आजचं मार्केट – ६ मार्च २०२३

आज क्रूड US $ ८५.३० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८१.७० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.५६ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.९५ आणि VIX १२.१८ होते.

आज मार्केटमध्ये वातावरण चांगले आहे. फेडच्या ऑफिसर्सची वक्तव्ये आणि अडाणी ग्रुपची सुधारलेली परिस्थिती यामुळे मार्केट मध्ये सकारात्मक दृष्टिकोन दिसून येत आहे.

२२ मार्च रोजी फेड आपले वित्तीय धोरण जाहीर करेल.

FII नी Rs २४६.२४ कोटी आणि DII नी Rs २०८९.९२ कोटींची खरेदी केली.

दूध आणि गहू हा ब्रिटानियाच्या कच्चा मालाच्या ४०% कच्चा माल आहे या दोन्हींचीही किंमत वाढल्यामुळे ब्रिटानिया या शेअरचे अनुमान कमी करण्यात आले आहे.

क्रूडवरील विंडफॉल टॅक्स Rs ४४०० प्रती टन ( Rs ५० प्रती टन वाढ ) डिझेलवरील ड्युटी Rs २ प्रती लिटर कमी करून Rs ०.५० प्रती लिटर केली. ATF वरील ड्युटी रद्द करण्यात आली.

बजाज इलेक्ट्रिकने साऊथ बिहार पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपनीकडून प्लांट प्रॉडक्ट आणि सप्लायसाठी Rs ५६५ कोटींचा करार केला.

NEOGEN ने BULI केमिकल्समध्ये १००% स्टेक खरेदी केला.

धर्मज कॉर्पचे प्रमोटर्स कंपनीचे शेअर्स खरेदी करत आहेत.

नाटको फार्मा ८ मार्च २०२३ रोजी शेअर बायबॅक वर विचार करेल.

चीनच्या ग्रोथ रेटचे अनुमान कमी केले याचा परिणाम स्टील आणि इतर मेटल्स आणि सामान्यतः मागणी वर होईल.

CAMS ने ‘थिंक ऍनालीटीकस’ मध्ये ५५.३० % स्टेक खरेदी केला.

संवर्धना मदर्सनने त्यांचा ‘SMS जर्सी’ मध्ये त्यांचा स्टेक वाढवल्यामुळे SMS जर्सी त्यांची सबसिडीअरी झाली

इन्फोएज ची सबसिडीअरी ‘रेड स्टार्ट लॅब’ ही सबसिडीअरी ‘SPLOOT’ मध्ये ५.२ कोटींची गुंतवणूक करणार आहे. ही कंपनी पेट पेरेंटिंग कम्युनिटी आणि कॉन्टेन्टलेड प्लॅटफॉर्म चालवते.

पॉवर ग्रीड छत्तीसगढ मधील इंटरस्टेट ट्रान्समिशन सिस्टीम अंतर्गत दोन प्रोजेक्टसाठी BOOT बेसिसवर लोएस्ट बीडर ठरली.

महानगर गॅस UNISON ENVIRO ही कंपनी Rs ५३१ कोटींना खरेदीने करणार आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी लातूर आणि उस्मानाबाद हे आहाराष्ट्रातील आणि चित्रदुर्ग आणि दवणगेरे जिल्ह्यात PNGRB ऑथोराइज्ड सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन कंपनी आहे. ही कंपनी अशोक बिल्डकॉन सबसिडीअरी आहे. ही खरेदी PNGRB मंजुरीअंतर्गत असेल.

कन्साई नेरोलॅक यांनी पॉलिजेलकडून नेरोफिक्स मधील ४०% स्टेक Rs ३७ कोटींमध्ये घेतला.

HAL ला Rs ५७० कोटींचा टॅक्स रिफंड मिळाला.

यात Rs १६३.६८ कोटी व्याजाचा समावेश आहे.

ओर्चीड फार्माच्या ओर्चीड बायो फार्मा ला PLI योजनेअंतर्गत ७ ACA चे उत्पादन करायला परवानगी मिळाली. म्हणून ओव्हरसीज टेक्नॉलॉजी प्रोव्हायडरशी MOU केले. लिंडे इंडिया ने रिन्यूएबल पॉवर कंपनी FPEL सूर्या मध्ये २६% स्टेक ‘ Rs ७.६९ कोटींची गुंतवणूक करून घेतला.

झायड्स लाईफला ‘VIGABATRIN’ च्या ओरल सोल्युशनसाठी USFDA कडून परवानगी मिळाली. हे औषध अहमदाबादला मोरय्या येथे बनवले जाईल.USA मध्ये या औषधाची विक्री US $ २३३.७ मिलियन आहे.

पंजाबच्या होशियारपूर प्लांटमध्ये सेन्च्युरी प्लायवूडने काम सुरु केले.

सुमिमोटो केमिकल्स ला गुजरात प्रदूषण नियंत्रण बोर्डाने प्लांट बंद करायला सांगितले.

ओलेकट्रा ग्रीन इलेक्ट्रीकला ५५० EV बसेस साठी Rs १००० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

भारती एअरटेलने 265 जिल्ह्यात 5Gसेवा लाँच केली.

बिर्ला सॉफ्टने कोईम्बतूर मध्ये नवीन डिलिव्हरी सेंटर लाँच केले.

किरि इंडस्ट्रीजच्या शेअरला वरचे सर्किट लागले कारण सिंगापुर इंटरनॅशनल कमर्शियल कोर्टाने कंपनीच्या DYSTAR मधील स्टेकचे फायनल व्हॅल्युएशन US $ ६०३.८० मिलियन एवढे कन्फर्म केले.

१७ मार्च २०२३ रोजी भारत २२ मध्ये रीबॅलन्सिंग होणार त्यामुळे US $ २० मिलियन चा इंफ्लो येईल. यात पॉवर ग्रीड कोल इंडिया, NTPC या शेअर्सच्या वेटेजमध्ये वाढ होईल.

ITC, नाल्को, ऍक्सिस बँक, L & T, SBI या मध्ये आऊटफ्लो होईल.

अडानी पोर्ट आणि अडानी अडाणी टोटल यांचे रेटिंग स्टेबल वरून निगेटिव्ह केले.

टाटा मोटर्सची JLR UK विक्री ३३% ने वाढून १६७० युनिट झाली ( १२५३ युनिट )

रिअल्टी, PSU बँक, यांच्यात प्रॉफिट बुकिंग झाले.

FMCG, फार्मा मेटल या सेक्टरमध्ये खरेदी झाली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६०२२४ NSE निर्देशांक निफ्टी १७७११ बँक निफ्टी ४१३५० वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.