आजचं मार्केट – २३ जानेवारी २०२३

आज क्रूड US $ ८७.२० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= ८१.४० च्या आसपास होता. US $ निर्देशांक १०१.५२ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.४७ आणि VIX १३.६३ होते.

आज तैवान,चीन, हाँगकाँग, कोरिया, सिंगापूर मधील मार्केट्स बंद होती

सुरुवातीला USA मधील मार्केट्स मंदीत होती. पण नंतर मात्र चांगलीच सुधारली. डाऊजोन्स, S & P आणि NASDAQ हे तिन्ही निर्देशांक सुधारले. गुगलने ६% कर्मचारी म्हणजे १२००० कर्मचाऱ्यांना काढून टाकले. तसेच आणखी LAYOFF भविष्यात होण्याची शक्यता आहे.असे सांगितले. फेडच्या दोन डायरेक्टर्सनी, हार्केर आणि वॉकर यांनी सांगितले की फेब्रुवारी २०२३ रोजी ०.२५% एवढी दरवाढ होण्याची शक्यता आहे. मंदी येण्याची शक्यता ५०% कमी झाली.

या आठवड्यात २६ जानेवारी रोजी सुट्टी आहे. त्यामुळे एक्स्पायरी बुधवारी २५ जानेवारी २०२३ रोजी होईल.

FII ने Rs २०२२ कोटींची विक्री केले तर DII ने Rs १५०९ कोटींची खरेदी केली.

तानलाची टॉप लाईन २६% ने कमी झाली. ऑपरेटिंग परफॉर्मन्स कमजोर आहे.

IEX चे तिसऱ्या तिमाहीत निकाल कमजोर आले.

ICICI बँकेची प्रॉफिट ३४% ने वाढून Rs ८३१२ कोटी झाले. NII ३४.६% वाढलं.NIM ०.६९ % ने वाढून ४.६५% झाले. क्रेडिट ग्रोथ १९.७% आणि डिपॉझिट ग्रोथ १०.३% झाली

कोटक महिंद्रा बँकेचे NIM ६९ बेसिस पाईंट वाढून ५.४७% झाले. बँकेचा फायदा ३१% ने वाढला.

अल्ट्राटेक सीमेन्टचे मार्जिन कच्च्या मालाच्या, पॉवर, इंधनाच्या आणि मालवाहू भाडे वाढल्यामुळे कमी झाले.

IDFC फर्स्ट बँकेचे प्रॉफिट ११५% ने वाढले. NII २७.३% ने वाढले

येस बँकेच्या प्रॉफीटमध्ये ८०.३% घट झाली. ऍसेट गुणवत्ता सुधारली. ऍडव्हान्सेस १०% ने तर डिपॉझिट १६ % ने वाढले.

फर्स्ट सोर्स सोल्युशन्स आणि टॉरंट पॉवर एप्रिल सिरीज पासून F & O मार्केटमधून बाहेर पडतील.

IOL ला हंगेरीतुन गुड मॅनुफॅक्चरिंग साठी सर्टिफिकेट मिळाले.

बिटकॉइन SUISSE साठी TCS ने क्रिप्टो फायनान्सियल टेक या नावाने प्लॅटफॉर्म तयार केला
कॅनरा बँकेचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

प्रॉफिट YOY Rs १५०२.०० कोटींवरून Rs २८८१.५० कोटी तर NII Rs ६९४५ कोटींवरून Rs ८५९९.०.कोटी झाले GNPA ५.८९ %तर NNPA १.९६% होते. बँकेची क्रेडिट ग्रोथ १८% झाली तर प्रोव्हिजनRs ३१२१.८० कोटी केली. चांगल्या निकालांमुळे बँकेच्या शेअरमध्ये खरेदी झाली.

इंडोको रेमिडीजच्या गोवा युनिटच्या तपासणीत USFDA नी ९ त्रुटी दाखवल्या. हे ओरल फॉर्म्युलेशन युनिट आहे.

मार्क्सन फार्माच्या डिप्रेशनवरील औषध ‘FLUOXETINE’ ला आणि रेलोनकेम युनिटला UKMHRA ची मंजुरी मिळाली.

गेल गॅसप्लॅंटच्या दोन आउट्लेट्सवर EV चार्जिंग स्टेशन लावणार आहे.

‘LTTMINDTREE’ च्या व्यवस्थापनाने सांगितले की ऍट्रिशन रेट २४% वरून २२.५% झाला. चौथ्या तिमाहीत मार्जिन २ ते २.५% ने वाढण्याची शक्यता आहे. काही ग्राहकांनी भविष्याविषयी सावध पवित्र घेतला आहे. रिअल्टी आणि इन्शुअरन्स मध्ये काहीशी मंदी जाणवत आहे. पण ट्रॅव्हल आणि बँकिंग मध्ये चांगली ग्रोथ आहे. काही प्रोजेक्ट मिळायला उशीर होत आहे.

ग्रुप ऑफ मिनिस्टर्स ने MTNL ला त्यांची दिल्ली, हेंद्रबाद लखनौ येथील मालमत्ता विकण्यासाठी परवानगी दिली. ही विक्री येत्या FY मध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

थांगमाईल ज्युवेलरी चे प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले
अरविंद लाईफ स्पेसेस चे प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न वाढले.

क्राफ्ट्समन ऑटो चे प्रॉफिट उत्पन्न वाढले.

SAT ने NSE वर Rs १०० कोटींचा दंड लावला.

सेबीची आधीची Rs ६२५ कोटींच्या डीसगॉर्जमेंटची ऑर्डर रद्द केली. सेबीला चौकशीचे आदेश दिले.

NSEला कोलोकेशनमधून अवैध लाभ झाला नाही.

NSE नी लोड बॅलन्सर लावले नाहीत.

करूर वैश्य बँकेचे प्रॉफिट वाढले, NII वाढते GNPA आणि NNPA कमी झाले. प्रोव्हिजन जास्त केली.

रूट मोबाईलचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.

महाराष्ट्र सीमलेसचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
VRL लॉजिस्टिक्स ३० जानेवारीला शेअर बायबॅकवर विचार करेल.

भारत बिजलीचे प्रॉफिट उत्पन्न वाढले.

टाटा मोटर्सने EV फायनान्सिंग साठी ICICI बँकेबरोबर करार केला.

जिंदाल स्टीलचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले.

PNB गिल्ट तोट्यातून फायद्यात आली. IDBI बँकेचे प्रॉफिट वाढले NII वाढले.

अडाणी ग्रीन सोलर पोर्टफोलिओ ९% वाढला विंड पोर्टफोलिओ ४७% वाढला हायब्रीड पोर्टफोलिओ ३२ % वाढला.

ऍक्सिस बँकेचा फायदा Rs ५८५० कोटी GNPA २.५०% वरून २.३८%,NNPA ०.५१ वरून ०.४७% NII Rs ११४५९.०० कोटी
आज FMCG आणि PSE मध्ये खरेदी झाली तर रिअल्टी मेटल आणि इंफ्रामध्ये प्रॉफिट बुकिंग झाले

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६०९०९ NSE निर्देशांक निफ्टी १८१०५ आणि बँक निफ्टी ४२७७१ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.