आजचं मार्केट – ९ मार्च २०२३

आज आज क्रूड US $ ८२.७० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८१.८० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०५.५४ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.९९ तर VIX १२.५३ होते.

आज USA मधील मार्केट फेडचे अध्यक्ष पॉवेल यांच्या आक्रमक पवित्रा सुचवणाऱ्या विधानांमुळे मंदीत होती.टर्मिनल रेट ५.४८ वरून ५.६९ झाला .
बँक ऑफ कॅनडाने त्यांचे दर ४.५% वर कायम ठेवले.
चीनमधील महागाई निर्देशांक २.१% वरून १% झाला.

US फेडच्या २०-२१ मार्चच्या बैठकीत होणारी संभाव्य दरवाढ, US $ निर्दशांक आणि बॉण्ड यिल्डस मधील वाढ यामुळे सोने , चांदी, आणि बेस मेटल्स मंदीत होते. भारताच्या कापूस उत्पादनात १३ लाख बेल्स ची घट होईल असा अंदाज आहे.

येस बँकेने आधार हाऊसिंग फायनान्स बरोबर CO-LENDING करार केला.

युनायटेड फार्मर्स इन्व्हेस्टमेन्टने दावत फूड्स मध्ये ५६ लाख शेअर्स खरेदीचा व्यवहार पूर्ण केला.
HFCL ने मायक्रोसॉफ्ट बरोबर प्रायव्हेट 5G पार्टनर नेटवर्क सोल्युशन्सच्या कॉन्व्हर्जन साठी अग्रीमेंट केले

गोदरेंज अग्रोव्हेटने Rs १०० कोटींची गुंतवणूक करून आंध्र प्रदेशात खाद्य तेल रिफायनरी सुरु करण्यासंबंधीत आंध्र प्रदेश राज्य सरकारबरोबर करार केला.

GR इन्फ्राला Rs १२४८ कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.
सोनाटा सॉफ्टवेअरने ‘SINEQUA ‘ बरोबर एंटरप्राइज सर्च सोल्युशनसाठी करार केला.

रेलिगेअर एंटरप्रायझेस ने Rs ४०० कोटी फुल आणि फायनल सेटलमेंट म्हणून १६ कर्जदारांना द्यायचे कबुल केले.

FII नी Rs ३६७१ कोटींची खरेदी केली तर DII नी Rs ९३७.८० कोटींची विक्री केली.

रामकृष्ण फोर्जिंगने RKEL इंजिनीअरिंग इंडस्ट्री या नावाने सबसिडीअरी स्थापन केली

SEQUENT सायंटिफिक ने तिनेटा फार्ममध्ये १०० % शेअर होल्डिंग घेणार होते. पण आता ही योजना रद्द केली.

भारत फोर्ज हे चाकण येथे ६०००० युनिट उत्पादन क्षमतेची E -बाईक मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी सुरु करणार आहे

शॉपर स्टॉप या कंपनीने जपानमधील कंपनी SHISEIDE बरोबर डिस्ट्रिब्युशनसाठी करार केला.
डेटा पॅटर्सनी Rs ४५० कोटींचा QIP लाँच केला.
गोकुळदास एक्स्पोर्टमध्ये ४% डिस्काऊंटवर म्हणजे Rs ३९० प्रती शेअर फ्लोरं प्राईसवर Rs २६४ कोटींचे ब्लॉक डील झाले.

हिंद रेक्टिफायर्स च्या नाशिक प्लांटमध्ये उत्पादन सुरु केले.

L & T टेक ने म्हैसूर मध्ये ऑटोमोटिव्ह सोल्युशन सेंटर उघडले.

आज हनीवेल ऑटोमेशन कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितले की त्यांची कंपनी इंटिग्रेटेड ऑटोमेशन सेवा पुरवते आणि सॉफ्टवेअर सेवा पुरवते. भारतात डिजिटल स्पेस आणि इंफ्रामध्ये मोठ्या प्रमाणावर सरकारी आणि खाजगी गुंतवणूक होत आहे.

सरकारने भारताला जगाचे फार्मा कॅपिटल बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. फार्मा उद्योगात उत्पादन स्टोअरेज मध्ये ऑटोमेशनला चांगला वाव आहे. लॉजिस्टिक्स यामध्ये रेल्वेज, विमानतळ, हवाई प्रवास, रिअल्टी मध्येही ऑटोमेशनला वाव आहे. सरकारच्या वेगवेगळ्या PLI स्कीमखाली नवीन फॅक्टरीज बनत आहेत. काही जुन्या फॅक्टरीजचे ऑटोमेशन होत आहे. त्यामुळे भारतात US $ १००० कोटींचे सध्या मार्केट आहे आणि येत्या तीन वर्षात ते दुप्पट होईल. कंपनी ऍक्सेस कंट्रोल, बिल्डिंग मॅनेजमेंट, कंट्रोल पॅनल, इलेक्ट्रिकल वायरिंग आणि फायर लाईफ सेफ्टी आणि सेन्सर या क्षेत्रात ऑटोमेशन सेवा पुरवते.

हेल्थकेअर, फूड प्रोसेसिंग सेक्टरमध्येही ऑटोमेशनला वाव आहे. ऑटोमेशन उद्योगाला महागाई आणि मंदी येण्याची शक्यता आणि सेमीकंडक्टर चिप्सची टंचाई हे प्रश्न पुढे आहेत.

कंपनी ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग आणि इंजिनीअरिंग सेक्टरमध्येही ऑटोमेशन सेवा पुरवते. कंपनीने सांगितले की ऑटोमेशन सेवांसाठी भारतात मागणी वाढत आहे.

BOSCH ह्या कंपनीने EV सेक्टरमध्ये Rs २००० कोटी ते Rs ३००० कोटी गुंतवणूक करून डबल डिजिट मार्केट शेअर घेण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कंपनी हायड्रोजन पॉवर ट्रेन्स, २ व्हीलर, ४ व्हीलर, बसेस या क्षेत्रातही प्रवेश करण्याची शक्यता आहे.

तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये ३१ मार्च २०२३ पर्यंत नॉमिनेशन केले नाही तर तो फ्रीझ केला जाईल.

GE शिपिंगने ANCHOR हँडलिंग TUG कम सप्लाय व्हेसलची डिलिव्हरी घेतली.

आज ऑटो, FMCG, रिअल्टी मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९८०६ NSE निर्देशांक निफ्टी १७५८९ बँक निफ्टी ४१२५६ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

One thought on “आजचं मार्केट – ९ मार्च २०२३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.