आजचं मार्केट – १३ मार्च २०२३

आज क्रूड US $ ८२.८० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८१.९० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.२७ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.७४ आणि VIX १६.२७ होते.

SVB ( सिलिकॉन व्हॅली बँक) ही टेक स्टार्ट अप वर फोकस करत होती. या बॅंकेत झालेल्या घडामोडिंचा भावनिक परीणाम जास्त पण आर्थीक परिणाम फारसा होणार नाही. कारण SVB बँकेच्या प्रकरणात फेड ने हस्तक्षेप केला. बँकेच्या ठेवीदारांना त्यांचे पैसे आज पासून काढता येतील. SVB नी Paytm आणि नजारा टेकमध्ये पैसे घातले होते. पण आता Paytm मध्ये त्यांची गुंतवणूक नाही.

FII नी Rs २०६१.४७ कोटींची विक्री केली तर DII नी Rs १३५०.१३ कोटींची खरेदी केली.

जानेवारी २०२३ साठी IIP चे आकडे ५.२% आले( ४.३% )

इंडसइंड बँकेचे CEO सुमंत कठपालिया यांची RBI ने पुन्हा २ वर्षांसाठी MDCEO म्हणून नेमणूक केली.

अडाणी ग्रुपने US $ २.१५ बिलियनचे कर्ज प्रीपेड केले आणि US $ ५०० मिलियनच्या ब्रिज लोनचे रिपेमेन्ट केले. अडानी ग्रुपचा अंबुजा सिमेंट या कंपनीत ६३% स्टेक आहे. ४% ते ५% स्टेक अडाणी ग्रुप विकणार आहे. या विक्रीतून US $ ४५० मिलियन मिळतील. आणि कर्ज कमी होईल.

गेटवे डिस्ट्रिपार्क या कंपनीत HDFC म्युच्युअल फंडाने वेगवेगळ्या योजनेतून २.०२% स्टेक ८ मार्चला खरेदी केला. त्यामुळे या फंडाचा कंपनीमधील स्टेक ७.१०% झाला.

लॉईड मेटल आणि एनर्जी या कंपनीला सेंट्रल गव्हर्नमेंट आणि महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडून ३ मिलियन टन्स प्रती वर्ष एवढे आयर्न मायनिंग वाढवायला परवानगी दिली.

ल्युपिन या कंपनीच्या विशाखापट्टणम API मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीच्या ६ मार्च ते १० मार्च २०२३ दरम्यान झालेल्या तपासणीत USFDA ने कोणतीही त्रुटी दाखवली नाही.

टेक महिंद्राचे MDCEO म्हणून मोहित जोशी यांची नेमणूक होईल.

ICICI बँकेचा ICICI लोम्बार्ड मध्ये असलेला ४८.२% स्टेक ३०% पर्यंत कमी करण्यासाठी RBI कडून ९ सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदत वाढवून मिळाली.

वेलस्पन कॉर्पच्या वेलस्पन मेटालिक्स या सबसिडीअरीला २ महिन्यात ४३ KMT पिग आयर्न साऊथ ईस्ट एशिया आणि यूरोपमध्ये निर्यात करण्यासाठी ऑर्डर मिळाली.

लुमॅक्स ऑटो ने तिच्या सबसिडीअरीमार्फत ७५% स्टेक IAC इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह इंडिया मध्ये घेतला.

शिल्पा मेडिकेअरच्या हैदराबाद मधील ७ नंबरच्या युनिटच्या तपासणीत USFDA ने २ त्रुटी दाखवल्या.

सोना BLW मधील २०% स्टेक ‘ब्लॅकस्टोन’ने ६% डिस्काऊंटवर Rs ३२०० कोटींच्या ब्लॉक डीलमध्ये विकला.

झायड्स लाईफच्या ‘OLENZAPINE’ या औषधाला USFDA ची परवानगी मिळाली.

गोदरेज प्रॉपर्टीज ने बंगलोरमध्ये २८ एकर जमीन खरेदी केली.

महिंद्रा CIE मध्ये आज मोठे ब्लॉक डील झाले.
SAIL ही कंपनी १६ मार्च रोजी लाभांशावर विचार करेल.

GMDC ने ओडिशा मधील कोळशाच्या दोन कमर्शियल खाणींसाठी सर्वात जास्त बोली लावली.

६ ‘डॉर्नियर २२८’ एअरक्राफ्ट विक्रीसाठी भारतीय एअरफोर्स बरोबर HAL ने Rs ६६७ कोटींचा करार केला.

SBI चा येस बँकेत २६.१४ % स्टेक आहे.

मॉलकॉमने गुजरात सरकारबरोबर Rs १०८.२२ कोटींचा करार केला.

LIC ने DR रेड्डीज मध्ये २% स्टेक खरेदी केला. आता LIC चा स्टेक ९.६९% झाला.

M & M ने महिंद्रा CIE मधील ६.१% स्टेक विकला.

आज बँकिंग, ऑटो, रिअल्टी, इन्फ्रा, FMCG, IT, मेटल सेक्टरमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५८२३७ NSE निर्देशांक निफ्टी १७१५४ बँक निफ्टी ३९५६४ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.