आजचं मार्केट – १० मार्च २०२३

आज क्रूड US $ ८१.६१ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८२.०० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०५.२६ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.८० आणि VIX १३.५७ होते.

USA मध्ये SVB (सिलिकॉन व्हॅली बँक) फायनान्सियल्स चा शेअर ६० % पडला तर सिल्व्हर गेट कॅपिटलचा शेअर ४२% पडला. सगळ्या बँकांचे शेअर्स पडले. JP मॉर्गन ६% पडला. जॉबलेस क्लेम २१००० ने वाढले. सातत्याने रेट वाढत असल्याने लोन डिफॉल्टची शक्यता वाढत आहे. HDFC बँकेच्या, विप्रोच्या ADR मध्ये घट झाली. आज USA चे नॉन फार्म पेरोलचे आकडे येतील.

USA ची मार्केट्स पडल्यामुळे जगभरातील मार्केट्समध्ये पडझड झाली.

FII नी Rs ५६१.७८ कोटींची विक्री तर DII नी ४२.४१ कोटींची खरेदी केली.

अडानी पॉवरमध्ये राजस्थान, महाराष्ट्र, उडुपी, रायगड रायपूर मुंद्रा येथील सबसिडीअरी मर्ज केल्या
रिलायन्सने कॅम्पाकोला लेमन आणि ऑरेंज अशा २ फ्लेव्हरमध्ये लाँच केला.

महाराष्ट्र राज्याच्या अंदाजपत्रकात ATF वरील VAT चार्ज २५% वरून १८% केला. तसेच महिलांना १ % स्टॅम्पड्युटीमध्ये सवलत दिली.

IRB इन्फ्राचे टोल कलेक्शन २७% ने वाढून Rs ३५२ कोटी झाले.

ग्लेनमार्क फार्माची १६ मार्चला अंतरिम लाभांशावर विचार करण्यासाठी बैठक आहे.

NBCC ला Rs २२९ कोटीची ITFT ( इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन ट्रेंड ) साठी काकीनाडा येथे नवीन कॅम्पस बनवण्यासाठी वर्क ऑर्डर मिळाली.
ड्रेजिंग कॉर्प ला सदर्न नेव्हल कमांड कोची कडून Rs ६४ कोटीचे मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

PNC इंफ्राटेक Rs २००४ कोटींच्या हायवे प्रोजेक्टसाठी लोएस्ट बीडर ठरली. हे कॉन्ट्रॅक्ट २४ महिन्यात पूर्ण करायचे आहे. आणि नंतर १५ वर्षे ऑपरेट करायचे आहे.

झायड्स लाईफच्या एरिथ्रोमायसिन टॅब्लेट्स साठी USFDA ची मंजुरी मिळाली या टॅब्लेट्ससाठी USA मध्ये US $ २.५१ कोटींचे मार्केट आहे.

थरमॅक्सने ग्रीन हैड्रोजन प्रोजेक्टसाठी ‘FORTESCUE फ्युचर इंडस्ट्रीज’बरोबर करार केला.

अजंता फार्मा Rs १४२५ प्रती शेअर या दराने टेंडर ऑफर रूटने २२१०५०० शेअर्स बायबॅक करण्यासाठी Rs ३१५ कोटी खर्च करेल.

KNR कंस्ट्रक्शनला Rs ६५० कोटीच्या हायवे प्रोजेक्टसाठी ऑर्डर मिळाली.

NEOJEN ने बुलि केमिकल्स ही कंपनी खरेदी केली.NEOJEN च्या व्यवस्थापनाने सांगितले की ऑरगॅनो लिथियम चे उत्पादन करणारी ही जगातील एकमेव कंपनी आहे.NBUTILE लिथियमचा वापर फार्मा आणि ऍग्रो केमिकल्स मध्ये होतो. हे केमिकल बनवणार्या फार थोड्या कंपन्या आहेत. या खरेदीमुळे NEOJEN ला स्ट्रॅटेजीक बेनिफिट होईल.

‘VI’ ने Rs १५१ कोटी म्हणजे ३०% फी सरकारला दिली. अजून सरकारला Rs १३५० कोटी द्यायचे आहेत. हे देण्यासाठी कंपनीने २५ मार्चपर्यंत मुदत मागितली. VI ने स्पेक्ट्रम युसेज चार्जेस साठी Rs २७ कोटी सरकारला दिले.

टाटा पॉवरने ५१० MW हायब्रीड प्रोजेक्टसाठी टाटा पॉवर BGL बरोबर पॉवर पर्चेस अग्रीमेंट केले.
मार्कसन फार्माच्या ‘FAMOTIDINE’ ला USFDA ची मंजुरी मिळाली.

भारतात सोयाबीनचे पीक चांगले आले आहे. अर्जेन्टिनामध्ये दुष्काळ पडल्यामुळे सोयाबीन मका आणि गहू यांच्या पिकांवर प्रतिकूल परीणाम झाला आहे.

भारत आणि USA मध्ये सेमीकंडक्टर सप्लाय साठी करार झाला. आज सरकारने भारताला कार्गो हब बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

सरकारच्या सूचनेनुसार १३ मार्च २०२० रोजी बँकांनी येस बँकेत ३ वर्षांसाठी गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीचा लॉकइन पिरियड १३ मार्च २०२३ रोजी पूर्ण होत असल्यामुळे YES बँकेच्या शेअर्समध्ये विक्री येण्याची शक्यता आहे.

पॉलिकॅब मध्ये मोठे ब्लॉक डील होण्याची शक्यता असल्याने शेअर पडला.

HAL ने Rs २० अंतरिम लाभांशाची घोषणा केली. या अंतरिम लाभांशासाठी २० मार्च रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.

स्वान एनर्जी हा स्मॉल कॅप शेअर आज ९% वाढला. त्यांनी त्यांचे FRSU (फ्लोटिंग स्टोअरेज रिगॅसिफिकेशन युनिट) व्हेसल तुर्कीये सरकारच्या बोटास या कंपनीला Rs८०० कोटी वार्षिक भाड्याने दिले.

उज्जीवन financial services नी ५ रुपये लाभांश दिला

आज एनर्जी तेल आणि गॅस सेक्टरमध्ये खरेदी झाली. बाकी सर्व सेक्टरमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९१३५ NSE निर्देशांक निफ्टी १७४१२ आणि बँक निफ्टी ४०४८५ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.