आजचं मार्केट – २४ जानेवारी २०२३

आज क्रूड US $ ८८.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८१.६० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०१.९० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.४९ तर VIX १३.५० होते.

आज सोने सार्वकालिक कमाल स्तरावर होते. बेस मेटल्स साठी असलेली चीनमधील मागणी वाढली, इन्व्हेन्टरी कमी आहे, तसीच पेरू या देशात सप्लायसाइडच्या काही अडचणी आहेत . त्यामुळे आज अल्युमिनियम, कॉपर, झिंक यात तेजी होती

USA ची मार्केट्स तेजीत होती. फेड फेब्रुवारी मध्ये दर ०.२५%च वाढवेल असं गृहीत धरून मार्केट तेजीत होते. USA मध्ये प्रमुख कंपन्या कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहेत. गूगल १,५०,००० कर्मचारी स्पॉटिफाय ६०० लोकांना काढणार आहे. हळू हळू सर्व क्षेत्रात LAYOFF चे लोण पसरत आहे.यामध्ये टेस्ला, नेटफ्लिक्स मेटा ऍपल यांचा समावेश आहे. शेअर मार्केटमध्ये मात्र ह्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी चालू आहे कारण खर्च कमी झाल्यामुळे या कंपन्यांची मार्जिन आणि परिणामतः प्रॉफिट वाढेल . पण नोकऱ्यांत कपात झाल्यामुळे मागणी कमी होईल आणि हळू हळू मंदी आपली पाऊले टाकायला सुरुवात करेल.

गोदरेज अप्लायन्सेसने एअर कुलर सिस्टीमच्या सप्लायसाठी DELHIVERY बरोबर करार केला
झोमॅटोने १० मिनिटात डिलिव्हरी’ ही योजना स्थगित रद्द केली.

इंडस टॉवर त्यांच्या आजच्या बैठकीत वोडाफोन आयडिया कडे असलेल्या सुमारे Rs ८००० कोटींच्या थकबाकीविषयी अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.

JSW स्टीलच्या सबसीडीअरीने ‘AYENA INNOVATIONS’ मधील ३१% स्टेक Rs ५.९९ कोटीना घेतला.

CAYMAN ने DFM फूड्स मध्ये Rs ४६७ प्रति शेअर या दराने २१.१% स्टेक घेतला

पंजाब केमिकल्सची प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले.
इंडोको रेमेडीजचे प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले .

सुप्रीम इंडस्ट्रीज चे फायदा कमी झाला, उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.

CG पॉवर चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.

स्नोमॅन लॉजिस्टीक्सचे निकाल चांगले आले.

टाटा कॉफी चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले.

यूको बँकेचे प्रॉफिट वाढले NPA कमी झाले.

CHALET हॉटेल्स ही कंपनी तोट्यातून फायद्यात आली

रिलायन्स जिओ ने एकाच वेळी ५० शहरात 5G लाँच केले.

भारती एअरटेलने ९ सर्कल्समध्ये किमान प्रीपेड चार्जेस Rs ९९ वरून Rs १५५ केले.

स्टरलाईट टेक्नॉलॉजी २७ जानेवारीला राईट्स इशूवर विचार करणार आहे.

दिलीप बिल्डकॉनला स्कायवे इंफ्रासाठी मध्य प्रदेश जल निगम कडून सुमारे Rs १९०० कोटींची ऑर्डर मिळाली

ल्युपिनने डिजिटल थेरापटिक सोल्युशन लाँच केले.
मारुती ने ग्रँड व्हिटारा या ब्रँड्सच्या सीट बेल्टमध्ये काही खराबी असल्याने १११७७ गाड्या परत बोलावल्या.आज मारुतीचा रिझल्ट लागला मारुतीला Rs २३५१ कोटींचा फायदा झाला. उत्पन्न Rs २९०४४ कोटी झाले. मार्जिन ९.७% होते. EBITDA Rs २८३३ कोटी झाले. कंपनीने सांगितले की सेमी कंडक्टर चिपच्या शॉर्टेजमुळे उत्पादनावर परिणाम झाला.

कोलगेटचा नफा Rs २५२ कोटींवरून Rs २४३ कोटी झाला. उत्पन्न Rs १२८० कोटींवरून Rs १२९१ कोटी झाले. EBITDA Rs ३८१ कोटींवरून Rs ३६१ कोटी झाला. मार्जिन २९.८% वरून २८% झाले.
SBI कार्डसचा प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले ( YOY)
सोनाटा सॉफ्टवेअरचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढते.
लॅटेन्ट VIEW चे प्रॉफिट वाढले,उत्पन्न वाढले.

ऑरिओन प्रो चे प्रॉफिट ,उत्पा वाढले

PNB हौसिंग चे प्रॉफिट, NII वाढले. NPA कमी झाले.

SBI कार्डसचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.

साऊथ इंडियन बँक तोट्यातून फायद्यात आली. Rs ५० कोटींच्या तोट्याचे Rs १०० कोटी फायद्यात रूपान्तर झाले.

प्रुडंट कॉर्प, पुनावाला फिनकॉर्प J & K बँक त्रिवेणी टर्बाइन्स, जिंदाल ड्रिलिंग KEI इंडस्ट्रीज, झेन्सार टेक, शॉपर्स स्टॉप यांचे निकाल चांगले तर सागर सिमेंट सुप्रीम पेट्रो अंबर यांचे निकाल कमजोर आले.
कामधेनू व्हेंचर्सचे Rs १७० वर BSE वर लिस्टिंग झाले.

स्ट्राइड्स फार्मा चा तोटा कमी झाला, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले. निकाल चांगले आले.

रूट मोबाईल ने सांगितले की बँकिंग, ODC , व्हाट्सअप, सोल्युशन, ई-मेल मध्ये चांगली ग्रोथ आहे. कंपनी डोमेस्टिक तसेच आंतरराष्ट्रीय बँकात प्रवेश करत आहे. BSFI वर खर्च कमी होत आहे. पण कंपनीची BSFI मध्ये ग्रोथ आहे. कंपनीने श्री लंका युगांडा मध्ये करार केले आहेत.

आज ऑटो, IT क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी आणि बँकिंग, फार्मा, मेटल्स आणि रिअल्टी मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेंसेक्स ६०९७८ NSE निर्देशांक निफ्टी १८११८ बँक निफ्टी ४२७३३ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.