजबरोबर लायसेन्स आणि सप्लाय अग्रीमेंट केले.

मॉन्टेकार्लोची विक्री १२% ने वाढली आणि कंपनीने ग्रोथ गायडन्स २०% ते २५% ठेवला.

आज PSU बँका, मेटल्स IT मध्ये खरेदी तर FMCG एनर्जी आणि फार्मा सेक्टरमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६०१०५ NSE निर्देशांक निफ्टी १७८९५ बँक निफ्टी ४२२३२ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.