आजचं मार्केट – २७ जानेवारी २०२३

आज क्रूड US $ ८७.९० प्रती बॅरल्सच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८१.६० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०१.६० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.५४ आणि VIX १८.०० होते. सोने आनि चांदी मंदीत होते.

USA मधील मार्केट्स ओळीने ५ दिवस तेजीत होती. USA चा GDP ग्रोथ रेट २.९% ( ३.२% ) राहिला. मायक्रोसॉफ्ट, टेक्सास इंस्ट्रुमेंट्स, INTEL यांचं निकाल कमजोर आले. जॉबलेस क्लेम ६००० ने कमी झाले. टेस्लाचे निकाल चांगले आले. IBM ही कंपनी जॉबकट करणार आहे. USA चे लेबर मार्केट टाईट आहे. दुधारी तलवार असावे अशी स्थिती USA मध्ये आहे. अर्थव्यवस्थेत सुधारणा होत आहे फेड यावेळी ०.२५% एवढीच दरवाढ करेल अशी मार्केटला आशा आहे. पण आशेवर गुंतवणूक होत नसते तर ट्रेडिंग होते.

FII नी Rs २३९३.९४ कोटींची विक्री तर DII ने Rs १३७८.४९ कोटींची खरेदी केली.

टाटा एलेक्सि चा नफा २९% वाढून Rs १९४.७० कोटी झाला .लोअर ऑपरेटिंग मार्जिन रेव्हेन्यू आणि इतर इन्कम मध्ये वाढ झाली.

SJVNनी खोलोन्गच्यु हायड्रो एनर्जी ( KHEL) या भूतानी जॉईंट व्हेंचर कंपनीतील पूर्ण स्टेक विकला Rs ३५४.७१ कोटींचा हा व्यवहार झाला.

अमर राजा बॅटरीचा फायदा ५३% वाढून Rs २२१.९ कोटी झाला. रेव्हेन्यू ११.५% ने वाढून Rs २६३८ कोटी झाला. ऑटोमोटिव्ह सेक्टर OEM आणि आफ्टर मार्केट सेगमेंटमध्ये चांगली ग्रोथ दिसली.

DLFचे प्रॉफिट ३७%ने वाढून ते Rs ५१९ कोटी झाले. लो बेस आणि लोअर फायनान्स कॉस्ट एक्सएप्श्ननल लॉस Rs २२४.४ कोटी झाला रेव्हन्यू ३.५% ने कमी होऊन Rs १४९५ कोटी झाले. नवीन बुकिंग २४% ने वाढूनRs २५०७ कोटी झाले. मार्जिन १.७० % कमी झाले.

LTTमाइंडट्री ने DUCK ग्रीक टेक्नोलोजिझ आणि मायक्रोसॉफ्ट यांच्या बरोबर क्लाउड मायग्रेशन टेक्नॉलॉजी सोल्युशनसाठी करार केला.

श्री दिग्विजय सिमेंटचे फायदा उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.

DR रेड्डीजने डोळ्यांसाठी औषध ‘ DIFLUPREDNATE ऑप्थल्मिक इमल्शन USA मध्ये लाँच केले.

कल्याणी स्टील चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.

ग्लेन मार्क फार्माच्या बद्दी युनिटमधून पुरवठा होणाऱ्या ‘ APOVAQUONE ओरल सस्पेंशन’ USA ला सप्लाय करण्यासाठी मंजुरी दिली. हे औषध फुफुसाला होणाऱ्या इन्फेक्शनच्या उपचारासाठी वापरले जाते. या औषधाचा USA मध्ये असणारा तुटवडा कमी करण्यासाठी USFDA ने मंजुरी दिली.
ITC मिलेट- बेस्ड प्रोडक्टसचा पोर्टफोलिओ बनवणार आहे.ITC स्प्राऊट लाईफ फूड मध्ये येत्या ३-४ वर्षात १००% स्टेक घेणार आहे. ३०.४% स्टेक Rs १७५ कोटींना घेणार आहे. ३१ मार्च २०२५ मध्ये आणखी Rs ८० कोटी गुंतवून ४७.५ % स्टेक घेणार .

ट्यूब इनव्हेस्टमेन्ट सेलेस्टीअल ३E -मोबिलिटीमध्ये Rs ५०.९ कोटींमध्ये ३०% स्टेक घेणार आहे.

संवर्धन मदर्सननी ‘SADDLES इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह अँड एव्हिएशन इंडस्ट्री’मध्ये ५१% स्टेक Rs २०७ कोटींमध्ये घेतला.

ग्रीव्ज कॉटनने ETA ग्रीन पॉवर बरोबर एक्सक्ल्युजिव टेक्निकल राईट्स साठी करार केला.
मारुती EV SUV ची ६ मॉडेल्स औंच करणार.

जिंदाल SAW अनुपम रसायन ( प्रॉफिट उत्पन्न वाढते, मार्जिन कमी झाले), भिकाजी फुड्सचे निकाल चांगले आले. भिकाजी फुड्सच्या कच्च्या मालाच्या किमती कमी झाल्यामुळे ग्रॉस मार्जिन वाढली आणि सणासुदीचा मोसम असल्याने विक्री वाढली.

झायड्स लाईफच्या अहमदाबाद मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये USFDA ने कोणतीही त्रुटी दाखवली नाही.

स्टरलाईटचे प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले.

ग्लेनमार्कलाइफचे प्रॉफिट आणि उत्पन्न वाढते.

अरविंदने रिन्यू ग्रीन मध्ये ३१% स्टेक घेतला.

डिक्सन या कॉन्ट्रॅक्ट तत्वावर मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपनीने त्यांचा गायडन्स कमी केला. स्मार्ट फोनचा बिझिनेस कमी झाला आहे , लाईटिंगच्या बिझिनेसनमध्ये ग्रोथ आहे. पण एकंदर मागणी कमी झाल्यामुळे गायडन्स कमी केला असे सांगितले.

दिलीप बिल्डकॉनला Rs १३७० कोटींची ऑर्डर मिळाली.

जिओ ने २.१० लाख ग्राहक आणि भारतीने १.३० लाख ग्राहक जोडले. वेदांताचा फायदा वाढला आय कमी झाली. कंपनीने Rs १२.५० इंटरीम लाभांश जाहीर केला.

बजाज फायनान्सचे प्रॉफिट Rs २९७३ कोटी NII Rs ७४३३ ( ६००२ कोटी) कोटी झाले तर NPA कमी झाले.

टाटा मोटर्सने सर्व वाहनांचे दर वाढवले.

गॉडफ्रे फिलिप्सचे फायदा वाढला उत्पन्न वाढले.
AIA इंजिनीअर्सचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले निकाल चांगले आले.

आज अडानी ग्रुपचे शेअर्स बँका आणि NBFC, मिडकॅप शेअर्समध्ये प्रॉफीटबुकिंग झाले. अदानी FPO ओपन होण्याच्या दिवशीच शेअरची किंमत FPO च्या ऑफर किमतीपेक्षा कमी झाली

आज BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९३३० NSE निर्देशांक निफ्टी १७६०४ आणि बँक निफ्टी ४०३४५ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.