आज क्रूड US $ ८२.६० प्रती बॅरल्सच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८२.७० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.८० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.९३ आणि VIX १४.७५ होते.
USA चे फिअर आणि ग्रीड निर्देशांक ६२ वर आहे.
आज USA निर्देशांक तेजीत होते.
बाल्टिक ड्राय निर्देशांक एका दिवसात ६% तर आठवड्यात ३७% वाढले. याचा फायदा शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, GE शिपिंग या कंपन्यांना होईल.
VI ने अमेरिकन टॉवर कंपनीला १२००० डिबेंचर अलॉट केले. याचा फायदा इंडस टॉवर ला होईल.
आज FII नी Rs २०२२.५२ कोटीची विक्री तर DII नी Rs २२३२ कोटींची खरेदी केली.
साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साखरेचे एकूण उत्पादन ३.३५ कोटी टन होईल. महाराष्ट्रांत १८% कर्नाटकांत १२% उत्पादन कमी होईल तर UP मध्ये ४-५% वाढ होईल.
आंतरराष्ट्रीय मार्केटमध्येही साखरेची टंचाई जाणवत आहे. साखरेच्या किमती नजीकच्या भविष्यात वाढण्याची शक्यता आहे यामुळे साखरेच्या कंपन्यांना फायदा होईल
आज क्रूड, नैसर्गिक गॅस, सोने, चांदी, आणि बेस मेटल्स मंदीत होती.चांदी मंदीत असल्यामुळे त्याचा हिंदुस्थान झिंक वर परिणाम होईल.
GMR इन्फ्रा त्यांचे लँडिंग आणि आणि पार्किंग चार्जेस वाढवणार आहे.
विप्रो त्यांच्या कंपनीच्या बिझिनेसचे चार मुख्य भागात विभाजन करणार आहे. क्लाऊड, इंटरप्राईझ फ्युचरिंग, इंजिनीअरिंग EDGE आणि कन्सल्टिंग असे ते चार विभाग असतील.
CCEA ने NHPC च्या दिवांग येथील Rs १६०० कोटींच्या प्रोजेक्टला मंजुरी दिली.
झी एंटरप्रायझेसला पुन्हा F & G सेगमेंट समाविष्ट करून मे एक्स्पायरीचे कॉन्ट्रॅक्ट लाँच केले झी इंटरप्रायझेस आता IBC च्या कक्षेतून बाहेर आली.
ज्योती फॅब्रिकेशन सर्व्हिसेस च्या ज्योती लॅब मधील मर्जरला मंजुरी मिळाली.
इन्फोसिस एंटरप्राइज क्लायंट साठी प्रायव्हेट 5G लाँच करणार. इन्फोसिसने यूरोपमध्ये डिजिटल क्लाउड सर्व्हिसेस साठी NG VOICES बरोबर करार केला.
SEBI ने लोहिया कॉर्प, मेरिडियन बिझिनेस, आणि IRM एनर्जी या कंपन्यांच्या IPO साठी मंजुरी दिली.
HPL इलेक्ट्रीकला स्मार्ट मीटर्ससाठी Rs ४०९ कोटींची ऑर्डर मिळाली.
देशभरात ३८७ जिल्ह्यात 5G लाँच झाली.
वेदांत PLC या कंपनीने इशू केलेले बॉण्ड्स एप्रिल २३ मध्ये ड्यू होत आहेत. त्यांचे पेमेंट करण्यासाठी वेदान्ताने त्यांचे आंतरराष्ट्रीय झिंक ऍसेट्स हिंदुस्थान झिंक ला विकायचे ठरवले होते. पण सरकारने हिंदुस्थान झिंकला कॅश ऐवजी शेअर्स स्वॅप करण्याची ऑफर दिली. सरकारने हिंदुस्थान झिंकमधील कॅशरिझर्व्हज सुरक्षित ठेवायला हिंदुस्थान जिंकला सांगितले आहे. सरकारचे म्हणणे आहे की हे रिलेटेड पार्टि ट्रॅन्झॅक्शन आहे
NTPC च्या ६६० MV च्या नॉर्थ कर्णपुरा प्रोजेक्टमध्ये काम सुरु झाले.
युरिया च्या किमती US $ ९५० प्रती टनांवरून US $ ३८० प्रती टन तर डाय अमोनियम फॉस्फेट च्या किमती US १००० प्रती टनांवरून US $ ६४० प्रती टन झाल्या. त्यामुळे या खतांची आयात खूप वाढली आहे. याचा फायदा RCF,FACT, NFL यांना होईल.
टाटा मोटर्सने जयपूरमध्ये व्हेहिकल स्क्रॅपिंग फॅसिलिटी (१५०० व्हेहिकल स्क्रॅपिंग वार्षिक क्षमतेची) सुरु केली.
सिप्ला च्या पीठमपुरच्या २ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या तपासणीत USFDA ने युनिटला ८ त्रुटी दाखवून फॉर्म नंबर ४८३ इशू केला होता. कंपनीमध्ये मायक्रोबायॉलॉजिकल कॉंटॅमिनेशनला प्रतिबंध करण्यासाठी उपाय, संगणक सिस्टिम्सकंट्रोल बरोबर नव्हते. पर्यावरण संबंधित उपायांसाठी असलेल्या प्रोसेस डिफेक्टीव्ह होत्या.कंपनी बेसिक SOP आणि हायजिन प्रोसेस फॉलो करत नाही.असे USFDA चे निरीक्षण आहे. त्यामुळे USFDA ने EIR इशू केला नाही.
शोभामध्ये प्रमोटर्स शेअर्स खरेदी करत आहे.
छत्तीसगढ मधील दातिमा कोल माईन ब्लॉक ( १.३३ कोटी टन क्षमता ) साठी श्री सिमेंटने सर्वात जास्त बोली लावली.
EXIDE ULRIC रिन्यूएबल्स मध्ये Rs १९.८ कोटींची गुंतवणूक करणार आहे.
भारती एअरटेलने सांगितले की आमचा Paytm मध्ये स्टेक खरेदी करायचा विचार नाही.त्यामुळे Paytm चा शेअर पडला.
आज मार्केट एका मर्यादित रेंज मध्ये फिरत राहिले. मेटल्स एनर्जी आणि फार्ममध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ५८९६२ NSE निर्देशांक निफ्टी १७३०४ आणि बँक निफ्टी ४०२६८ वर झाले
Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !