आजचं मार्केट – १४ मार्च २०२३

आज क्रूड US $ ८०.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८२.४० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०३.४४ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.५७ आणि VIX १६.२१ होते.

USA फेड काहीसे धर्मसंकटात सापडले आहे. त्यांनी जर रेट वाढवणे चालू ठेवले तर क्रेडिट ग्रोथ कमी होईल आणि जर रेट वाढवले नाहीत तर महागाई वाढेल.

फेब्रुवारी २०२३ महिन्यासाठी CPI ६.४४ होती ( जानेवारीत ६.५२ होते.)

FII नी Rs १५४६.८६ कोटींची विक्री तर DII नी Rs १४१८.५८कोटींची खरेदी केली.

सूर्या रोशनीने सांगितले की त्यांना ३LPE कोटेड स्टील पाईप्स साठी ८.५ महिन्यात पूर्ण करायची Rs ९६.३९ कोटींची ऑर्डर HPCL कडून मिळाली. हे पाईप्स CGD ( सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन) योजनेअंतर्गत राजस्थान,बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल राज्यात पुरवठा करायचे आहेत.

BA कश्यप आणि सन्स यांना बंगलोर येथील बिझिनेस पार्क कॅम्पस साठी Rs ८९ कोटींची आणि रेसिडेन्शियल प्रोजेक्टसाठी Rs ६९ कोटी अशा Rs १५८ कोटींच्या २ ऑर्डर्स मिळाल्या. या ऑर्डर्स २ वर्षात पूर्ण करायच्या आहेत.

कृष्णा डायग्नॉस्टिक्सने मुंबईत १०० पॅथॉलॉजिकल कलेक्शन सेंटर उघडून सुरु केली. आता कंपनीची एकूण ३०० पॅथॉलॉजिकल सेंटर सुरु झाली आहेत.
धनलक्ष्मी फॅब्रिक्स ही कंपनी त्यांचे डोंबिवली येथील प्रोसेसींग युनिट ६ ते ८ महिन्यांसाठी रिनोव्हेशनच्या कारणासाठी बंद ठेवणार आहे. कोल्हापूर येथील विव्हिन्ग युनिट मात्र नेहेमीप्रमाणे चालू राहील.
GAIL ने Rs ४ प्रति शेअर लाभांश जाहीर केला या लाभांशासाठी रेकॉर्ड डेट २१ मार्च २०२३ निश्चित केली आहे.

टाटा केमिकल्सचे रेटिंग ‘फीच’ ने IDR ( लॉन्ग टर्म फॉरीन करन्सी ईश्युअर रेटिंग ) स्टेबलवरून पॉझिटिव्ह केले आणि रेटिंग BB+ असे ठरवले.
ल्युपिनच्या पुणे येथील बायोसर्च सेंटरचे इन्स्पेक्शन USFDA ने पूर्ण केले. कोणतीही त्रुटी दाखवली नाही.

सन टीव्ही ने Rs २.५० प्रती शेअर इंटरीम लाभांश जाहीर केला.

सिम्फनीने ड्युएल मिनी पर्सनल कूलिंग डिव्हाईस लाँच केले.

क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण चे AUM ( ऍसेट अंडर मॅनेजमेंट) Rs २०००० कोटी झाले फ्युजन मायक्रो क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण च्या तुलनेत ४०% स्वस्त आहे. CLSA ने Rs ५५० चे टार्गेट दिले आहे.

डिगवी टॉर्क ट्रान्स्फर चे BSE वर Rs ६०० आणि NSE वर Rs ६२० वर लिस्टिंग झाले. ट्यूब इन्व्हेस्टमेंट्स ऑफ इंडिया ने N गोविंदराजन यांच्या बरोबर CDMO (कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन्स ) बिझिनेस सुरु करण्यासाठी सबसिडीअरी स्थापन करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट केले . या सबसिडीअरीत ट्यूब इन्व्हेस्टमेंट इंडिया Rs २८५ कोटी आणि N. गोविंदराजन Rs १५ कोटींची गुंतवणूक करतील.CDMO कंपन्या फार्मास्युटिकल उद्योगाला नॉलेज, प्रगती आणि उत्पादन क्षमता यात मदत करतात.

MCX वर नैसर्गिक गॅसचा २५० mmbtu चा वायदा सुरु झाला.

फेब्रुवारी २०२३ महिन्यासाठी WPI ३.८५% ( जानेवारीत ४.७३% ) आला.

पोदार पिगमेंट्स ने Rs ३.५० प्रती शेअर इंटरीम लाभांश जाहीर केला.

BEML च्या ‘BEML लँड ऍसेट लिमिटेड’ या सबसिडीअरीचे लवकरच लिस्टिंग केले जाईल. या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची लवकरच नेमणूक केली जाईल.

मास्टेकने DULSCO या कंपनीबरोबर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी करार केला.

सरकार ने M. जग्गनाथ यांची LIC चे MD म्हणून नेमणूक केली.

बंधन बँक प्रथम जनरल इन्शुअरन्स आणि नंतर लाईफ इन्शुअरन्स क्षेत्रात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

TCM ला केरळ राज्य सरकारकडून Rs ७.४ मिलियन्सची ऑर्डर मिळाली.

IT सेक्टरमधील कंपन्यांच्या रेव्हेन्यूमध्ये ३०% रेव्हेन्यू BFSI कडून येतो. उदा फर्स्ट रिपब्लिक बँकेत MPHASIS चे काम तर FIFTH थर्ड बँकेत कोफोर्ज चे काम आहे. त्यामुळे जर USA मधील बँका आर्थीक संकटात सापडल्या तर IT सेक्टरमधील भारतीय कंपन्यांच्या ऑर्डर्स कमी होण्याची शक्यता आहे.

बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी HCC च्या JV ला Rs ३६८१ कोटीची ऑर्डर मिळाली.

हुडको ने Rs ०.७५ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.

इन्फोसिस त्यांचे चौथ्या तिमाहीचे आणि वार्षिक निकाल १३ एप्रिल २०२३ रोजी जाहीर करेल. आणि लाभांशाचीही घोषणा करेल.

आज बँकिंग, IT, रिअल्टी, ऑटो, तेल गॅस या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५७९०० NSE निर्देशांक निफ्टी १७०४३ बँक निफ्टी ३९४११ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.