आज क्रूड US $ ८५.०० प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८१.६० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०१.६८ तर USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.५० आणि VIX १५.०२ होते.
आज USA ची मार्केट्स बंद राहतील. यूरोपमधील मार्केट्स तेजीत होती. USA मधील मार्केट शुक्रवारी मंदीत उघडले होते नंतर सावरले शेवटी तेजीत बंद झाले. लेबर कॉस्ट वाढली आहे. चौथ्या तिमाहीत रिसेशन येण्याची शक्यता आहे. महागाई ६.५%होती.
FII ने Rs २४२२.३९ कोटींची विक्री तर DII ने १९५३.४४ कोटींची खरेदी केली.
भारतात WPI होलसेल प्राईस इंडेक्स डिसेंबर २०२२ या महिन्यासाठी ४.९५% ( ५.५२% नोव्हेम्बरमध्ये) म्हणजे २२ महन्यांच्या किमान स्तरावर होते.
कोअर इन्फ्लेशन ३.५% वरून ३.२% झाले.
हट्सन एग्रोने Rs ४१९ प्रती शेअर या भावाने ७२ लाख राईट्स शेअर्स इशू केले.
विप्रोचे प्रॉफिट १५% ने वाढून Rs ३०५२ कोटी झाले. रेव्हेन्यू ३.१% ने वाढून Rs २३०५५.७० कोटी झाले. US $ रेव्हेन्यू ०.२% ने वाढून US $ २८०३.५० मिलियन झाले कॉन्स्टन्ट करंसी ग्रोथ ०.६% झाली. मार्जिन १.१२% ने वाढून १६.३% झाले. FY २३ साठी रेव्हेन्यू ग्रोथ गायडन्स ११.५% ते १२% दिला.
HDFC बँकेचे प्रॉफिट १८.५% (YOY ) Rs १२२५९.५० कोटी झाली. NII २४.६% ने वाढून Rs २२९९८ कोटी झाले GNPA १.२३% आणि NNPA ०.३३% वर कायम राहिली. NII वाढले, प्रोव्हिजन कमी झाली म्हणून प्रॉफिट वाढले.
फेडरल बँकेचे प्रॉफिट ५४% ने वाढून Rs ८०३.६० कोटी तर NII २७% ने वाढून Rs १९५६ कोटी झाले. GNPA २.४३ % तर NNPA ०.७३% होते. प्रोव्हिजन Rs १९९ कोटींची केली. NIM ३.४९% होते.
बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रॉफिट Rs ७७५ कोटी ( Rs ३२४ कोटी) NII Rs १९८० कोटी ( १५२७ कोटी) GNPA २.९४% (३,४%) आणि NNPA ०.४७% ( ०.६८% होते. बँकेने Rs ५३९ कोटींची प्रोव्हिजन केली
अव्हेन्यू सुपरमार्केटचे रेव्हेन्यू २५.५% ने वाढून Rs ११५६९ कोटी प्रॉफिट ६.७% ने (YOY) Rs ५८९.७० कोटी झाले. मार्जिन १.१०% ने कमी होऊन ८.३०% होते. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे मार्जिन कमी झाले.
L & T फायनान्सियल होल्डिंग्स चे प्रॉफिट ३९% वाढून Rs ४५४ कोटी झाले. इन्कम २४% नी वाढून Rs १६९३ कोटी आणि मार्जिन ८.८% राहिले.कंपनीला म्युच्युअल फंड बिझिनीस विक्रीचे एकूण Rs ४२४९ कोटी मिळाले (Rs ३४८५ कोटी +कॅश Rs ७६४ कोटी).कंपनीच्या तीन सबसिडीअरीज L & T फायनान्स, L & T इन्फ्रा क्रेडिट आणि L & T MF ट्रस्ट्रीज चे L & T फायनान्सियल होल्डिंग्ज मध्ये मर्जर होईल.
KDDL हि कंपनी १८ जानेवारी २०२३ ला शेअर्स बायबॅकवर विचार करेल.
DR रेड्डीज ही कंपनी ‘PRIMCYV’ या ब्रेस्ट कॅन्सरवरील औषधाच्या ब्रॅण्ड्स फायझर प्रॉडक्टस इंडिया कडून विकत घेईल.
DELHIVRY ने ‘अल्गोरिदम टेक ‘ ची अक्विझिशन १३ जानेवारी २०२३ ला पूर्ण केले.
जस्ट डायलच्या प्रॉफीट, रेव्हेन्यू मध्ये लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे हा शेअर तेजीत होता.
रत्तन इंडिया ने ‘रिवोल्ट मोटर्स’चे १००% स्टेकचे अधिग्रहण केले. हि कंपनी EV .मोटारसायकल्सचे उत्पादन करते. ह्या कंपनीचा हरयाणातील मानेसर येथे प्लांट असून त्याची EV मोटारसायकलची विक्री चांगली आहे.
सुला वाइनयार्ड्सची ग्रॉस बिलिंग्ज १३% ने वाढून Rs १८७.२ कोटी झाले . तर वाईन टुरिझम ४८% ने वाढून Rs २३ कोटी झाले.
मारुतीने त्यांच्या वाहनांच्या किंमत वाढवल्या.
अथेरच्या सुरत युनिटमध्ये उत्पादन सुरु झाले.
L & T ला हैदराबादमढ़े कमर्शियल ऑफिस साठी Rs १००० कोटी ते Rs ३००० कोटींची ऑर्डर मिळाली.
TCS ने UK तील स्कॉटवेस क्रेडिट युनियन बरोबर पार्टनरशिप करार केला.
भारत ऍग्री १ फेब्रुवारी २०२३ रोजी शेअर स्प्लिट वर विचार करेल.
ल्युपिनच्या ‘DOLUTEGRAVIR’ आणि ‘RILPIVIRINE ‘ या दोन औषधांना USFDA ची मान्यता मिळाली
आज मिडकॅप आणि स्मॉल कॅपमध्ये प्रॉफीट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६००९२ NSE निर्देशांक निफ्टी १७८९४ बँक निफ्टी ४२१६७ वर बंद झाले
Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !