आजचं मार्केट – १२ जानेवारी २०२३

आज क्रूड US $ ८२.८० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८१.७० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०३.१४ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.५५ आणि VIX १५.६७ होते.

USA ची मार्केट्स तेजीत होती. एनर्जीच्या किंमत कमी झाल्या, क्रूडची किंमतही कमी झाली. USA महागाईचे आकडे कमी येतील या अंदाजाने मार्केटमध्ये तेजी होती. चीनचा CPI १.८ (१.६ ) आणि PPI ०.७० कमी झाला .

FII नी Rs २२०८ कोटींची विक्री तर DII ने Rs २४३० कोटींची खरेदी केली.

सोन्याची आयात कमी झाली.

स्टोव्हक्राफ्ट चे CEO नितीन मेहतांनी राजीनामा दिला.

रिलायन्स जिओ कोईम्बतूर, मदुराई, तिरुचिरापल्ली, सालेम, वेलोर येथे 5G पुरवण्यासाठी Rs ४०४४६कोटींची गुंतवणूक तामिळनाडूमध्ये करणार.
अडानी ग्रुप मध्य प्रदेशात Rs ६००००/-कोटींची गुंतवणूक करणार.

NYKAA ब्लॉक डील रूटने १.४२ कोटी शेअर्स Rs १४८.९० प्रती शेअर या भावाने विकून Rs २१२ कोटी उभारणार.

SBI ने २ वर्षांसाठी CHALA श्रीनावासुलु सेटटी यांची टर्म वाढवली.

रूट मोबाईलने श्री लंकेच्या LMO (लिडिंग मोबाईल नेटवर्क ऑपरेटर) बरोबर SMS फायरवॉल सोल्युशन आणि कनेक्टिव्हीटी सर्व्हिस अग्रीमेंट केले. कंपनी तिच्या नेटवर्कवर येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय A2P SMS साठी एन्ड टू एन्ड A2P मॉनेटायझेशन SUIT पुरवेल. रूट मोबाईल MNO बरोबर २ वर्ष एक्सक्ल्युझिव्ह पार्टनर म्हणून काम करेल.
5 पैसा. कॉम चे प्रॉफिट २.५% ने तर रेव्हेन्यू ५.३% ने वाढला.

IIFL १९ जानेवारीला चौथा लाभांश आणि शेअर स्प्लिटवर विचार करेल.

कंटेनर कॉर्पोरेशनच्या डायव्हेस्टमेन्टच्या प्रक्रियेला वेग येणार.

ITI ला केरळ सरकारकडून Rs २५ कोटींची ऑर्डर मिळाली

मोंन्टे कार्लो ची विक्री १२% ने वाढली.

ऍक्शन कंस्ट्रक्शनला .संरक्षण खात्याकडून स्पेशल मोबाईल क्रेनसाठी ऑर्डर मिळाली.

सौदी अरेबीयाच्या किंग फैसल हॉस्पिटल बरोबर मास्टेकनी करार केला.

शिवा सिमेंटच्या क्लिंकर युनिटला पर्यावरणासाठी ग्रीन नॉड मिळाला.

शहा पॉलिमर या कंपनीचे BSE वर Rs ८५ आणि NSE वर Rs ८५ वर लिस्टिंग झाले हा शेअर IPO मध्ये Rs ६५ ला दिला असल्याने ज्यांना शेअर्स अलॉट झाले त्यांना चांगला लिस्टिंग गेन झाला.
पेट कोक आणि कोळसा यांच्या किमती २१% ने कमी झाल्या याचा फायदा सिमेंट उत्पादक कंपन्यांना होईल. म्हणून सिमेंट उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी झाली.

AXIS बँक मॅक्स लाईफ मध्ये आणखी ७% स्टेक Rs ८५ प्रती शेअर या भावाने खरेदी करण्याचा प्रस्ताव IRDAI ला देन्याची शक्यता आहे. IRDAI ने फेअर मार्केट युनिफॉर्म प्राईस जरुरी असल्याचे सांगितले. आता हे डील Rs ११३९ कोटींचे होईल

ANTFIN या अलिबाबाच्या युनिटने PAYTM मधील २ कोटी शेअर्स Rs ५४० प्रती शेअर या भावाने ब्लॉक डील च्या माध्यमातून विकले.

M & M च्या व्यवस्थापनाने सांगितले की भारतीय ग्राहकांचा ओढा आता SUV खरेदी करण्याकडे वळत आहे. त्यामुळे थर च्या लाँन्चला चांगला प्रतिसाद मिळाला.येत्या ३ ते ५ वर्षात EV ची विक्री वाढून विक्रीचे प्रमाण वाढून २०३० पर्यंत २५% ते ३०% होईल.

आमच्या E थ्री व्हीलर सेगमेंटमध्ये चांगली ग्रोथ आहे.
रेलटेलला पुडुचेरी सरकार कडून Rs १७० कोटींची ऑर्डर मिळेल.

इंडियन इन्फोटेक आणि सॉफ्टवेअर ही कंपनी राईट्स इशू आणण्याची शक्यता आहे.

PB फिनटेक ला RBI कडून अग्रेगेटर( फायनान्शियल अकाउंट ) म्हणून मान्यता मिळाली.

ICRA ने गुडरीक चहाचे रेटिंग कमी केले.

कोपार्व्हे दर वाढले तर अल्युमिनियमची इन्व्हेन्टरी कमी झाली. रशियाकडून कमी दरात मिळालेल्या क्रूडचा फायदा BPCL, HPCL, IOC या OMC ना होईल. सरकारने १ एप्रिल २०२३ पासून ड्युटी फ्री सोया क्रूडऑइल ची आयात बंद केली.

NPPA २२ नवीन औषधांच्या किमती ठरवणार.

GM ब्रुअरीज चे प्रॉफिट वाढून Rs २५.९ कोटी तर रेव्हेन्यू Rs १५३ कोटी झाला. ऑपरेटिंग मार्जिन २१.६ % झाले. निकाल चांगले आले.

नवीन फ्ल्युओरीन च्या निर्यातीत १८२% वाढ झाली. CDMO आणि स्पेशालिटी केमिकल्सची विक्री वाढली.

SRFचा फ्लुओरो स्पेशालिटी रेव्हेन्यू वाढला. PI इंडस्ट्रीची निर्यात २९% ने वाढली.

CYIENT या कंपनीचा फायदा Rs ७९ कोटींवरून Rs १५६ कोटी झाला. मार्जिन १०.१४% वरून १३.२% झाले.

PVR आणि इनॉक्स च्या मर्जरला मुंबई NCLT ने मंजुरी दिली. इनोसकच्या १० शेअरमागे PVR ची ३ शेअर मिळतील.

डिव्हीज लॅबची निर्यात.५% कमी झालीयेतर ग्लॅन्ड फार्माची निर्यात १६% ने कमी झाली.

फीचने सांगितले की TCS च्या रेव्हेन्यूची ग्रोथ कमी होईल, मार्जिन मात्र स्थिर राहील.

झायडस लाईफच्या BREXPIPRAZONE या औषधाला फायनल मंजुरी मिळाली. तसेच १८० दिवसांची एक्सक्ल्युझीव्हिटी मिळाली.

पिरामल एंटरप्रायझेसचे रिटेल लोन बुक येत्या तीन वर्षात Rs २५००० कोटींचवरुन Rs १लाख कोटी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

आज इन्फोसिस या IT क्षेत्रातले दिग्गज कंपॅनिएची तिसऱ्या तिमाहीचे निकाल आले. प्रॉफिट Rs ६५८६ कोटी तर रेव्हेन्यू Rs ३८३१८ कोटी झाला. EBIT Rs ८२४२ कोटी झाले. मार्जिन २१.५ % राहिले. US $ उत्पन्न Rs ४६५.९ कोटी झाले. रेव्हेन्यू ग्रोथ गायडन्स १६ ते १६.५ दिला. मार्जिन ग्रोथ गायडन्स २१% ते २२% केला. पे कॉन्स्टन्ट करन्सी ग्रोथ २.४% (QOQ) राहिला.

HCL टेकच्या प्रॉफीटमध्ये YOY २०% वाढ होऊन ते Rs ४०९६ कोटी झाले ( Rs ३४४२ कोटी ) . रेव्हेन्यूमध्ये YOY १९.६१ % वाढ होऊन Rs २६७०० कोटी झाला. ( Rs २२३२१ कोटी) .कॉन्स्टन्ट करन्सी रेव्हेन्यूमधी YOY १३.१% ग्रोथ झाली. USD रेव्हेन्यू US $ ३२४४ मिलियन तर EBIT मार्जिन १९.६% राहिले. कंपनीने Rs १० प्रती शेअर डिव्हिडंड दिला. कंपनेनी मफय ३ साठी गायडन्स १३.५% टी १४.५% वरून १३.५% ते १४% केला.

आज फार्मा,बँकिंग, एनर्जी इन्फ्रा FMCG मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. तर कॅपिटल गुड्स, IT ऑटो मध्ये मामुली खरेदी झाली. आज USA मधील आणि भारतातील महागाईचे आकडे आणि IIP चे आकडे येणार आहेत. त्याच्या अर्थव्यवस्था आनि मार्केटवर होणाऱ्या परिणाम लक्षात घेऊन मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

श्रीराम फायनान्स ब्लॉक डील PE फंड अपेक्स पार्टनर्स ब्लॉक देवालच्या माध्यमातून डायनॅस्टी ऍक्विझिशन ही त्यांची सबसिडीअरी मिळून एकूण ६% डिस्काऊंटवर ४.६३ % स्टेक विकणार एकूण १.७३ कोटी शेअर्स विकणार.

डिसेंबर २०२२ साठी CPI ५.७२ ( नोव्हेम्बरमध्ये ५.८८) होते. नोव्हेंबर साठी IIP ७.१% आला

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९९५८ NSE निर्देशांक निफ्टी १७८५८ बँक निफ्टी ४२०८२ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.