आज क्रूड US $ ८४.४० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= ८२.३० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.८५ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.०५ आणि VIX १२.१९ होते.
आज USA ची मार्केट्स तेजीत होती.आज सोने, चांदी, कॉपर, झिंक आणि अल्युमिनियम तेजीत होते.
आज FII ने Rs १२७७१ कोटींची खरेदी तर DII नी Rs २१२८.८० ची खरेदी केली.
पीडिलाइटने ‘जोवाट हॉट MEHT’ चे पीडिलाईटच्या प्लांटमध्ये उत्पादन आणि विक्री करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट केले.
HRC (हॉट रोल्ड कॉइल्स) च्या भावांत Rs २००० वाढ होणार आहे. याचा फायदा टाटा स्टीलला होईल.
‘शोभा’ मध्ये प्रमोटर्सची खरेदी सुरु आहे.
अर्जेन्टिनामध्ये मक्याचे (कॉर्नचे) उत्पादन खराब झाले. गुजरात अंबुजा एक्स्पोर्टला फायदा होईल.
एपरल्सची निर्यात खूप वाढली आहे. याचा फायदा गोकुळदास एक्स्पोर्ट ला होईल.
नॉर्थ अमेरिकेत क्लास ट्रक ची विक्री १०.१% ने वाढली. याचा फायदा भारत फोर्ज, रामकृष्ण फोर्जिंग्स आणि GNA ऍक्सल्स यांना होईल.
अडाणी ग्रीनचा राजस्थानमधील जैसलमेर येथील चौथा विंड सोलर हायब्रीड पॉवर प्लांट ऑपरेशनल झाला.
M & M फायनान्सियल ची डिसबर्समेंट ५३% ने वाढून Rs ४१८५ कोटी झाली. कलेक्शन कार्यक्षमता ९७% झाली.
हॅपीएस्ट माइंड्स Rs १२५ कोटींचे १२५०० डिबेंचर्स इशू करणार.
HPCL ने डिबेंचर इशू द्वारे Rs १६५० कोटी उभारले.
नाटको फार्मा शेअर बायबॅकवर ८ मार्च रोजी विचार करेल.
‘टिटाघर वॅगन’ आणि BHEL यांचे कन्सॉर्शियम दुसरे लोएस्ट बीडर ठरले. वंदे भारत ट्रेन मेंटेन करणे आणि अपग्रेड करण्यासाठी हे कॉन्ट्रॅक्ट आहे.
MOIL चे मँगॅनीज ओअर चे उत्पादन १.३१ लाख टन तर विक्री १.३२ लाख टन झाली.
भारतात फॉक्सकॉन ही आयफोनचे उत्पादन करणारी कंपनी US $ ७० कोटींची गुंतवणूक करून प्लांट लावणार आहे.
आलेम्बिक फार्माने त्यांच्या गुजरातमधील ३ प्लांट संबंधित इम्पेअरमेंट चार्जीस Rs ११५० कोटी बुक केले.
PNGRB ने पाईप लाईन टॅरिफ चार्जेस ४१% वाढवायचा प्रस्ताव दिला. याचा फायदा GAIL ला होईल.
अडाणी ग्रुपच्या शेअर्स मध्ये ‘GQG पार्टनर्स’ ने Rs १५०१५ कोटींची ब्लॉक डील रूट ने खरेदी केली.
अडानी एंटरप्रायझेस, अडानी पोर्ट, अडानी ग्रीन, अडाणी टोटल, अडाणी ट्रान्समिशन अडानी विल्मर या शेअर्समध्ये खरेदी झाली.
भारताचा सर्व्हिस PMI ५९.४(५७.२) आणि कॉम्पोझिट PMI ५९.०० ( ५७.५) झाले.
कॅपलिन पाईण्टच्या ‘ROCURONIUM BROMIDE’ इंजेक्शनला USFDA ची मंजुरी मिळाली.
अडानी इंटरप्रायझेसला ओडिशामधील बरारा बॉक्साइट साईटसाठी LOI ( लेटर ऑफ इन्टेन्ट) मिळाले.
वेदांताची BARCLAYS, स्टॅंडर्ड चार्टर्ड, आणि JP मॉर्गन यांच्याशी कर्जासाठी बोलणी चालू आहेत.
PVR नी नालासोपारा येथे ५ स्क्रीनवाले मल्टिप्लेक्स सुरु केले.
पटेल इंजिनीअरिंगच्या JV ला Rs ६४० कोटींची ऑर्डर मिळाली. यात पटेल इंजिनीअरिंग चा हिस्सा Rs ५१२ कोटींचा आहे.
जॉन्सन पंप्स इंडिया लिमिटेड चे नवीन नाव WORTHINTON पंप्स इंडिया लिमिटेड ला मध्य प्रदेश जल निगम मर्यादित कडून Rs १२२५ कोटींच्या प्रोजेक्टसाठी LOA मिळाले.
महाराष्ट्रात लेमन ट्री हॉटेल्सने दोन प्रॉपर्टीजसाठी करार केला.
आज मेटल, रिअल्टी, इन्फ्रा, बँकिंग, एनर्जी, FMCG क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९८०८ NSE निर्देशांक निफ्टी १७५९४ बँक निफ्टी ४१२५१ वर बंद झाले..
Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !