आजचं मार्केट – १९ जानेवारी २०२३

आज क्रूड US $ ८४.०० प्रती बॅरल्सच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८१.३५ च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०२.४० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.३७ आणि VIX १३.९६ होते.

आज USA मधील मार्केट्स मंदीत होती. डाऊ जोन्स मंदीत होते. ओल्ड इकॉनॉमिचे शेअर्स पडले. आज S & P मंदीत होते. मायक्रोसॉफ्ट या वर्षात १०००० लोकांना काढून टाकणार आहे . अमेझॉन ही स्टाफमध्ये कपात करणार आहे. या आठवड्यात २६ जानेवारीला सुट्टी असल्यामुळे मंथली एक्स्पायरी २५ जानेवारीला असेल.

USA चा DEBT तो GDP रेशियो शूट अप झाला आहे.

आज FII ने Rs ३१९.२३ कोटींची विक्री तर DII ने Rs १२२५.९६ कोटींची खरेदी केली.

टाटा कॉफीमध्ये FII ने स्टेक वाढवला.

NHPC येत्या ५ वर्षात त्यांची क्षमता दुप्पट करणार आहेत.

१५ वर्षांपेक्षा जुन्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन रद्द होईल. याचा फायदा MSTC ला होईल.
गोआ कार्बनचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. प्रॉफिट ५७%( YOY) ने वाढून Rs २५.६ कोटी तर रेव्हेन्यू ९३% ने वाढून Rs ४१६.७६ कोटी झाले.

मीनाक्षी एनर्जी हा नेलोर येथील १००० MV कोळशावर चालणारा प्लांट आहे. वेदांताला मीनाक्षी एनर्जीसाठी यशस्वी बीडर म्हणून जाहीर केले. वेदांता हे ऍक्विझिशन Rs १४४० कोटींना (अपफ्रंट Rs ३१२ कोटी आणि Rs ११२८ कोटींचे मीनाक्षी एनर्जीचे NCD ) करेल. हा व्यवहार FY २०२४ मध्ये पूर्ण करायचा आहे.

महिंद्रा लाइफस्पेसला मुंबईमध्ये एक रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट मिळाले. या प्रोजेक्टमधून कंपनीला Rs ५०० कोटीचा रेव्हेन्यू मिळेल.

हेरिटेज फूड्सने ग्लुकोशक्ती हा एनर्जी ड्रिंकचा आणि क्रिमिलिसियस हा दह्याचा हे नवीन ब्रॅण्ड्स लाँच केले.

KDDL ही कंपनी मार्केटमधून Rs १२०० प्रती शेअर या कमाल भावाने १.७५ लाख शेअर्स बायबॅक साठी Rs २१ कोटी खर्च करेल.

हॅवेल्स चे प्रॉफिट Rs २८४ कोटी उत्पन्न Rs ४१२० कोटी मार्जिन १०.३% होते. कंपनीने Rs ३ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला. हॅवेल्सचे निकाल QOQ आणि अनुमानापेक्षा चांगले आले.
डाटामाटिक्सचे प्रॉफिट आणि उत्पन्न वाढले पण मार्जिन कमी झाले.

हॅपीएस्ट माईंड चे उत्पन्न वाढले नफा थोडा कमी झाला मार्जिन कमी झाले.

एशियन पेंट्स ने सांगितले की डोमेस्टिक डेकोरेटिव्ह पेंटसच्या व्हॉल्युममध्ये नगण्य बदल झाला. कंपनीने सांगितले की पावसाळा लांबल्यामुळे सणासुदीच्या विक्रीवर प्रतिकूल परिणाम झाला. एशियन पेन्ट्सचे प्रॉफिट Rs १०७३ कोटी तर उत्पन्न Rs ८६०८ कोटी झाले. मार्जिन १८.४% झाले. आंतरराष्ट्रीय बीझिनेस मध्ये २% नगण्य वाढ झाली.

PVR YOY तोट्यातून फायद्यात आली. कंपनीला Rs १५.९ कोटी प्रॉफिट झाले. रेव्हेन्यू Rs ९४० कोटी ( Rs ६१४ कोटी) झाला .

भारती एअरटेलने डेहराडून येथे 5G लाँच केली.

JLR चे MD रोहित सुरी यांनी राजीनामा दिला.

सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने JSW रिन्यूएबल एनर्जीला ५००MV आणि १०००MV बॅटरी स्टोअरेज सिस्टीम साठी ऑर्डर दिली. यातील ६०% एनर्जी SECO खरेदी करील.

AU स्मॉल फायनान्स बँकेचे प्रॉफिट Rs ३९२ कोटी ( Rs ३०२.०० कोटी ) NII Rs ११५२ कोटी आणि NPA १.८१ % होते.

मेघमणी फाईन केमिकल्सचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. कंपनीने Rs २.५० प्रती शेअर लाभांश दिला .

ICICI सिक्युरिटीज चे निकाल कमजोर आले.

पॉलीकॅबचे निकाल चांगले आले प्रॉफिट Rs ३५८ कोटि ( Rs २४७ कोटी ), उत्पन्न Rs ३७१५ कोटी ( Rs ३३७२ कोटी ) आणि मार्जिन १३.६% ( १०.७%) राहिले.निकाल चांगले आले.

HUL चे प्रॉफिट १२% YOY वाढून Rs २२४३ कोटींचे Rs २५०५ कोटी झाले. नेट विक्री १६% ने वाढून Rs १२९०० कोटींवरून Rs १४९८६ कोटी झाली. रेव्हेन्यू १६% ने वाढून Rs १३०९२ कोटींवरून Rs १५२२८ कोटी झाले. HUL ने सांगितलेले ही ग्रोथ ब्युटी आणि पर्सनल केअर, होम केअर सेगमेंटमुळे झाली.HUL ने रॉयल्टीचे दर १ फेब्रुवारी २०२३ पासून २.६५ % वरून ३.४५% असे बदलले.हे बदललेले दर १ फेब्रुवारी २०२३ पासून लागू होतील. हा बदल येत्या ३ वर्षांसाठी असेल.
CCI नी गुगलला केलेल्या Rs १३३८ कोटी पेनल्टी संबंधात गूगल ने केलेल्या अर्जाच्या सुनावणीत गूगलला कोणतीही सूट दिली नाही.

L & T TECHचे प्रॉफिट Rs ३०३.६ कोटी ( २८० कोटी ) तर रेव्हेन्यू Rs २०५० कोटी ( Rs २००० कोटी ) झाले मार्जिन १८.७% राहिले.

हिंदुस्तान झिंक ने जर काही इंटरींम लाभांश जाहीर केला तर त्याची रेकॉर्ड डेट ३० जानेवारी २०२३ ही ठेवली आहे.

आज FMCG, मेटल्स, ऑटो, एनर्जी फार्मा सेक्टरमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले आणि PSE आणि बँकिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी झाली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६०८५८ NSE निर्देशांक निफ्टी १८१०७ आणि बँक निफ्टी ४२३२८ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.