आजचं मार्केट – १७ जानेवारी २०२३

आज क्रूड US $ ८४.१० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८१.८० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०२.१३ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.५३ आणि VIX१५.०५ होते.

सोमवारी USA ची मार्केट्स बंद होते. चीनच्या चौथ्या तिमाहीचा GDP ग्रोथ रेट २.९% ( ३.९%) आला. रिटेल विक्री – ५.९% वरून – १.८% झाली. इंडस्ट्रियल आउटपुट १.३( २.२ ) होता.

JSW इस्पातचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल कमजोर आले.

स्पेन्सर रिटेल टायर २ शहरात हायपर मॉल उघडणार.
सिप्ला मध्ये FII ने स्टेक वाढवला .

सोमवारी FII नी Rs ७५०.५९ कोटींची विक्री तर DII ने ६८५.९६ कोटींची खरेदी केली.

सरकारने क्रूड आणि इतर फ्युएल्सवरचा विंडफॉल टॅक्स मध्ये बदल केला. पेटोलवरील टॅक्स मध्ये बदल नाही. ATF वरील टॅक्स Rs ४.५ वरून Rs ३.५ केला. डिझेलवरील टॅक्स ६.५ प्रती लिटर वरून Rs ५ प्रती लिटर केला. विंडफॉल टॅक्स Rs २१०० प्रति टन वरून Rs १९०० प्रती टन केला.

सिमेन्सला रेल्वेकडून Rs २६००० कोटींचे ९००० हॉर्स पॉवर च्या १२०० लोकोमोटिव्हसाठी भारतीय रेल्वेकडून ऑर्डर मिळाली. डिझाईन, मॅन्युफॅक्चर,कमिशन, टेस्ट करायच्या आहेत. हि ऑर्डर ११ वर्षात पूर्ण करायची आहे. आणि ३५ वर्ष सर्व्हिस मेंटेनन्स करायचा आहे. भारतीय रेल्वेची फॅक्टरी दाहोद (गुजराथ) येथे आहे. तेथे असेम्बल्ड केले जातील.

NTPC रिन्यूएबल एनर्जीने त्रिपुराच्या राज्य सरकारबरोबर MOU साइन केले. मोठ्या साईझची प्रोडक्टस डेव्हलप करणे शक्य होईल.

केसोराम इंडस्ट्रीज चा लॉस Rs ४८ कोटी झाला. ( ३२ कोटी ) पॉवर फ्युएल इनपुट कॉस्ट वाढल्यामुळे लॉस वाढले. पण केसोरामचा रेव्हन्यू वाढला १२.६% वाढून Rs ९८६ कोटी झाला.

टिनप्लेटचे प्रॉफिट ६२% ने कमी झाले. लोअर टॉप लाईन आणि ऑपरेटिंग प्रॉफिट कमी झाले. रेव्हेन्यू १९% ने कमी झाले.

अशोक बिल्डकॉनला Rs ३७.९२ किलोमीटर चा रोड प्रोजेक्ट पूर्ण झालेल्याचे सर्टिफिकेट मिळाले.

एंजल १ चा रिझल्ट चांगलाआला पण हा yoy आहे ब्रोकिंग कंपन्यांचे रिझल्ट Q on Q पाहतात Q on Q result तितका चांगला नाही फायदा ३८% ने वाढला. रेव्हेन्यू २०% ने वाढला. Rs ९.६० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

सोम डिस्टिलरी २४ जानेवारी २०२३ रोजी राईट्स इशूवर विचार करेल.

संवर्धन मदर्सनमध्ये १.६% स्टेक ६% डिस्काऊंटवर विकला जाईल. Rs ७१ वर फ्लोअर प्राईस निश्चित केली आहे.

V- मार्टच्या कानपुर स्टोर्समध्ये आग लागली.
इक्विटास आणि इक्विटास स्माल फायनान्स बँकेच्या मर्जरला NCLT ने मंजूरी दिली.

इंडिया पेस्टीसाईड्स या कंपनीने हर्बीसाईड्स टेक्नॉलॉजी सुरू केली .

‘MASTEK’ चे प्रॉफिट Rs ७९ कोटींवरून Rs ६४ कोटी झाले. उत्पन्न Rs ६२५ कोटींवरून Rs ६५९ कोटी झाले तर मार्जिन १७.१८% वरून १७.२६ % झाले. कंपनीने Rs ७ अंतरिम लाभांश जाहीर केला.
बँक ऑफ इंडियाचे प्रॉफिट Rs १०२७.०० कोटींवरून Rs ११९१ .०० कोटी झाले. NII Rs ३४०८ कोटींवरून Rs ५५९४.०३ कोटी झाले. GNPA ८.५१% वरून ७.६६% झाले तर NNPA १.९२ वरून १.६१% झाले.

न्यू जेन सॉफ्टवेअर चे उत्पन्न आणि प्रॉफिट वाढले.
मेट्रो ब्रँडचे प्रॉफिट उत्पन्न EBIT वाढले मार्जिन कमी झाले. कंपनीने २.५० प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.

आज एनर्जी, FMCG, रिअल्टी, इन्फ्रा IT क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी तर PSU आणि बँकांमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६०६५५ NSE निर्देशांक निफ्टी १८०५३ आणि बँक निफ्टी ४२२३५ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.