आजचं मार्केट – १८ जानेवारी २०२३

आज क्रूड US $ ८६.५० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $$१= Rs ८१..२५ च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०२.५९ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.५४ आणि VIX १४.२६ होते.

USA ची मार्केट्स मंदीत होती. गोल्डमन साख्सचे निकाल कमजोर आले. मॉर्गन स्टॅनलेचे निकाल चांगले आले त्यामुळे शेअरमध्ये तेजी होती.

चीनच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित आकड्यांमुळे मंदीची भीती वाढली. डाऊ जोन्स पडला पण NASDAQ सावरले

UK च्या रिटेल महागाईचे आकडे १०.७% वरून १०.५% झाली तर कोअर महागाई ६.३% झाली.

टाटा मेटॅलिक्सचा फायदा ७४% ने कमी झाले.

ग्लेनमार्कने भारत आणि नेपाळ येथे डर्माटॉलॉजी सेगमेंटसाठी एरिस लाईफसायन्सेस बरोबर करार केला. Rs ३४० कोटी गुंतवणूक करणार.

ICICI लोम्बार्ड चा फायदा YOY ११% ने वाढला. प्रीमियम १४.५% ने वाढून Rs ३७९२ कोटी झाला . इन्कम १३.२% ने वाढून Rs ४३६२ कोटी झाले.

जपानच्या मॉनेटरी पॉलिसी मध्ये बदल होईल गव्हर्नमेंट बॉण्डच्या यिल्ड कंट्रोल कर्व्हच्या द्वारा मॅनेज करतात. जपानने व्याजदरात कोणतंही बदल केले नाहीत

कॉपर अल्युमिनियम च्या किमती वाढल्या. CLSA ने मेटल्सच्या किमतीची टार्गेट वाढवली. सोने चांदी मात्र मंदीत होती.

स्ट्राइड्स फार्माची सबसिडीअरी स्टॅलिस बायोफार्मा च्या बंगलोर युनिटला USFDA कडून ड्रॅग डिव्हाईस कॉम्बिनेशन प्रॉडक्टसाठी EIR मिळाला.

सालासार टेक्नॉलॉजीला नेपाळ इलेक्ट्रिक ऑथॉरिटी कडून Rs १०३ कोटींची ऑर्डर मिळाली.

अशोक लेलँडला लंका सरकारकडून ५०० बससाठी ऑर्डर मिळाली.

काँकॉरमधील सरकारचा ३०.८% स्टेक डायव्हेस्ट करण्यासाठी EOI ( एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट) साठी लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. ३० जानेवारी २०२३ रोजी CGD ( कोअर ग्रुप ऑफ डायव्हेस्टमेन्ट सेक्रटरीज ) ची बैठक आहे.

डायव्हेस्टमेन्टमध्ये सामील होण्यासाठी विदेशी फंडांना आणि कंपन्यांना परवानगी दिली जाण्याची शक्यता
भारत फोर्जमध्ये FII ने त्यांचा स्टेक कमी केला.

टाटा इन्व्हेस्टमेंट चे प्रॉफिट आणि उत्पन्न कमी झाले.
SHALBY चे प्रॉफिट आणि उत्पन्न वाढले.

ERIS लाईफसायन्सेसचे प्रॉफिट आणि उत्पन्न वाढले.

मारुतीने ८ डिसेंबर २०२२ ते १२ जानेवारी दरम्यान उत्पादन केलेल्या १७३६२ गाड्या रिकॉल केल्या. यात ब्रेझा, बॅलेनो, वितारा, ALKO K -१०, SPRESSO आणि Eeco या गाड्यांचा समाविष्ट आहे. एअरबॅग कंट्रोलर ची तपासणी केल्यावर या गाड्या पुन्हा डिलिव्हरी केल्या जातील.

सुंदरम फास्टनर्स ला US $२५० मिलियन्सची EV पार्ट्स सप्लाय करण्यासाठी ऑर्डर मिळाली.

LIC ने कोफोर्जमध्ये तर गोल्डमन साख्स ने गोकुळदास एक्स्पोर्टमध्ये स्टेक वाढवला.

ICICI प्रुचा फायदा २९% ने कमी झाला उत्पन्न ४.३ % ने वाढले.

ITC ने स्प्राऊटलाईफ मध्ये १००% स्टेक घेण्यासाठी करार केला. ही कंपनी ‘योगा बार’या ट्रेडमार्क खाली उत्पादने बनवून विकते . ITC प्रथम Rs १७५ कोटीची गुंतवणूक करून ३९.४% स्टेक घेईल
डेल्टा कॉर्प चे प्रॉफिट २०.५% ने वाढून Rs ८४.८२ कोटी झाले. रेव्हेन्यू १०.६% वाढून Rs २७३.४ कोटी झाले.

RVNL ला सुरत मेट्रो रेल साठी पॉवर सप्लाय आणि डिस्ट्रिब्युशन सिस्टीम चालू करण्याचे Rs ६७३.८० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. तसेच अहमदाबाद मेट्रो फेज II साठी Rs ३८४.३० कोटीचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. या प्रोजेक्ट मध्ये सिमेन्सचा ६५% आणि RVNL चा ३५% हिस्सा आहे.

ज्युबिलण्ट फूड्सने चेन्नई मध्ये US चिकन ‘पोपेयेज’ रेस्टारंट सुरु केले.

सरकार BEL आणि ECIL ( इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) कडून EVM खरेदी करेल यासाठी Rs १३३५ कोटी खर्च करेल.

सेंट्रल बँकेचे प्रॉफिट Rs ४५८ कोटी ( Rs २७९ कोटी ) NII Rs ३२८४.५० कोटी GNPA ८.८५% आणि NNPA २.०९% होते.

PSP प्रोजेक्ट्स चे प्रॉफिट, मार्जिन कमी झाले उत्पन्न वाढले.

भारती एअरटेलची सबसिडीअरी हैदराबादमध्ये Rs २००० कोटी गुंतवणूक करून डेटा सेंटर सुरु करेल.

अडानी एंटरप्रायझेसचा Rs २०,००० कोटींचा FPO ( फॉलो ऑन पब्लिक इशू) २७ जानेवारीला सुरु होऊन ३१ जानेवारीला बंद होईल. या FPO साठी फ्लोअर प्राईस Rs ३११२ आणि कॅप प्राईस Rs ३२७६ निश्चित केली आहे. या
CCL प्रॉडक्टस ने Rs ३ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला. कंपनीला फ्रीझ ड्राईड कॉफीचे उत्पादन करण्यासाठी ६००० TPA क्षमतेचा प्लांट लावण्यासाठी मंजुरी मिळाली. या प्लांटमध्ये कंपनी US $ ५० मिलियनची गुंतवणूक करेल.

सूर्य रोशनीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. प्रॉफिट Rs ४१ कोटींवरून Rs ९० कोटी तर उत्पन्न Rs २०३० कोटींवरून Rs २०२१ कोटी झाले. मार्जिन वाढले .

AIMCO पेस्टीसाईड्सला नवीन मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरु करण्यासाठी पर्यावरणाची मंजुरी मिळाली.
कृष्णा डायग्नॉस्टिक्स पंजाबमध्ये ४ ठिकाणी डायग्नॉस्टिक्स सेंटर उघडणार आहे.

हिंदुस्थान झिंक त्यांच्या १९ जानेवारी २०२३ रोजी होणाऱ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या बैठकीत तिसऱ्या अंतरीम लाभांशावर विचार करेल.

सिप्लाने डायबिटीस, इन्फेक्शन, थायरॉईड, फर्टीलिटी आणि इतर आजारांसाठी डायग्नॉस्टिक्स डिव्हाईस लाँच केले.

इंडसइंड बँकेचे तिसर्या तिमाहीचे प्रॉफिट Rs ११६० कोटींवरून Rs १९६० कोटी झाले. NII Rs ४४९५ कोटी झाले. तर GNPA २.११ वरून २.०६ आणि NNPA ०.६१ वरून ०.६२ झाले.

आज सरकारी बँका,ऑटो, एनर्जी, मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले तर PSE फार्मा आणि इंफ्रामध्ये खरेदी झाली.

पर्सिस्टंट सिस्टीम चे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. प्रॉफिट Rs २२० कोटींवरून Rs २३८ कोटी तर उत्पन्न Rs २०४८ कोटींवरून Rs २१६९.४० कोटी झाले मार्जिन १५.३ % राहिले.२८ रुपये लाभांश दिला

ऑरोबिंदो फार्माच्या तेलंगणा युनिटसाठी USFDA ने २ त्रुटी दाखवल्या.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६१०४५ NSE निर्देशांक निफ्टी १८१६५ बँक निफ्टी ४२४५८ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.