आजचं मार्केट – ८ मार्च २०२३

आज क्रूड US $ ८३.४० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८२.१० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०५.६६ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.९८ आणि VIX १२.७२ होते.

फेडचे चेअरमन पॉवेल यांनी सांगितले की फेडची रेट हाईकची पॉलिसी हायर, फास्टर आणि दीर्घ मुदतीची असेल. या त्यांच्या विधानानंतर ओल्ड इकॉनॉमी शेअर्स पडले. डाऊ जोन्स ५७५ बेसिस पाईंट्स पडले सोने ५% पडले. फार्माच्या किमती निश्चित करतील करांच्या दरांमध्ये वाढ करतील.

भारतात आज काही ठिकाणी धुळवडीची/ रंगपंचमीची सुट्टी आहे.त्यामुळे आज volume कमी असेल

FII नी Rs ७२१.३७ कोटींची तर DII नी Rs ७५७.२३ कोटींची खरेदी केली.

अलकार्गो लॉजिस्टिक्स कॉन्ट्रॅक्ट लॉजिस्टिक्स बीझिनेस मधील ३८.८७ स्टेक Rs ३७३ कोटींचा आहे.खरेदी करणार आहे. यामुळे त्यांचा स्टेक १००% होईल. कॉन्ट्रॅक्ट लॉजिस्टिक्स आणि एक्स्प्रेस डिस्ट्रिब्युशन मध्ये सिनर्जी निर्माण होईल. नॉन कोअर कस्टम्स क्लीअरन्स बिझिनेस Rs ४२ कोटींना विकणार आहे. यात कंपनीचा ६१.१३% स्टेक आहे . कंपनीने Rs ३.२५ इंटरीम लाभांश जाहीर केला.

IGL ने जिनसीस गॅस सोल्युशन्स बरोबर JV केले. १ मिलियन स्मार्ट मीटर उत्पादन क्षमता असलेला प्लांट Rs ११० कोटी गुंतवणूक करून सुरु करणार आहे. या प्लांटमध्ये एप्रिल २०२४ पासून उत्पादन सुरु होईल.

अजंता फार्मा १० मार्च २०२३ रोजी शेअर बायबॅक वर विचार करेल.

KPI ग्रीन ने २० वर्षांसाठी हायब्रीड पॉवर पर्चेस अग्रीमेंट १.८४५ MWAC क्षमतेचा इंडिपेन्डन्ट पॉवर प्रोड्युसर सेगमेंटच्या अंतर्गत जामनगरमधील गॅरीसन इंजिनीअर बेस बरोबर केले.

NBCC कंपनीला ३ कन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपमेंट प्रोजेक्ट Rs ५४१ कोटींचे मिळाले. जम्मू काश्मीर मध्ये Rs २१७.२७ कोटी आणि ओडिशा मधील भुवनेश्वर मध्ये Rs ३०० कोटींची काँट्रॅक्टस मिळाली.
लुमॅक्स ऑटो च्या बोर्डने लुमॅक्स इंटिग्रेटेड व्हेंचरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि कोटक महिंद्रा इन्व्हेस्टमेंट कडून Rs २५० कोटी कर्ज किंवा क्रेडिट फॅसिलिटी मिळवण्यासाठी मंजुरी दिली.

सन फार्माने कॉन्सर्ट फार्मा या बायोफार्मास्युटिकल कंपनीचे अक्विझिशन पूर्ण केले.

अडानी ग्रुपने सांगितले की तारण म्हणून ठेवलेले सर्व शेअर्स ते सोडवणार आहेत. आता त्यांनी Rs ७३७४ कोटींचे तारण म्हणून ठेवलेले शेअर्स सोडवले.

श्री राम फायनान्सची सबसिडीअरी श्री राम हाऊसिंग फायनान्स मध्ये BEARING स्टेक घेण्याची शक्यता आहे. या कंपनीत सध्या मॉरिशस च्या फंडाचा स्टेक आहे.

श्रीराम फायनान्सच्या शेअर्समध्ये ब्लॉक डील द्वारा १.१८ कोटी इक्विटी शेअर्समध्ये Rs १४४८ कोटींचे ( ३.१६% स्टेक) ब्लॉक डील झाले.

वर्धमान स्पेशल स्टिल्स आणि टोयोटा ग्लोबल सप्लाय ह्या दोन कंपन्या स्टीलचे mass scale उत्पादन करण्यासाठी एकत्र येत आहेत.

नाटको फार्माच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने Rs ७०० प्रती शेअर या दराने ३० लाख शेअर्स ओपन मार्केटमधून बायबॅक करण्यासाठी Rs २१० कोटींचा शेअर बायबॅक मंजूर केला.

इंडस इंड बँकेच्या CEO सुमंत कंठपालिया यांचा कार्यकाल २४ मार्च २०२३ रोजी संपत आहे. त्यांना RBI कडून ३ वर्षांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

आज जिंदाल स्टेनलेस स्टील आणि JSL ( हिस्सार ) यांच्या मर्जरची रेकॉर्ड डेट आहे.

PVR ने ११ स्क्रीनवाला नवीन मल्टिप्लेक्स चेन्नईमध्ये सुरु केला.

SBI लाईफची आज लाभांशावर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक झाली २ रुपये ५० पैसे . लाभांश दिला १६ march record date आहे

TCS मार्क्स आणि स्पेन्सर बरोबर US $ १ बिलियनची डील पूर्ण करणार. BSNL ला ४G साठी इक्विपमेंट पुरवणार.TCS साऊथ आफ्रिका, सौदी अरेबिया, आणि UAE मध्ये सर्वात जास्त कर्मचारी नेमणारी कंपनी ठरली.

पॉवर ग्रीडच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ने Rs ४०७१ कोटींची गुंतवणूक करण्यासाठी मंजुरी दिली.

कुर्नुलमध्ये Rs ४०७१ कोटी आणि इस्टर्न रिजन एक्स्पान्शन स्कीम मध्ये Rs ५२४ कोटींची गुंतवणूक करणार.

हिरोमोटो कॉर्प ने ‘XTEC’ ची नवीन रेन्ज लाँच केली.

साखरेच्या किमती जागतिक पातळीवर ६ वर्षांच्या कमाल स्तरावर आहेत. त्यामुळे साखर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी झाली. एप्रिलमध्ये सरकार साखरेचा निर्यातीसाठी कोटा वाढविण्याची शक्यता आहे.

ज्युबिलांत फूड वर्क्सनी POPEYES स्टोर्स चेन्नईमध्ये सुरु केले, आणि बंगलोरमध्ये फ्राईड चिकन मार्केटमध्ये विस्तार केला. त्यामुळे ज्युबिलण्ट फुड्सचे टार्गेट वाढवले.

ब्ल्यू स्टारने AC ची नवीन रेंज लाँच केली.

एप्रिलच्या द्वैमासिक वित्तीय धोरणात RBI व्याजाचे दर वाढविण्याची शक्यता आहे.

कृष्णा डायग्नॉस्टिक्स १०० कलेक्शन सेंटर उघडणार आहे.

आज मार्केट एका छोट्या रेंजमध्ये फिरत होते. साखर उत्पादक कंपन्या, एनर्जी सेक्टरमधील कंपन्यात खरेदी झाली आणि हॉटेल्समध्ये खरेदी झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६०३४८ NSE निर्देशांक निफ्टी १७७५४ बँक निफ्टी ४१५७७ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.